आज जगभरात फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणींप्रती, प्रेम, आदर दाखवण्यासाठी खास दिवस साजरा केला जातो. कारण वर्षभरात भेटणं झालं असो किंवा नसो फ्रेंडशिप डे ला आपली मैत्रिण किंवा मित्रानं आपल्याला वेळ द्यायला हवा असं वाटत असतं. फ्रेंडशिप डे ला पार्टनरला, मैत्रिणीला किंवा मित्राला कमीत कमी पैश्यात काय गिफ्ट देता येईल याबाबत आयडिया देणार आहोत. गिफ्ट्स अधिक सुंदर करण्यासाठी ते आकर्षकरित्या पॅक केलं जातं. पॅक करण्यासाठी तुम्ही Eco-Friendly गिफ्ट पॅकिंग किंवा सिंपल गोल्डन टच गिफ्ट पॅकिंग,मल्टी कलर गिफ्ट पॅकिंग, Flower Design गिफ्ट पॅकिंग करू शकता.
इयरफोन्स
इयरफोन्स ही प्रत्येकाच्याच वापरातील वस्तू आहे. एखाद्या दिवशी इयरफोन्स सापडत नसतील किंवा व्यक्ती विसरली तर किती चिडचिड होते तुम्हाला कल्पना असेलच. इयरफोन्स गिफ्ट दिल्यानंतर ती व्यक्ती त्याचा रोज वापर करू शकेल आणि गिफ्ट पाहून फार आनंद होईल. बाजारात रेडमी इयरफोन 2 सी, वनप्लस बड्स झेड, आणि रियलमी बड्स क्यू 2 यासह अनेक उत्पादने बाजारात आहेत.
रेडमी इअरफोन 2 सी मध्ये कॉम्पॅक्ट केस, चार्जिंग केसमध्ये 12 तास प्लेबॅक, चांगल्या आवाजासह स्टाईलिश डिझाइन आहे. IPX4 Lachin मध्ये ऑफर केलेले इयरफोन अधिकृत वेबसाइटवर 1,499 रुपयांमध्ये आहेत. OnePlus Buds Z आणि Realme Buds Q2 ची किंमत अनुक्रमे 2,999 आणि 2,499 रुपये आहे. याशिवाय तुम्ही कमी किमतीचे इअरफोन्स देऊनही फ्रेंडशिप डे साजरा करू शकता.
ज्वेलरी
महिलांना दागिन्यांची खूप हौस असते. त्यामुळे तुम्ही मैत्रिणीला तिला आवडत असलेला छानसा दागिना गिफ्ट करा. ईयरिंग्स, ब्रेसलेट, पेंडेंट, नेकपीस अशा बजेटमधील विविध गोष्टी गिफ्ट करू शकता. तुम्हाला ऑनलाईन ज्वेलरीचे खूप ऑप्शन्स मिळतील आपल्याला आवडेल ती विकत घेऊन तुम्ही तिच्या किंवा त्याच्या पत्त्यावर पाठवू शकता.
घड्याळ
बाजारात विविध आकाराची आणि रंगाची आकर्षक घड्याळं मिळतात. सध्या डिजीटल वॉचची चर्चा रंगली आहे. तुम्ही स्मार्ट वॉच गिफ्ट करू शकता. पाकिट, पॉवर बँक, गॉगल, वॉच, पर्सनलाईज्ड फोन कव्हर यासारख्या लागणाऱ्या गोष्टी देखील गिफ्ट करून फ्रेंडशिप डे साजरा करू शकता.
स्पीकर्स
सध्या लोक आपला जास्तीत जास्त वेळ घरी बसून घालवत आहेत. स्मार्ट स्पीकर्स या दिवसात बराच केला जात आहे. बाजारात ऑनलाईन आणि ऑफलाईन असे अनेक स्मार्ट स्पीकर्स आहेत. अॅमेझॉन इको डॉट आणि मी वाय-फाय स्मार्ट स्पीकर्स हे सर्वात लोकप्रिय आहेत. आधीची किंमत 3,499 रुपये आणि नंतरची किंमत 3,499 रुपये आहे.