२००७ साली अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या दोघांनी लग्न केलं. त्यांची लेक म्हणजेच आराध्या ही आता १३ वर्षांची झाली आहे. एवढी वर्षे गुण्यागोविंदाने एकत्रित राहिल्यानंतर आता अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यातील वादविवादाच्या चर्चा होत आहेत. दोघे लवकरच घटस्फोट घेऊन विभक्त होणार असंही बोललं जात आहे. या सगळ्या पार्श्वभुमीवर नेहमीच बच्चन कुटूंबातील सदस्य ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याबद्दल काय बोलतात हे ऐकण्यासाठी अनेकांचे कान टवकारले जातात. तसंच आता अभिषेकच्या बाबतीत झालं. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान तो लग्न, बायको याविषयी असं काही बोलला की ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या..(Abhishek Bachchan's advice to every married man at Filmfare OTT Awards)
नुकताच एक पुरस्कार सोहळा पार पडला. त्यादरम्यान सूत्रसंचालकाने अभिषेकला विचारलं की तो प्रत्येक चित्रपटातूनच एवढ्या दमदार भूमिका कशा काय देतो, त्याच्याविषयी कोणत्याच दिग्दर्शकाची तक्रार कधीच का नसते? या प्रश्नाचं उत्तर देताना अभिषेक म्हणाला की त्यात काहीच अवघड नाही.
ऐश्वर्या नारकर सांगतात इमर्जन्सीमध्ये घरच्याघरी थ्रेडींग करण्याचा मस्त उपाय- प्रत्येकीसाठी उपयुक्त
जे काही दिग्दर्शक सांगतो आहे ते निमूटपणे ऐकायचं, तो सांगेल तसं काम करायचं आणि घरी यायचं... यावर सूत्रसंचालक म्हणाला की माझंही तसंच आहे. मी देखील माझ्या बायकोचं असंच ऐकतो.. हे वाक्य येताच अभिषेकही किंचित अवघडल्यासारखा वाटला. पण लगेच वेळ सांभाळून तो म्हणाला की अगदी बरोबर आहे. प्रत्येक विवाहित पुरुषाने बायकोचं ऐकलंच पाहिजे, बायको जे म्हणते ते करा... बास्स..
आता अभिषेक हे सगळं म्हणतो आहे, पण खरंच असं असतं का? अभिषेकच्या बाबतीत तरी ते खरं असावं का? ना स्त्रिया नवऱ्याचं प्रत्येक म्हणणं ऐकतात. ना पुरुष असे बायकोला घाबरुन हो ला हो करतात. पण पुरुषांच्या गटात अशा पद्धतीचे विनोद बायकोवर नेहमीच केले जातात.
दूध आवडत नाही? 'हे' ५ पदार्थ प्या, भरपूर कॅल्शियम मिळेल- म्हातारपणीही हाडं राहतील ठणठणीत
पण त्यातल्या प्रत्येक नवऱ्याला मनातून तर हे माहितीच असतं की आपण बोलतो आहोत त्यात कितपत खरं आहे.... मुळात घरात कोणाचं बोलणं जास्त ऐकलं जातं, घर कोणाच्या विचाराने चालतं हा प्रश्नच नसतो.. कारण दोघांच्या संसारात साहजिकच काही गोष्टींत तिची मर्जी चालणार तर काही निर्णय त्याच्या विचाराने घेतले जाणार.. मुळात एकाच्या निर्णयात दुसऱ्याची गैरसोय तर नाही ना, हे पाहून निर्णय घेणं महत्त्वाचं असतं नाही का?