Join us  

दिवाळी पाडवा स्पेशल : नवरा- बायकोच्या नात्यात हवेत रोमँटिक रंग, एकमेकांना द्या ४ खास गिफ्ट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 11:15 AM

Perfect Gifts For Your Partner For This Diwali: नवरा- बायको म्हणून एकमेकांना भेटवस्तूंच्या स्वरुपातलं गिफ्ट द्या किंवा नका देऊ.. पण नातं अधिक सुंदर बनविण्यासाठी हे काही गिफ्ट्स मात्र एकमेकांना नक्कीच द्या.

ठळक मुद्देदिवाळी पाडव्याचं मुहूर्त साधून तुम्हीही तुमच्या जोडीदाराला असं काही गिफ्ट देऊ शकता. वर्षभर करून बघा. पुढच्या पाडव्यापर्यंत नक्कीच नातं अधिक उत्साही- आनंदी झालेलं जाणवेल. 

दिवाळीचा पाडवा (Diwali Padva) म्हणजे नवरा- बायकोच्या नात्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस. साडेतीन मुहर्तांपैकी एक असणारं हे एक मुहूर्त पती- पत्नीसाठीही नक्कीच खास असतं. नवरा- बायको हे नातं तसं रोजचंच. नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले की अनेक जणांना हे नातं कसं जुनं- जुनं आणि त्याच त्या पद्धतीचं रटाळ वाटू लागतं. काही जणांचं नातं मात्र लग्नानंतर २०- २५ वर्षे उलटून गेली तरीही नव- नवं फ्रेश वाटतं. कामाचा ताण, आर्थिक गणितं, घरातल्या जबाबदाऱ्या या सगळ्या धांदलीत तुम्हालाही तुमचं नातं जुनाट, कुठे तरी हरवल्यासारखं वाटत असेल, तर दिवाळी पाडव्याचं मुहूर्त साधून तुम्हीही तुमच्या जोडीदाराला असं काही गिफ्ट (Perfect Gifts For Your Partner For This Diwali) देऊ शकता. वर्षभर करून बघा. पुढच्या पाडव्यापर्यंत नक्कीच नातं अधिक उत्साही- आनंदी झालेलं जाणवेल. 

 

नवरा- बायको म्हणून एकमेकांना असं गिफ्ट द्या..१. भरभरून कौतूकआपलं कौतूक केलेलं कुणाला आवडत नाही? कौतुकाचे काही शब्द ऐकण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक असतो. मग तो कोणत्याही वयातला का असेना. त्यामुळे एकट्यात आणि चारचौघातही आपल्या जोडीदाराच्या चांगल्या गोष्टींचे आवर्जून कौतूक करा. बघा जोडीदार कसा तुमच्यावर खुश होतो..

 

२. दोष देणं टाळा घरात काही प्रॉब्लेम झाला किंवा मुलांच्या बाबतीत काही झालं, तर लगेचच नवरा- बायको या गोष्टीचं खापर एकमेकांवर फोडण्यास तयार असतात. अशावेळी जोडीदाराएवढंच स्वत:लाही त्या घटनेसाठी जबाबदार समजा आणि एकमेकांना दोष न देता दोघे मिळून त्या घटनेची जबाबदारी स्विकारा. यामुळे वाद कमी होतील आणि नातं अधिक परिपक्व होण्यास मदत होईल. 

 

३. नात्यात तुलना नकोच सोशल मिडियामुळे प्रत्येक जणच स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याची इतरांसोबत तुलना करत आहे. अनेक संसारांसाठी ही गोष्ट खूप हानिकारक ठरतेय. त्यामुळे आपल्या जोडीदाराची कधीच कुणाची तुलना करू नका. यामुळे नातं खराब होण्यास वेळ लागणार नाही. 

दिवाळीत खाणं खूप झाल्यानं अपचनाचा त्रास- ॲसिडिटी वाढली, तर हा घ्या इन्स्टंट काढा- हाताशी ठेवा रेसिपी४. वेळ द्याआजकालच्या जगात ही गोष्ट खूपच महत्त्वाची झाली आहे. नात्यातला नवेपणा किंवा फ्रेशनेस टिकवायचा असेल, तर एकमेकांना वेळ देण्यात कधीच कमी पडू नका. 

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपदिवाळी 2022