Lokmat Sakhi >Relationship > Fathers day 2021:  ....म्हणून आजच्या दिवशी साजरा करतात फादर्स डे; वाचा कशी झाली सुरूवाात अन् महत्व

Fathers day 2021:  ....म्हणून आजच्या दिवशी साजरा करतात फादर्स डे; वाचा कशी झाली सुरूवाात अन् महत्व

Fathers day 2021: know the history significance and importance of this day : पित्याच्या भुमिकेचा सन्मान करणं आणि उत्साह साजरा करण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवसाची सुरूवात कशी झाली याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 10:53 AM2021-06-20T10:53:34+5:302021-06-20T11:07:59+5:30

Fathers day 2021: know the history significance and importance of this day : पित्याच्या भुमिकेचा सन्मान करणं आणि उत्साह साजरा करण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवसाची सुरूवात कशी झाली याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

Fathers day 2021:  .... Know why  third Sunday of June is designated as Father's Day in most countries | Fathers day 2021:  ....म्हणून आजच्या दिवशी साजरा करतात फादर्स डे; वाचा कशी झाली सुरूवाात अन् महत्व

Fathers day 2021:  ....म्हणून आजच्या दिवशी साजरा करतात फादर्स डे; वाचा कशी झाली सुरूवाात अन् महत्व

Highlightsजगभरातील सगळ्या देशात एकाच दिवशी फादर्स डे साजरा केला जात नाही. भारत, अमेरिकेसह अन्य काही देशात तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. १९०९ मध्ये सोनोरानं एक सभेत मातृ दिनाबद्दल ऐकले तेव्हा तिच्या डोक्यात विचार आला की, आईची माया, ममता यासाठी एक दिवस समपर्ण केला जाऊ शकतो कर पित्याच्या योगदानासाठी का नाही?

जगभरात जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षीही कोरोनाच्या माहामारीत   २० जूनला फादर्स डे साजरा केला जात आहे. आज सकाळपासूनच सगळ्यांनी आपआपल्या वडीलांचे फोटो स्टेटसला ठेवत शुभेच्छा दिल्या. पण हा फादर्स डे का साजरा केला जातो याबाबत तुम्हाला माहित आहे का? वडीलांचे आपल्या कुटुंबाप्रती योगदान आणि महत्व याची जाणीव करून देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला (Fathers day 2021) जातो. समाजातील पित्याच्या भुमिकेचा सन्मान करणं आणि उत्साह साजरा करण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवसाची सुरूवात कशी झाली याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

सोनोरानं या कारणामुळे फादर्स डे ची सुरूवात केली

अमेरिकेत या दिवसाची सुरूवात झाली.  या दिवसाबाबत अनेक कहाण्या सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला सगळ्यात लोकप्रिय कहाणी सांगणार आहोत. फादर्स डे ची सुरूवात अमेरिकेतील वॉश्गिंटनमध्ये सोनोरा लुईस स्मार्ट नावाच्या  या महिलेनं केली. लहान वयातच सोनोराचं आपल्या आईला गमावलं होतं. त्यानंतर सोनोराच्या वडीलांनी संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण केले. वडीलांसह आईचेही प्रेम दिले. 

१९१० ला पहिल्यांदा साजरा केला होता फादर्स डे

१९०९ मध्ये सोनोरानं एक सभेत मातृ दिनाबद्दल ऐकले तेव्हा तिच्या डोक्यात विचार आला की, आईची माया, ममता यासाठी एक दिवस समपर्ण केला जाऊ शकतो कर पित्याच्या योगदानासाठी का नाही? त्यानंतर फादर्स डे साजरा करण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला, लोकांशी बोलावं लागलं. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला. त्यानंतर १९ जून  १९१० ला  फादर्स डे साजरा केला गेला. 

वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो फादर्स डे

जगभरातील सगळ्या देशात एकाच दिवशी फादर्स डे साजरा केला जात नाही. भारत, अमेरिकेसह अन्य काही देशात तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. पोर्तुगाल, स्पेन, क्रोएशिया आणि इटलीसह अन्य काही देशात १९ मार्च ला पितृ दिन साजरा केला जातो. तर  न्यूजीलँड, फिजी आणि पापुआ, न्यू गिनीमध्ये सप्टेंबर महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो.  
 

Web Title: Fathers day 2021:  .... Know why  third Sunday of June is designated as Father's Day in most countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.