Lokmat Sakhi >Relationship > बाप म्हणून मला अपराधी वाटतंच, फरहान अख्तर सांगतो आईबाबा वेगळे होतात पण मुलं मात्र..

बाप म्हणून मला अपराधी वाटतंच, फरहान अख्तर सांगतो आईबाबा वेगळे होतात पण मुलं मात्र..

Farhan Akhtar felt ‘guilty’ for his kids during divorce with Adhuna: They are like collateral damage : त्यानं लहान असताना पालकांचं वेगळं होणं अनुभवलं आणि आता त्याच्या घटस्फोटानंतर त्याला आपल्या मुलींचाही त्रास समजतो पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 01:34 PM2024-09-23T13:34:03+5:302024-09-23T16:20:35+5:30

Farhan Akhtar felt ‘guilty’ for his kids during divorce with Adhuna: They are like collateral damage : त्यानं लहान असताना पालकांचं वेगळं होणं अनुभवलं आणि आता त्याच्या घटस्फोटानंतर त्याला आपल्या मुलींचाही त्रास समजतो पण..

Farhan Akhtar felt ‘guilty’ for his kids during divorce with Adhuna: They are like collateral damage | बाप म्हणून मला अपराधी वाटतंच, फरहान अख्तर सांगतो आईबाबा वेगळे होतात पण मुलं मात्र..

बाप म्हणून मला अपराधी वाटतंच, फरहान अख्तर सांगतो आईबाबा वेगळे होतात पण मुलं मात्र..

त्याच्या लहानपणी त्याचे आईवडील विभक्त झाले. ती सल मनात होतीच (Farhan Akhtar). आपलं कुटूंब अपूरं असण्याची पण मोठं झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की न पटताना पालकांनी एकत्र राहण्यापेक्षा आणि त्याचा त्रास होण्यापेक्षा त्यांनी वेगळं झालेलं मुलांसाठी बरं (Relationship). पुढे त्याचाही सुंदर संसार होता (Divorce). दोन मुलींसह आनंदी कुटूंब. पण काही वर्षांनी त्यानं पत्नीसोबत घटस्फोट घेतला आणि आता त्यालाही वाटतं की जे आपण भोगलं तीच सल आपल्या मुलींच्याही मनात आहे.

बाप म्हणून त्याला त्याचं वाईटही वाटतं. मुलांना एकाचवेळी आईबाबांचं प्रेम न मिळणं हा मानसिक त्रास अन्य कुठल्याही गोष्टींनी भरुन निघत नाही आणि त्याला आपण बाप म्हणून जबाबदारी आहोत असं त्याचं मत. फरहान अख्तरही गोष्ट सांगतो. आईबाबांना वेगळं होताना पाहणाऱ्या मुलांची आणि वेगळं झालेल्या आईबाबांची गोष्ट तो मांडतो आणि नात्यांचा विचित्र गुंता समजतो. अनेकदा आयुष्य अशीच परीक्षा अनेकांची पाहतं..मनातला अपराधीपणा जाता जात नाही(Farhan Akhtar felt ‘guilty’ for his kids during divorce with Adhuna: They are like collateral damage).

१६ वर्षांचा संसार आणि घटस्फोट..


फरहान अख्तरने शिबानी दांडेकरशी २०२२ साली लग्नगाठ बांधली. यापूर्वी त्याने अधुना भाबानीबरोबर १६ वर्षं संसार केला होता. त्यांना दोन मुली आहेत. शाक्य आणि अकीरा या दोघांना आई - वडिलांना विभक्त होताना पाहून भावनिक धक्का बसला. आणि या घटनेमुळे त्यांच अप्रत्यक्ष नुकसान झालं. ज्यामुळे फरहान स्वतःला अपराधी समजतो.

सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात 'या' पद्धतीने बदाम खाल तर मिळेल पोषण; अन्यथा कर्करोग आणि..

आमचा घटस्फोट मुलींसाठी सोपा नव्हता..

रिया चक्रवर्तीला दिलेल्या मुलाखतीत फरहानने घटस्फोटाचा मुलींवर झालेल्या परिणामाबद्दल सांगितलं, 'आमचा घटस्फोट मुलींसाठी नक्कीच सोपा नव्हता. कारण त्यांना वाटत होतं आमचं नातं परिपूर्ण आहे. पण असं नव्हतं. नात्याला तडा गेला होता. म्हणून आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

आजही त्यांच्या मनात राग - नाराजी असू शकते. मुलींना भावनिक हानीतून जावं लागलं. आणि याला मी स्वतःला जबाबदार समजतो, आणि ही अपराधीपणाची भावना मनातून कधीच जाणार नाही.'

फरहानलाही लहानपणी आई-वडिलांचे तुटलेले लग्न पाहावे लागले..


फरहान अख्तरचे वडील जावेद अख्तर आणि आई हनी इराणी यांचाही फार पूर्वी घटस्फोट झाला होता. हनी आणि जावेद वेगळे झाल्यामुळे फरहान वडील जावेद अख्तर यांच्यावर खूप रागावला होता.

कुरकुरीत बटाट्याची चटणी करून पाहा, १० मिनिटांत खा चमचमीत पदार्थ - वाढेल जिभेची चव

फरहान म्हणाला की, 'मी माझ्या लहानपणी जे काही पाहिलं आणि अनुभवलं त्या आधारे मी असे म्हणू शकतो की माझ्या मुलांना त्यांच्या पालकांना वेगळे झालेले पाहणे सोपे नव्हते. कारण, ज्या नात्याला ते जगातील सर्वोत्तम मानत होते, ते नाते तुटले आणि त्यामुळे ते दुखावले गेले असावेत.'

Web Title: Farhan Akhtar felt ‘guilty’ for his kids during divorce with Adhuna: They are like collateral damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.