Join us  

Friendship Day 2022 : लांब असणाऱ्या मित्रमैत्रीणींना मिस करताय? फ्रेंडशिप डे करा यादगार; 3 हटके आयडीया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2022 11:17 AM

Long Distance Friendship Day Celebration Ideas : मैत्रीचा हा स्पेशल दिवस दूर राहूनही करा खास सेलिब्रेट...

ठळक मुद्देआजच्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या मित्रमंडळींना आवर्जून व्हिडिओ कॉल कराकेक किंवा चॉकलेट, आइस्क्रीम अशाप्रकारच्या त्यांच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी आपण ऑर्डर करुन पाठवू शकतो. 

मित्रमंडळी आपल्या आयुष्यात काय असतात हे ज्याचे त्यालाच माहित. अगदी शाळेपासूनची मैत्री असो किंवा कालपरवा नव्याने झालेली मैत्री असो या मित्रमंडळींची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. आपली सगळी सिक्रेटस, आवडीनिवडी अशा असंख्य गोष्टी ज्यांना माहित असतात, सोबत सतत सोबत नसूनही जे कायम आपल्या सोबत असतात असे मित्रमंडळी आपल्यासाठी कायमच खास असतात. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभरात याच मैत्रीचे सेलिब्रेशन करण्यासाठी साजरा केला जातो. आपण कित्येक वर्ष ज्या मित्रमैत्रीणींच्या सोबतीने घालवली ते मित्रमैत्रीणी कायम आपल्या सोबतच असतात असं नाही (Friendship Day 2022). कधी शिक्षणाच्या निमित्ताने तर कधी नोकरीच्या निमित्ताने ते दुसऱ्या शहरात, राज्यात राहत असतात. काही वेळा मुलींच्या बाबतीत लग्नानंतर त्या दुसऱ्या शहरात गेल्याने भेट होणे अवघड होते. आपली मैत्रिण किंवा मित्र कितीही दूर असला तरी आपल्या मनात त्यांची जागा कायम असते. आजच्या फ्रेंडशिप डे (Friendship Day Special) च्या  निमित्ताने आपल्या या जुन्या पण खास असलेल्या मित्रमैत्रीणींना आपण खूप मिस करतो. आजचा फ्रेंडशिप डे त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठीही स्पेशल व्हावा यासाठी आपण काय करु शकतो अशा काही खास आयडीया (Long Distance Friendship Day Celebration Ideas)...

(Image : Google)

१. रोप किंवा बुके ऑर्डर करा

आपली फ्रेंडशिप ही कायम बहरणारी असते. ती येणाऱ्या काळात आणखी बहरत जावी यासाठी आपण आपल्या खास मित्रमंड़ळींना या निमित्ताने एखादे छानसे रोप देऊ शकतो. हे रोप आपल्या मैत्रीचे प्रतिक म्हणून कायम आपल्या मित्रासोबत किंवा मैत्रीणीसोबत राहू शकेल. यामध्ये आपण फुलझाडे किंवा छानशी शोभेची झाडेही देण्याचा विचार नक्कीच करु शकतो.त्यामुळे पर्यावरणालाही थोडा हातभार लागेल आणि त्या रोपांना फुले आल्यावर आपल्या मित्रमैत्रीणींना आपली छानशी आठवण सोबत राहील. रोप देणे शक्य नसेल तर एखादा छानसा बुके, फुले अशीही आपण ऑनलाइन ऑर्डर करुन त्याच्या किंवा तिच्या घरी पाठवू शकतो. 

२. केक, चॉकलेट किंवा आवडीचे पदार्थ

आपल्या मित्रमैत्रीणींना काय आवडते हे साधारणपणे आपल्याला माहित असते. त्यांच्या आवडीनुसार एखादा खाण्याचा स्पेशल पदार्थ आपण नक्कीच ऑनलाइन ऑर्डर करुन त्यांच्या घरी पाठवू शकतो. सध्या अनेक ऑनलाइन फूड कंपन्या अशाप्रकारची सर्व्हीस देतात. मात्र असे करताना मित्र किंवा मैत्रीण घरात आहेत की नाही याचा अंदाज घेऊन मगच ऑर्डर करायला हवे नाहीतर आपण प्रेमाने पाठवलेले अन्न खराब होऊन वाया जाऊ शकते. पदार्थ पाठवणे शक्य नसेल तर केक किंवा चॉकलेट, आइस्क्रीम अशाप्रकारच्या त्यांच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी आपण ऑर्डर करुन पाठवू शकतो. 

(Image : Google)

३. व्हिडिओ कॉल तरी कराच

आपला खास दोस्त परदेशात किंवा एखाद्या दूरच्या राज्यात असेल तर आपल्याला या दिवशी काहीतरी ऑर्डर करुन पाठवणे शक्य होईलच असे नाही. पण आपण या निमित्ताने आपल्या मित्रमंडळींना एक व्हिडिओ कॉल आवर्जून करु शकतो. सध्या व्हॉटसअॅप किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांमुळे आपले बोलणे कमी होते आणि मेसेजवर चॅटींग करणेच जास्त होते. एकमेकांच्या वेळा मॅच होत नसल्याने किंवा आपण सगळेच आपल्या रोजच्या धावपळीत बिझी असल्याने आपले बोलणे होतेच असे नाही. मात्र आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या मित्रमंडळींना आवर्जून व्हिडिओ कॉल करा आणि त्यांच्याशी छान गप्पा मारा. यामुळे तुम्हाला आणि त्यांनाही छान वाटेल. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप