एखाद्या जोडप्यासाठी आई - वडील होणं ही गोष्ट त्यांच्या आयुष्यातली खूप आनंदाची गोष्ट असते. गर्भधारणेसाठी जोडपे असंख्य पर्यायांचा वापर करतात. सेक्स हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या (Pregnancy) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु, या घटकाविषयी दाम्पत्यांमध्ये अनेक समज-गैरसमज किंवा प्रश्न असतात. या प्रश्नांची त्याचवेळी उत्तर मिळाली तर लैंगिक जीवन अधिक सुखदायी होतं आणि मातृत्वाचा हेतूही सफल होतो. जेव्हा एखाद्या दाम्पत्याला मूल हवं असतं किंवा ते त्या दृष्टीनं प्लॅनिंग करतात, तेव्हा काही प्रश्न त्यांच्या मनात असतात.
अनेक जोडपी आई - वडील होण्यासाठी उत्सुक असतात परंतु काहीवेळा काही कारणास्तव या गोष्टी लगेच घडून येत नाहीत. अनेक वेळा आयव्हीएफ, सरोगसी यांसारख्या उपायांचा अवलंब करूनही चांगली बातमी मिळत नाही. अशा वेळी अनेकदा आपण अनेक पूर्वग्रह दूषित विचारांवर विश्वास ठेवू लागतो. अनेक प्रयत्नांनंतरही आपण गर्भधारणा करू शकत नसाल तर काहीजण चुकीच्या सल्ल्यांवर विश्वास ठेवून अनेक उपाय करून पाहतात. परंतु असे उपाय करून पाहताना त्यात काही तथ्य आहे का ? याची पडताळणीच आपण करून पहात नाही. अक्षय कुमार आणि करीना कपूरच्या 'गुड न्यूज' चित्रपटातील एक सीन आहे ज्यात, करीना सेक्स केल्यानंतर पाय वर करून झोपते. त्यामुळे गर्भधारणा होते असे मानले जाते. संभोगानंतर पाय वर करून काही वेळ पडून राहिले तर स्त्रिया गरोदर होण्याची शक्यता वाढते असा एक समज आहे, ते खरे की खोटे?(Does Putting Legs Up After Sex Improve The Chances Of Conceiving ?).
नक्की खरे काय?
संभोगानंतर पाय वर करून काही वेळ पडू राहिले तर स्त्रिया गरोदर राहण्याची शक्यता असते यातले तत्थ्य सांगण्यासाठी एक व्हिडीओ स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अमीना खालिद यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. त्या सांगतात, संभोगानंतर पाय वर करून झोपले तर स्त्रिया गरोदर राहतात, हा विचार संपूर्णपणे चुकीचा आहे. असे केल्याने स्त्रियांमधील गर्भधारणेची शक्यता वाढते असे कोणतेही संशोधन आजवर झालेले नाही. काही लोकांना असे वाटते की योनीतून वीर्य बाहेर पडते आणि त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. त्यामुळे जर स्त्रीने संभोगानंतर आपले पाय वर ठेवले तर योनीमार्गातून वीर्य बाहेर पडणार नाही असा समज करून स्त्रियांना पाय वर करण्याचा सल्ला दिला जातो, परंतु हा सल्ला खरंतर पूर्णपणे चुकीचा आहे.
पिरिएड्सच्या 'त्या' ४ दिवसात सेक्स केलेलं चालतं का? याचा शरीरावर काय परीणाम होतो...
सेक्स करताना खूपच घाम येतो? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...
शुक्राणूंची संख्या गर्भधारणेची शक्यता वाढवते...
१. पुरुषांच्या वीर्यामध्ये २० ते ४०० लाख शुक्राणू असतात. संभोगानंतर लगेचच ३५ % शुक्राणू वीर्यापासून वेगळे होत गर्भाशयामध्ये जातात. त्यानंतर प्रजनन मार्गाद्वारे एक मिनीटामध्येच फॅलोपियन ट्यूबमध्ये ते पोहोचतात. यामधील काही शुक्राणू तसेच राहतात. तर काही शुक्राणू हे नष्ट होतात.
२. इतर उर्वरित शुक्राणून योनीमार्गे द्रव्य पदार्थांमधून बाहेर येतात. सेक्सनंतर जर योनी मार्गामधून द्रव्य पदार्थ बाहेर येत असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही. फक्त १० % वीर्यच बाहेर येतं. तोपर्यंत हे शुक्राणू गर्भाशयापर्यंत पोहोचतात.
३. डॉ.अमीना यांनी एका अभ्यासाचा उल्लेख केला आहे. १९७३ मध्ये एक अभ्यास करण्यात आला ज्यामध्ये शुक्राणूंचे बीजारोपण करण्यात आले. ५ मिनिटांच्या आत, फॅलोपियन ट्यूबमध्ये जितके शुक्राणू होते तितकेच बीजारोपण होते. शुक्राणू केवळ त्यांच्या हालचालीमुळेच नव्हे तर गर्भाशयाच्या आणि ओटीपोटाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे देखील गर्भाशयात लवकर पोहोचतात, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.