Lokmat Sakhi >Relationship > ‘माझं अफेअर होतं, मी बायकोला फसवलं पण तिनं मात्र..’- नवऱ्यानं शेअर केली सोशल मीडियात आपबिती

‘माझं अफेअर होतं, मी बायकोला फसवलं पण तिनं मात्र..’- नवऱ्यानं शेअर केली सोशल मीडियात आपबिती

Extra marital affair : विवाहबाह्य संबंध, त्यातून पती पॉझिटिव्ह, हे समजल्यावर बायको माफ करेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 01:46 PM2022-03-03T13:46:44+5:302022-03-03T14:47:09+5:30

Extra marital affair : विवाहबाह्य संबंध, त्यातून पती पॉझिटिव्ह, हे समजल्यावर बायको माफ करेल?

Extra marital affair : Husband cheated on his wife had a relationship with other men tested positive for hiv | ‘माझं अफेअर होतं, मी बायकोला फसवलं पण तिनं मात्र..’- नवऱ्यानं शेअर केली सोशल मीडियात आपबिती

‘माझं अफेअर होतं, मी बायकोला फसवलं पण तिनं मात्र..’- नवऱ्यानं शेअर केली सोशल मीडियात आपबिती

वैवाहिक जीवनात दोघांमध्ये होणारी भांडणं, रुसवा, फुगवा हे खूप सामान्य आहे. जर नात्यात विश्वास असेल तर या गोष्टींची फरक पडत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा व्यक्तीची कितीही मोठी चुक असली तरी माफ करण्याची तयारी दर्शवता. अशीच एक घटना समोर आली आहे. (Husband cheated on his wife)  सोशल मीडियावर एका व्यक्तीनं आपल्या वैवाहिक जीवनातील अनुभव शेअर केला आहे. या व्यक्तीचं म्हणणं आहे की त्यानं त्याच्या पत्नीला धोका दिला पण तिनं त्याला माफ केलं. (Husband cheated on his wife had a relationship with other men tested positive for hiv)

आपल्याबाबत जे काही घडलं ते सांगताना तो म्हणाला की, ''मी किशोरावस्थेपासूनच बायसेक्शुअल आहे. तरीसुद्धा मी लग्न केलं. लग्नाच्या ३३ वर्षांनंतर मी विवाहबाह्य संबंध ठेवले. आमची दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. जेव्हा आमची मुलगी ३० वर्षांची होती तेव्हापासून एकटी राहत होती आणि मुलगा व्यसनांच्या आहारी गेलेला तो आमच्या सोबतच राहायचा. एक वेळ अशी आली की मी दिवसरात्र खूप ताण-तणावाखाली राहायला लागलो.  काही दिवसातच माझ्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनं आम्हा दोघांनाही मानसिक धक्का बसला.  याचदरम्यान  मी खूप चूका केल्या ज्याचं मला आता खूप वाईट वाटतं.''

पुढे त्यानं सांगितलं की, ''मी खूप दु:खी, सतत टेंशनमध्ये असायचो. म्हणून पत्नीव्यक्तीरिक्त इतरांसोबत अनप्रोटेक्टेट  शारिरीक संबंध ठेवणं सुरू केलं.  याच चुकीमुळे मी ३ वर्ष आधी एचआयव्ही(HIV) संक्रमित झालो. या गोष्टीचं मला आयुष्यभर वाईट वाटेल.  मला आणि माझ्या पत्नीला या  गोष्टींबद्दल एकाचवेळी समजलं. तरीही तिनं मोठ्या मनानं मला माफ केलं. या चुकीमुळे मी स्वत:ला कधीही माफ करू शकत नाही. ''

तज्ज्ञ काय सांगतात?

आपल्या जवळची व्यक्ती दूर  गेल्याचं दु:ख सहन करणं खूप कठीण असतं. यामुळे संपूर्ण कुटुंबाला दु:खाचा सामना करावा लागू शकतो. मुलीच्या मृत्यूनंतर आलेला ताण घालवण्यासाठी त्यांनी कांऊसिलरचा सल्ला घ्यायला हवा होता. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा केल्यानं गोष्टी अधिक सोप्या होतात. 
 

Web Title: Extra marital affair : Husband cheated on his wife had a relationship with other men tested positive for hiv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.