असं मानलं जातं की इरेक्टाईल डिसफंक्शनची समस्या वयस्कर लोकांमध्येच उद्भवते पण अनेक तरूण या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. या लैगिंक समस्येचा परिणाम तुमच्या नात्यावरही होऊ शकतो. म्हणूनच या समस्येवर वेळीच उपचार करायला हवेत.
एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार २० ते २९ वर्ष वयोगटातील ८ टक्के पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शननं प्रभावित आहेत. ३० ते ३९ वयोगटातील ११ टक्के पुरूषांना ही समस्या आहे. यामुळे वयाच्या विशीतच तरूण नपुसंकतेचे शिकार बनत आहेत. (5 common diseases that can cause of erectile dysfunction in young people)
इरेक्टाईल डिस्फंक्शची लक्षणं
१) इरेक्शनमध्ये अडचण येणं
२) कामेच्छा (सेक्स ड्राईव्ह) कमी होणं
३) आत्मविश्वासाची कमतरता
४) न्युनगंड
५) वैवाहित नात्यातील दुरावा
endocrine.org मधील एका रिपोर्टनुसार, असे अनेक हार्मोन्स आहेत ज्यांची पातळी नियंत्रणात नसल्यास नपुंसकत्व येऊ शकते. यापैकी, टेस्टोस्टेरॉन एक आहे ज्याची पातळी कमी होण्यासह लैंगिक इच्छा कमी होण्यासह नपुंसकत्व येऊ शकते. त्याचप्रमाणे, प्रोलॅक्टिन हार्मोनची पातळी वाढल्यामुळे देखील हे होऊ शकते. खूप जास्त किंवा खूप कमी थायरॉईड पातळी देखील होऊ शकते.
१) डायबिटीसमुळे तुमची यौन उत्तेजना आणि इरेक्शन प्रभावित होऊ शकते. डायबिटीसमुळे वाढलेली ब्लड शुगर लेव्हल शरीरातील रक्त वाहिन्यांना नुकसान पोहोचवते.
२) मेंदू हा सर्वात मोठा लैंगिक संकेत देणारा अवयव आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तुमची सेक्सची इच्छा आणि उत्कंठा इथेच उगम पावते. मेंदूतील रसायनांच्या असंतुलनामुळे ज्या लोकांना नैराश्य आहे त्यांची लैंगिक इच्छा कमी असू शकते.
३) जर तुम्हाला धूम्रपानाचे व्यसन असेल तर तुम्ही सहजपणे इरेक्टाइल डिसफंक्शनचे बळी होऊ शकता. सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांमध्ये असलेले निकोटीन संपूर्ण शरीरातील रक्त परिसंचरण विस्कळीत करते.
४) 20 वर्ष वयोगटातील अनेक तरुणांना सेक्स परफॉर्मेन्सबद्दल चिंता वाटते. यात चिंताग्रस्त वाटणे किंवा आपल्या जोडीदाराला संतुष्ट करू न शकल्याबद्दल काळजी करणे समाविष्ट असू शकते. जास्त ताणामुळे इरेक्शन मिळणे कठीण होऊ शकते.