Lokmat Sakhi >Relationship > Friendship Day : दिल दोस्ती दुनियादारी आता facetime कॉलवरच! कोरोनाकाळात ऑनलाइन दोस्ताना!

Friendship Day : दिल दोस्ती दुनियादारी आता facetime कॉलवरच! कोरोनाकाळात ऑनलाइन दोस्ताना!

आजवरचे Friendahip Day भन्नाटच असायचे. अख्खा दिवस मित्रमैत्रिणींचा अड्डा रंगलेला असायचा. आता मात्र दिल दोस्ती दुनियादारी तिच आहे. फक्त प्रत्यक्ष भेटींऐवजी ऑनलाईन दोस्ताना रंगत चाललाय एवढंच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 01:32 PM2021-08-01T13:32:31+5:302021-08-01T14:29:26+5:30

आजवरचे Friendahip Day भन्नाटच असायचे. अख्खा दिवस मित्रमैत्रिणींचा अड्डा रंगलेला असायचा. आता मात्र दिल दोस्ती दुनियादारी तिच आहे. फक्त प्रत्यक्ष भेटींऐवजी ऑनलाईन दोस्ताना रंगत चाललाय एवढंच...

Friendship Day 2021 : corona effect, virtual celebration of friendship... | Friendship Day : दिल दोस्ती दुनियादारी आता facetime कॉलवरच! कोरोनाकाळात ऑनलाइन दोस्ताना!

Friendship Day : दिल दोस्ती दुनियादारी आता facetime कॉलवरच! कोरोनाकाळात ऑनलाइन दोस्ताना!

Highlightsलॉकडाऊनआधी खूप वेळ सोबत घालवल्याने आमच्यासाठी प्रत्येकच दिवस फ्रेंडशिप डे असतो. पण ग्लोबल पॅन्डेमिक असो किंवा आणखी काही... आमची दिल दोस्ती दुनियादारी कायम टिकून राहील.

ईशिता मराठे
सकाळी साधारण ८ वाजता घरातून सरळ McD गाठायचं आणि दुपारपर्यंत तिथेच रमायचं. एका महाराजा बर्गरमध्ये मस्त नाश्ता व्हायचा. हळूहळू इतर मित्रमैत्रिणी जमायला लागल्यावर कोणाकडून तरी सहज फ्रेंच फ्राईज आणि कोकची पार्टी मागायची. दुपारचं जेवण कोणत्याही मित्रमैत्रिणीच्या घरी. मग संध्याकाळ होईपर्यंत गप्पाटप्पा, मजामस्ती, एखादा सिनेमा आणि फोटो काढणं यात वेळ असाच निघून जायचा. मग अगदी अंधार पडायला लागल्यावर जरा नाखुषीनेच निरोप घ्यावा लागायचा. घरी जाऊन पुन्हा त्याच दोस्तांशी सोशल मिडियावर तासनतास बोलायचं. उद्या कुठे, कसं भेटायचं ते ठरवायचं आणि कधीकधी अचानक स्लीपोव्हर प्लॅन करायचा. असा असायचा अकरावी- बारावीतला जवळपास प्रत्येक दिवस. हा सीन चालू होता पहिले लॉकडाऊन लागेपर्यंत.

 

आता ऑगस्ट महिना चालू आहे. मी माझ्या मित्रमंडळींना कधीपासून भेटलेले नाही. सकाळी झोपेतून उठलं की पटकन चांगला शर्ट आणि घरातलीच पँन्ट घातलेल्या अवस्थेत ऑनलाईन क्लासला हजेरी लावायची. स्वत:च आवरता आवरता, रेंगाळत रेंगाळत जेवणाची वेळ झाली की नाश्ता आणि जेवण सोबतच करायचं. संध्याकाळपर्यंत इन्स्टाग्राम, नेटफ्लिक्स, यु- ट्यूब, हाऊसपार्टी याच चार ॲप्समध्ये फिरत रहायचं. रात्री किचनमध्ये स्वत:च काहीतरी प्रयोग करून पहायचा. छान झालंच तर घरातल्यांना हौशेने खाऊ घालायचं. रात्री दोन- तीन पर्यंत मित्रमैत्रिणींसोबत एकतर चॅटिंग करायचं नाहीतर नेटफ्लिक्स पार्टी अटेंड करायची. हे कॉन्ट्रॅडिक्शन पाहून आश्चर्य वाटतं.

