Join us  

पहला पहला प्यार है? पण आपलं हे प्रेम एकतर्फी तर नाही ना, हे कसं ओळखाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 2:55 PM

कॉलेजचे सुरुवातीचे एक्साईटींग दिवस आणि आपल्याकडे हसून पाहणारा तो... असं झालं की बस्स... दिल खल्लास.. अनेक समज- गैरसमजांना सुरुवात... तुमचंही असंच होत नाही ना?

ठळक मुद्देतुमचं हे प्रेम एकतर्फी आहे की दोनो तरफ आग लगी है... हे जाणून घ्यायचं असेल तर या काही गोष्टी चाचपडून बघा...

काॅलेजचे दिवस असतातच खरंच मंतरलेले. नवं- नवं कॉलेज, नवी मैत्री आणि असंच कुठेतरी दिसलेला आणि नंतर ओळख झालेला तो. फर्स्ट क्रश... मग त्याची वाट पाहणं, तो कुठे तरी दिसेल, या आशेने सतत भिरभिरलेल्या नजरेने इकडं- तिकडं बघणं. आपण त्याच्या नजरेत कसं येऊ, त्याच्याशी ओळख कशी वाढवता येईल किंवा मग त्याच्याशी बोलून मैत्री कशी करता येईल, यासाठी सुरु झालेला प्रयत्न.. असं सगळं हळूहळू सुरु होतं. मग कधीतरी तो पण आपल्याकडे पाहून हसतो, आपल्याशी येऊन बोलतो आणि मग मात्र आपलं चित्त अजिबात थाऱ्यावर राहत नाही.

 

आपल्याला जसा तो आवडतो, तशाच आपण पण त्याला आवडू लागलो आहे का? तो ही आपल्यावर प्रेम करु लागला आहे का? असे अनेक प्रश्न मनात येतात. जेमतेम विशीत असताना या सगळ्या गोष्टी सुरु झाल्याने काही समजतही नाही. म्हणूनच तर तुमचं हे प्रेम एकतर्फी आहे की दोनो तरफ आग लगी है... हे जाणून घ्यायचं असेल तर या काही गोष्टी चाचपडून बघा...

 

१. संवाद कोण सुरु करतंय ?ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला जर एखादी व्यक्ती मनापासून आवडली असेल, तर आपण स्वत:हून त्या व्यक्तीशी बोलण्याची संधी शोधून काढतो. काही ना काही बहाना शोधतो आणि त्या व्यक्तीशी बोलतो. अशा वेळी एरवी लाजऱ्या- बुजऱ्या असणाऱ्या व्यक्तीही कमालीचे धाडस दाखवतात बरं का. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये नेहमी कोण बोलायला सुरुवात करतं, तो की तुम्ही हे एकदा नीट आठवून बघा. मागच्या तुमच्या गाठीभेटी आठवा आणि संवादाला सुरुवात कशी आणि कोणी केली याचा विचार करा. जर प्रत्येक वेळी तुम्हीच स्वत:हून बाेलत असाल आणि नंतर तुम्हाला प्रतिसाद मिळत असेल, तर कदाचित हे तुमचं वन साईडेड लव्ह असू शकतं.

 

२. बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न कोण करतं ?जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, तेव्हा हरप्रकारे आपण त्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही दोघेही एका ग्रुपमध्ये आहात. बाकीचे ग्रुप मेंबर्स कोणत्याही कारणावरून तुमच्यावर चिडले आहेत, अशा वेळी तुमचा तो तुम्हाला साथ देतो का, इतर मित्र- मैत्रिणींसमोर तुमची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करतो का की तो देखील त्यांना साथ देत तुमच्या विरुद्ध बोलतो आहे, याकडे लक्ष द्या. जर तो तुमची बाजू सावरुन घेत असेल, तर त्यालाही कुछ कुछ होतं आहे, असं समजावं.

 

३. सॉरी कोण म्हणतं?जर तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही कारणांवरुन धुसफूस झाली आणि छोटसं भांडण झालं, तर ते भांडण सोडविण्यासाठी कोण पुढाकार घेतं, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी एकानेच नमतं घ्यायचं आणि एकानेच सॉरी म्हणायचं, हे काही योग्य नाही. त्यामुळे जर प्रत्येक वेळी भांडण झाल्यावर तुम्हीच सॉरी म्हणून भांडण मिटवायचा प्रयत्न करत असाल, समोरच्या व्यक्तीला त्याच्याशी काही देणं- घेणं नसेल, तर सावध व्हा. 

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टमहाविद्यालय