दिवाळीनिमित्त सगळ्यांच्याच घरी सध्या लगबग सुरू आहे. दिवाळीला काय करायचं, लक्ष्मीपुजन कसं असणार, पाडव्याला स्पेशल काय बेत करायचा आणि भाऊबीज कशी सेलिब्रेट करायची, याचं नियोजन प्रत्येकाच्याच घरी झालेलं असणार. असंच काहीसं आपल्या सेलिब्रिटींचं पण असतं बरं का. असंच यंदाच्या दिवाळीचं जबरदस्त प्लॅनिंग केलं आहे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने. ही दिवाळी संकर्षणसाठी अतिशय महत्त्वाची असून यंदा त्याच्या घरी दिवाळीचा डबल धमाका आहे.
photo credit- google
मुळचा परभणीचा असणारा संकर्षण अतिशय दिलदार आणि कवी मनाचा. मराठी इंडस्ट्रीत संकर्षणने स्वत:च एक स्थान निर्माण केलं आहे. असं असलं तरी संकर्षण अजूनही त्याची पाळंमुळं विसरलेला नाही. यंदाची दिवाळी तुझ्यासाठी कशी असणार असं विचारताच तो खुलला. यावर्षीची दिवाळी अतिशय स्पेशल आहे. कारण कऱ्हाडे परिवाराची आतापर्यंतची दिवाळी आणि आताची दिवाळी यामध्ये खूप फरक आहे. कारण आमच्या कुटूंबाचा भाग बनलेले दोन नवे सदस्य यंदा दिवाळीला आमच्यासोबत असणार आहेत. काही महिन्यांपुर्वीच संकर्षणला जुळी मुले झाली. यापैकी एक मुलगी तर एक मुलगा आहे. या दोघांमुळे यंदाच्या दिवाळीत आमच्या घरी नवे चैतन्य असणार आहे, असं त्याने आनंदाने सांगितलं.
photo credit- google
भाऊबीजही महत्त्वाचीतो म्हणाला की आतापर्यंत आम्ही दिवाळीचा पाडवा पती- पत्नी म्हणून साजरा करत आलो. पण आता यावर्षी पासून आई- बाबा म्हणून पाडव्याचा आनंद घेणार आहोत. जुळ्या मुलांपैकी एक मुलगा आणि एक मुलगी असल्याने भाऊबीज देखील महत्त्वाची ठरणार आहे. कारण या इवल्याशा भाऊ- बहिणींचा हा पहिलाच भाऊबीजेचा सण आहे, असंही संकर्षणनं सांगितलं.
photo credit- google
यावर्षी दिवाळीत या गोष्टी मिस करणार आहे संकर्षणसंकर्षण आजवर त्याची प्रत्येक दिवाळी परभणीला साजरी करत आला आहे. यावर्षी मात्र असं पहिल्यांदाच होत आहे की तो दिवाळीत मुंबईला आहे. त्याचे आई- वडील दिवाळसणासाठी मुंबईत आले आहेत. संकर्षण म्हणाला की दिवाळीत परभणीला गेलो की तिथे सगळे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासोबत दिवाळीचे तीन- चार दिवस कसे निघून जातात, ते कळतंही नाही. आज दुपारी अमूक एकाकडे तर संध्याकाळी दुसऱ्या कुणाकडे, असे दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे सकाळ- संध्याकाळचे कार्यक्रम ठरलेले असायचे. जेवणाच्या, फराळाच्या आणि गप्पांच्या मेजवान्या रंगत जायच्या. हे सगळं आम्ही या दिवाळीत खूप जास्त मिस करणार आहोत. काही महिन्यांपुर्वी संकर्षणच्या आजीचेही निधन झाले. त्यामुळे या दिवाळीत आजीची देखील खूपच आठवण येते आहे, असंही त्याने भावूक होऊन सांगितलं.