 

कसं बदललं हे सगळं ? कुठे गेलं ते रोज एवढ्या लोकांसोबत हँगआऊट करणं?, आता काय करते मी?, हे अजून किती दिवस चालणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या दोस्त कंपनीला पुन्हा कधी भेटता येईल?

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात मैत्रीचं स्वरूप पालटलंय, पण संकल्पना मात्र तीच आहे. सोशल डिस्टंसिंगमुे मैत्री मेंटेन करणं अवघड झालंय का ? हो नक्कीच. पण त्यामुळे मानसिक दुरावा निर्माण झालाय का ? मुळीच नाही. अनेक महिने एकमेकांना प्रत्यक्षात न पाहूनसुद्धा आमची मैत्री, एकोपा आणि प्रेम यात जराही फरक पडलेला नाही.

उलट या काळात आम्हाला खरी आपली माणसं आणि केवळ ओळखीचे लोक यातली ठरठशीत रेष दिसून आली. सगळेच आपले सखे नसतात, हे ही समजलं. रोज भेटणारे, आपल्यासोबत पार्टी करणारे, इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करणारे सगळेच लोक आपण शहर सोडून गेल्यावर आठवण काढणारे नसतील, हे लक्षात आलं. आम्ही सगळेच 'आपली माणसं' ओळखायला शिकलो. 


कोण अजूनही आपल्याला अधूनमधून फोन करतं ?, कोण केवळ दिसलं म्हणून बोलतं ?, कोण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बोललेलंच नाही ? कोणाला वाढदिवसाचं व्हिडियो कॉल इन्व्हीटेशन पाठवावं? कोणी फक्त नेटफ्लिक्स पासवर्ड हवा म्हणून एकदा मेसेज केला होता? अशा छोट्या छोट्या गोष्टी आता महत्त्वाच्या वाटायला लागल्या आहेत. आधी आणि आता यातलं कॉन्ट्रॅडिक्शन पाहून हसून येतं. 
'सोशल मिडिया शाप की वरदान?' असे घिसेपिटे निबंधाचे विषय देणारे शिक्षकही आता त्याच माध्यमातून ऑनलाईन क्लासेस घेताता. आता मात्र त्यांनी सोशल मिडिया हे लॉकडाऊनपुरतं तरी वरदान आहे, हे मान्य करायला हरकत नाही. 


एकमेकांना न भेटताही मजा मस्ती कशी कराची हे मात्र आम्ही चांगलं शोधून काढलंय. एकमेकांना मीम्स पाठवून स्पॅम करणं, व्हिडियो कॉन्फरन्सवर गप्पा किंवा वाढदिवस सेलिब्रेट करणं, नेटफ्लिक्स पार्टी हे फिचर वापरून सोबत मुव्हीज पाहणं आणि चॅटिंग करणं, असे विविध उपाय आम्ही वापरतो. पण तरीही टेक्नोसेव्ही असूनही लॉकडाऊनच्या लाईफस्टाईलमध्ये रूळलेलो नाही. पण अनेक नवनवे उपाय शोधून एकमेकांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न मात्र जरूर करतोय.
लॉकडाऊनआधी खूप वेळ सोबत घालवल्याने आमच्यासाठी प्रत्येकच दिवस फ्रेंडशिप डे असतो. पण ग्लोबल पॅन्डेमिक असो किंवा आणखी काही... आमची दिल दोस्ती दुनियादारी कायम टिकून राहील.
 

Web Title: Friendship Day 2021 : corona effect, virtual celebration of friendship...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.