नवरा- बायको हे नातं लग्न होताना जितकं रोमॅण्टिक आणि हळूवार असतं, तितकच ते कायम असावं, अशी बहुतांश जोडप्यांची अपेक्षा असते. पण होते मात्र अगदीच वेगळे. आधी येणारा लटका राग कधीकधी एकदमच रूद्र अवतार धारण करतो, तर कधी ॲडजस्ट करण्याची सहनशक्ती संपून मग रागाचा विस्फोट होऊन जातो. म्हणूनच आपल्या पार्टनरला आपला राग सहजासहजी येणार नाही, याची प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात या काही सिंपल ट्रीक्स फॉलो केल्या तर मग बघा तुमचे वैवाहिक आयुष्य कसे उत्तरोत्तर रंगत जाते ते....
१. डेटींग आणि गिफ्टचा आनंद हरवू नका. डेट हा लग्नापुर्वीचा सगळ्यात आनंददायक सोहळा. लग्न झाल्यानंतरही डेटींगचे अप्रुप असतेच. म्हणूनच लग्न झाल्यानंतरही महिन्यातून एकदा नक्की डेटवर जाण्याचा प्लॅन बनवा आणि तुमच्या पार्टनरला खुश करा. डेटवर जाण्याची आयुष्यातली एक्साईटमेंट कधीच हरवून जाऊ देऊ नका. त्याचप्रमाणे नेहमीच एकमेकांना लहान- मोठी सरप्राईजेस आणि गिफ्ट देऊन खुश करण्याचा प्रयत्न करा.
२. पार्टनरला दोष देऊ नकाअनेकदा जोडीदारापैकी एकाला अशी सवय असते की आपल्या हातून काहीही झाले, तरी त्याचे खापर मात्र जोडीदारावर फोडायचे. हा ब्लेमिंग गेम खेळायला जर तुम्ही सुरूवात केली असेल, तर ती लगेच थांबवा. कारण दोष देता देता एक दिवस आयुष्यातल्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठीच जोडीदाराला जबाबदार धरण्याची सवय लागते आणि आयुष्यातला आनंद हरवून जातो.
३. कौतूक करायला विसरू नकाकौतूक ही मोठी चमत्कारिक गोष्ट आहे. एखाद्याचे खोटे कौतूक केले तरी काही काळापुरता तो निश्चितच आनंदी होऊन जातो. नवरा- बायकोच्या नात्यात देखील ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे एकट्यात आणि चारचौघातही जोडीदाराच्या चांगल्या गोष्टीचे कौतूक अगदी मनमोकळेपणाने करा. त्यामध्ये अजिबात कंजुसपणा नको.
४. खोटे बोलू नकाआपल्या पार्टनरशी अजिबात खोटे बोलण्याची सवय लावून घेऊ नका. कारण ही सवय कधीकधी इतकी टोकाला जाते की एक चांगला, सुखी संसारही या सवयीपायी उध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे जे असेल ते खरे आणि स्पष्टपणे आपल्या जोडीदाराला सांगत जा.
५. अवास्तव अपेक्षा नकोआपला जोडीदार असा असावा किंवा अशी असावी अशा खूप अपेक्षा लग्नाआधी आपण बोलून दाखविलेल्या असतात. पण वास्तव आणि फिल्मी दुनिया यात जमीन आस्मानचा फरक आहे, हे सगळ्यात आधी लक्षात घ्या. आपला जोडीदार हा माणूस आहे. सुपर हिरो किंवा सुपर वुमन नाही. त्यामुळे जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे बंद करा.
६. दुसऱ्यांसोबत तुलना नकोतिचा नवरा किंवा त्याची बायको यांची तुलना तुमच्या जोडीदाराशी करू नका. कारण आपला जोडीदार आणि त्याची आपण ज्या व्यक्तीशी तुलना करतो आहोत, ती व्यक्ती ज्या वातावरणात वाढल्या आहेत, त्याच्यात खूप तफावत असते. म्हणून तुमचा जोडीदार जसा आहे, तसा त्याला स्विकारा. तुलनात बंद करा.