Lokmat Sakhi >Relationship > फरहान अख्तर सांगतो आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मी बरंच काही भोगलं, म्हणूनच माझ्या लेकींना मी.....

फरहान अख्तर सांगतो आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मी बरंच काही भोगलं, म्हणूनच माझ्या लेकींना मी.....

Farhan Akhtar Reveals About The Impact Of Parents Divorse: पालकांच्या घटस्फोटाचे मुलांच्या आयुष्यावर, मनावर काय परिणाम होतात, याविषयी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर याने नुकताच खुलासा केला आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2024 04:19 PM2024-08-26T16:19:55+5:302024-08-26T16:52:14+5:30

Farhan Akhtar Reveals About The Impact Of Parents Divorse: पालकांच्या घटस्फोटाचे मुलांच्या आयुष्यावर, मनावर काय परिणाम होतात, याविषयी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर याने नुकताच खुलासा केला आहे...

Farhan akhtar reveals how his parents divorse affects his childhood and his own marriage | फरहान अख्तर सांगतो आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मी बरंच काही भोगलं, म्हणूनच माझ्या लेकींना मी.....

फरहान अख्तर सांगतो आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मी बरंच काही भोगलं, म्हणूनच माझ्या लेकींना मी.....

Highlightsफरहान अख्तर म्हणतो आई- वडिलांचा घटस्फोट, त्यानंतर वडिलांचं दुसरं लग्न याचा परिणाम फक्त माझ्या बालमनावरच झाला नाही तर पुढेही माझ्या लग्नावर आणि मी घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयावरही झाला

फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही बॉलीवूडची दोन प्रसिद्ध नावं. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर आणि हनी इराणी यांची ती मुलं. जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचं लग्न १९७२ मध्ये झालं. त्यानंतर जवळपास १३ वर्षांचा संसार झाल्यानंतर जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा घटस्फोट झाला आणि त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केलं. आई- वडिलांचा घटस्फोट, त्यानंतर वडिलांचं दुसरं लग्न हे सगळं फरहान अख्तर याने वयाच्या १०- ११ व्या वर्षीच अनुभवलं- भोगलं. याचा परिणाम फक्त माझ्या बालमनावरच झाला नाही तर पुढेही माझ्या लग्नावर आणि मी घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयावरही झाला, असं फरहानने नुकतंच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. (Farhan akhtar reveals how his parents divorse affects his childhood and his own marriage)

 

आई- वडिलांचे घरात सतत वाद होत असतील, ते एकमेकांशी चढ्या आवाजात बोलत असतील, तर त्याचा मुलांच्या मनावर निश्चितच वाईट परिणाम होतो. त्यात जर पालकांनी घटस्फोट घेतला आणि दुसऱ्या जोडीदारासोबत संसार सुरू केला तर तो मुलांसाठी खूप मोठा मानसिक आघात असतो.

छोट्याशा कुंडीत लावा झेंडूचं रोप, ३ खास टिप्स, दसरा- दिवाळीला वापरता येतील घरचीच फुलं

फरहानने हेच सगळं लहानपणी भोगलं होतं. त्यामुळे जेव्हा त्याच्या घटस्फोटाची वेळ आली तेव्हा आपल्या मुलींवर त्याचा काय परिणाम होईल किंवा होऊ शकतो, हा विचार सगळ्यात आधी त्याच्या डोक्यात आला. फरहान आणि अधुना भभानी यांनी २००० साली लग्न केलं. त्यांना शाक्य आणि अकिरा या दोन मुली आहेत. त्यानंतर १६ वर्षांचा संसार झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि फरहानने २०२२ मध्ये शिबानी दांडेकर हिच्याशी लग्न केलं.

 

जे फरहानच्या पालकांनी केलं, तेच त्याने केलं. पण तो म्हणतो की पालकांच्या घटस्फोटामुळे काय होतं हे मी पुरतं ओळखून होतो. त्यामुळे खरं तर मला माझ्या मुलींवर ही वेळ कधीच येऊ द्यायची नव्हती. पण शेवटी नाईलाज आहे.

डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवून बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं वेळीच ओळखा 

त्यामुळेच मी आणि अधुना आम्ही दोघांनीही निर्णय घेतला आणि आमच्या मुलींशी मोकळेपणाने त्याबद्दल बोललो. जे काही होत आहे, त्यात त्यांचा काहीही दोष नसून, ही बाब आमच्या आयुष्याशी, आवडीनिवडींशी संबंधित आहे, हे त्यांना समजावून सांगितलं. त्यांना पुर्णपणे विश्वासात घेऊन आणि सुरक्षित वातावरण देऊन आम्ही घटस्फोटाचा निर्णय त्यांना सांगितला. आज फरहानची मोठी मुलगी शाक्य ही पदवीधर झाली असून जावेद अख्तर त्यांच्या दोन्ही पत्नींसह तसेच फरहान अख्तर त्याच्या दोन्ही पत्नींसह लेकीचे कौतूक करताना दिसला.


 

Web Title: Farhan akhtar reveals how his parents divorse affects his childhood and his own marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.