बॉलीवूडमधील,फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) या कल्प्सची जोडी अतिशय फेमस आहे. या दोघांनी एकमेकांना तीन वर्ष डेट करत अखेर २०२२ मध्ये लग्न केले. उत्तम अभिनेता असणारा फरहान हा कायम चर्चेत असतो, पण सध्या तो एका खास कारणांमुळे चर्चेत आला आहे. आई वडिलांचा घटस्फोट झाला की त्याचा मुलांवर परिमाण होतोच यासाठी मुलांचा विचार करणे गरजेचे असते, त्याचबरोबर आपल्या पार्टनरसोबत भांडण - तंटे होऊ नये म्हणून काळजी घेणारा फरहान अशा त्याचा दोन्ही बाजू सध्या आपल्याला पहायला मिळत आहेत. तब्बल दोन वर्षांनंतरही फरहान आणि शिबानी यांच्या रिलेशनशिपची चर्चा एका खास कारणामुळे सर्वत्र होताना दिसत आहे. फरहान - शिबानी यांनी आपल्या लग्नाच्या दोनच दिवसानंतर कपल्स थेरपी (Farhan Akhtar, Shibani Dandekar Attended Couples Therapy Post-Wedding) करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाच्या दोन दिवसानंतरच त्यांना कपल्स थेरपी करण्याची गरज का लागली ? त्याचबरोबर कपल्स थेरपी म्हणजे काय? असे अनेक प्रश्न त्यांच्या रिलेशनशिप बाबत समोर येताना दिसत आहे(Shibani Dandekar reveals she went to couples therapy with Farhan Akhtar 2 days after wedding).
आताच्या रिलेशनशिपमध्ये, काहीवेळा एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही, किंवा काही इतर कारणांमुळे सारखे वादविवाद, भांडण होत असतात. हे भांडण सारखे होत राहिले की नात्यात दुरावा येऊन एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णयही घेतला जातो. अशावेळी थोडं सावरुन, नात्याला थोडा वेळ देत यासोबत इतरही गोष्टी समजून घेतल्या तर नाते कायम टिकून नात्यात गोडवा राहतो. नात्यातला गोडवा टिकवून ठेवण्यासाठी फरहान शिबानी सांगतात सध्याच्या ट्रेंडिंग कपल्स थेरपीचा (Couples Therapy) एक सोपा उपाय(Farhan Akhtar and Shibani Dandekar Started Couples Therapy Soon After Marriage).
कपल थेरपी म्हणजे काय?
आजच्या व्यग्र जीवनात जोडप्यांना एकमेकांना जास्त वेळ देता येत नाही. अनेक वेळा लोकांना एकमेकांशी गोष्टी शेअर करताना संकोच वाटतो. त्यामुळे दोघांमध्ये दुरावण्याची परिस्थिती निर्माण होते. परिणामी त्यांच्यात भांडण सुरू होते. अशा परिस्थितीत ही कटुता दूर करण्यासाठी अनेकदा कपल्स थेरपीकडे जातात. या थेरपीमध्ये तज्ज्ञांच्या मदतीने जोडप्याच्या समस्या सोडवल्या जातात. ब्रेकअप, संवादाच्या समस्या, गैरसमज आणि खासगी क्षणांशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा केली जाते, जेणेकरून दोघांमधील दुरावा मिटतो.
लग्नानंतर २४ तासांच्या आत कपल थेरपी...
शिबानी दांडेकर हिने रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला. शिबानी सांगते की,आम्ही लग्नाआधीच कपल थेरपी घ्यायला सुरुवात केली होती. एंगेजमेंटच्या ६ महिने आधी आणि नंतर कपल्स थेरपी घेत होतो. 'आमचे लग्न सोमवारी झाले. यानंतर आम्ही बुधवारी कपल्स थेरपीसाठी गेलो. मला आठवतं की आम्ही आत जाताच, थेरपिस्ट आम्हाला पाहून आश्चर्यचकित झाले. ते म्हणू लागले, 'अरे इथे का आलात? २४ तासांपूर्वीच तुमचं लग्न झालंय ना?'
कधी कधी काय बोलावे ते समजत नव्हते...
शिबानी दांडेकर म्हणाली, 'थेरपीसाठी जाणे म्हणजे जिममध्ये गेल्यासारखे वाटते. ती म्हणाली, अनेकवेळा थेरपी सेशनदरम्यान आम्ही दोघे एकमेकांकडे पाहायचो आणि बोलण्यासारखे काहीच नव्हते. तसेच, असे दिवस येतात जेव्हा बोल्याण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागायचा. यामुळे आमचे नाते आणखी घट्ट होत होते असे आम्हाला वाटत होते.
नात्यात दुरावा - सतत भांडण ? १ - १ - १ - १ हा नियम पाळा, पाहा हा नवा मॅरेज ट्रेंड...
कपल थेरपीमध्ये काय केले जाते ?
कपल थेरपीमध्ये, जेव्हा जोडपे त्यांच्या समस्या तज्ज्ञांसमोर मांडतात तेव्हा ते या समस्यांवर उपाय शोधण्यात जोडप्यांना मदत करतात. यादरम्यान ब्रेकअप, संवादातील समस्या, गैरसमज आणि खाजगी क्षणांशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली जाते. जेणेकरुन या दोघांमधील मतभेद दूर करण्यासाठी मार्ग काढता येईल. एकदा समस्येचे कारण कळले की त्यावर उपाय शोधता येतो.