फोर प्ले (Foreplay) हा शब्द सिनेमात ऐकलेला असतो, कादंबऱ्यात वाचलेला असतो. मात्र सेक्स आणि फोर प्ले विषयी महिला मोकळेपणानं जोडीदाराशी बोलत नाहीत किंवा पतीपत्नीही परस्परांशी त्यासंदर्भात बोलत नाहीत. निरामय कामजीवन ही सुखी संसारातली आवश्यक गोष्ट आहे. (What is foreplay) सेक्सुअल लाईफ निकोप असण्यासाठी जोडीदाराच्या आवडीनिवडी, कम्फर्ट जोन लक्षात घेणं महत्वाचे असते. फोरप्ले, फिमेल प्लेजर, आफ्टर प्ले म्हणजे काय? ते का गरजेचं असतं, महिलांच्या सुखी सेक्सलाइफसाठी ते का आवश्यक असतं? लैंगिक आरोग्य तज्ज्ञ झोया अली यांनी हेल्थ शॉटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (What is Fore Play How to do it And Why it Matter)
फोरप्ले काय आहे?
फोरप्ले ही संभोगापूर्वी केली जाणारी क्रिया आहे. जेणेकरून शरीरसुखासाठी पुरेशी उत्तेजना मिळेल. परस्परांवरचं प्रेम, ओढ त्यातून वाढीस लागेल. जवळ घेणे, मिठी मारणे यासह शरीरसुखाविषयी निकोप संवादही त्यात अपेक्षित आहे.
रोज पायी चालता तरी पोट १ इंचही कमी होईना? ५ कॉमन चुका टाळा, कमी वेळात येईल स्लिम लूक
फोर प्लेची गरज का असते?
फोर प्ले ने काय होतं? फोर प्ले न करता सेक्स केला तर काय फरक पडतो असे प्रश्न अनेकांना पडतात. याचं उत्तर असं की फोर प्ले शिवाय सेक्स करता येऊ शकतो पण फोरप्ले नंतर सेक्स करणं आणि त्याशिवाय करणं यात खूप फरक आहे. उत्तेजना वाढवण्यास फोर प्ले महत्त्वाचा असतो. ज्यामुळे पार्टनरला अधिकाधिक आनंद मिळतो.
फोर प्ले चा परिणाम कसा होतो?
फोर प्लेचा उद्देश उत्तेजना वाढवणं हा असतो महिलांसाठी हे खास महत्वाचे असते. व्हजायनल लुब्रिकेशन वाढवून शरीर संभोगासाठी तयार होते. फोर प्लेमुळे संबंधातील आनंद दुप्पट होतो आणि ऑरगॅज्म मिळतो. फोर प्ले न करता सेक्स करत असाल तर शरीर व्यवस्थित स्टिमुलेट होत नाही. यामुळे सेक्स करताना लुब्रिकेशन कमी होते आणि संभोग करताना वेदना जाणवू शकतात. त्रासदायक सेक्स टाळण्यासाठी फोर प्ले गरजेचा आहे.
फोर प्ले दरम्यान हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे रक्त प्रवाहाचा वेग वाढून अवयव संभोगासाठी तयार होतात. व्हजायनल ल्युब्रिकेशन संभोगाला अधिक सुखद बनवते यामुळे वेदना टाळता येतात. अर्थात प्रत्येकजण एकाच गतीने उत्तेजित होत नाही अनेकदा उत्तेजना वाढण्यास वेळ लागतो.