Join us  

'मला ती फार आवडते'; प्रेम की फक्त अट्रॅक्शन झालंय? ५ संकेतांवरून ओळखा प्रेम अन् क्रशमधला फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 5:05 PM

Difference Between Love And Attraction (Prem ki attraction kas olkhaych) : प्रेम आणि क्रशमध्ये काय फरक असतो. (Relationship Tips) हे वेळीच समजलं तर तुम्ही निर्णय घेताना चुकणार नाही

 'मला ती किंवा तो फार आवडतो', ही अगदी सामान्य  भावना असली तरी प्रेम वाटतंय की फक्त आकर्षण (Love and Attraction) यात बरेचजण कन्फ्यूज असतात. प्रेम आणि क्रश अशा दोन भावना आहेत ज्यात आयुष्यभराचे सुख सामावलेले असते. तर याच दोन गोष्टी निराशा, उदासिनता आणि डिप्रेशनचे कारण ठरू शकतात. प्रेम आणि क्रशमध्ये काय फरक असतो. (Relationship Tips) हे वेळीच समजलं तर तुम्ही निर्णय घेताना चुकणार नाही एखाद्याचा कधी चेहरा आवडू लागतो कधी बोलणं तर कधी फक्त नजरेनेच हृदयात धडधड होते. याला प्रेम म्हणायचं की अट्रॅक्शन? सोप्या रिलेशनशीप टिप्स तुम्हाला यातील फरक ओळखण्यास मदत करू शकतात.(How to Know Difference Between Love and Attraction)

खऱ्या प्रेमाचे संकेत कसे ओळखावेत? (What is the Difference Between Love and Attraction)

१) वूमन हेल्थच्या रिपोर्टनुसार जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा वेळेसह प्रेम कधीच कमी होत नाही उलट ते वाढत जाते, इमोशन अजूनच स्ट्राँग आणि डिप होत जातात. जेव्हा तुम्ही कोणाच्याही प्रेमात असता तेव्हा त्या व्यक्तीला पूर्ण अटेंशन देता. त्यांच्याशी समोरासमोर बोलायला तुम्हाला कोणतीही अडचण वाटत नाही.

२) जेव्हा तुम्ही एकत्र असता तेव्हा एकमेकांना समजून घेण्यासाठी प्रत्येक विषयावर मनमोकळेपणाने बोलता. कुटुंब, बॅकग्राऊंड, आवडी-निवडी या विषयांवर संवाद साधला जातो. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा सिरियस प्लॅनिंग करतात. ही बॉन्डींग नॅचरली तयार होते. लाईफ पार्टनर्स फक्त अशा विषयांवर प्लॅनिंग करतात.

३) तुम्ही एकमेकांबरोबर ओपनली बोलतात. समोरील व्यक्तीचे प्रोब्लेम्स तुम्हाला आपले असल्याप्रमाणे वाटतात आणि तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला रिलेशनशिपमध्ये बॅकअपची गरज  वाटत नाही. तुम्ही या व्यक्तीची तुलना इतरांबरोबर करत नाही.

समोरचे केस जास्त पांढरे झाले? ना डाय, ना मेहेंदी-करा ५ उपाय; नव्याने येतानाच काळे येतील केस

४) आपल्या कुटुंबाबरोबर तुम्ही त्या व्यक्तीची ओळख करून देता. मित्र परिवाराशीही ओळख करून देता. तुमच्यात एक पॉवरफुल केमेस्ट्री असते.  ज्यात फिजिकलपेक्षा इमोशल व्हेव्हज जास्त असतात.  कोणताही निर्णय घेताना तुम्ही त्या व्यक्तीला विचारात  घेता.  

क्रश असल्याचे कसं ओळखाल? (How to know love is real or not)

१) क्रश एक अस्थिर आणि अविश्वसनीय भावना आहे. जी कधीही येते आणि नंतर गायब होते. यात फिजिकल आकर्षणाची भावना जास्त असते. विश्वास , समर्थनाची भावना कमी असते.  एखाद्यावर फक्त क्रश असल्याने त्या व्यक्तीच्या असण्याने किंवा नसण्याने फारसा फरक पडत नाही.

२) एखादी  आवडती व्यक्ती तुमच्यापासून दूर झाली आणि त्याचा तुमच्या मानसिक स्थितीवर काही परिणाम झाला नाही तर समजा ते क्रश आहे पण तुम्ही मनाने डिस्टर्ब झाला असाल काहीही करून त्या व्यक्तीशी संपर्क करण्याची इच्छा होत असेल  तर समजून जा की तुमचे त्या व्यक्तीवर प्रेम आहे.

चपाती, पराठे करण्यात सकाळचा खूप वेळ जातो? कमी बजेटमध्ये घ्या रोटी मेकर्स, दुप्पट वेळ वाचेल

३) एखाद्या व्यक्तीवर फक्त क्रश असेलतर तुम्ही  त्यांना आपल्या आयुष्यात फारसे इन्वॉल्व्ह करत नाही. क्रश आज एकावर तर उद्या दुसऱ्या व्यक्तीवर असे होऊ शकते पण प्रेमाच्या बाबतीत असं होत नाही.

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप