अतिशय गोड चेहरा आणि मोहक हास्य असणारी दाक्षिणात्य अभिनेत्री जेनेलिया डिसुझा आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याच्या प्रेमात पडली. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर त्यांची खरीखुरी लव्हस्टोरी खुलत गेली आणि दोघेही घरच्यांच्या सहमतीने विवाह बंधनात अडकले. यानंतर मग विलासराव देशमुख यांची सून झालेली जेनेलिया अवघ्या महाराष्ट्राचीच सूनबाई म्हणून ओळखली जाऊ लागली. रितेश आणि जेनेलिया हे सध्या बॉलीवूडमधलं एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. जेनेलियाचं एक चांगली पत्नी म्हणून तर नेहमीच कौतूक होतं पण रितेशच्या आई म्हणजचे वैशाली देशमुख (Viral post of Genelia for Ritesh Deshmukh's mother Vaishali) यांच्याशीही जेनेलियाचं एक खूप छान मैत्रीपूर्ण नातं आहे. त्याचाच आता पुन्हा एकदा प्रत्यय आला असून जेनेलियाने त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा (birthday wishes) देण्यासाठी जी पोस्ट लिहिली आहे, ती सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. (Genelia D'souza's mother in law)
जेनेलिया सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. रितेशसोबतचे तिचे वेगवेगळे रिल्स तर सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. आता मात्र तिने तिच्या सासुबाईंसाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. वैशाली देशमुख यांचा दोन दिवसांपुर्वी वाढदिवस झाला.
गरब्यासाठी जाताना २ मिनिटांत करा केस काळे, बघा ३ स्प्रे- डाय न करता केस होतील क्षणात काळेभोर
त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जेनेलियाने वैशाली यांचा जेनेलिया आणि रितेश यांच्या दोन्ही मुलांसोबतचा एक छानसा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्यांना शुभेच्छा देताना ती म्हणतेय की आई एक प्रगतशील, पुरोगामी विचारांची स्त्री कशी असते हे मला दाखवल्याबद्दल, शिकवल्याबद्दल खूप आभार, तुम्ही तुमची स्वत:ची मुलगी समजून माझ्यावर प्रेम करता, दररोज माझं मराठी थोडं थोडं सुधारता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी सासू न होता माझी आई झालात, याबद्दल खूप खूप थँक्यू...
या पोस्टवरून जेनेलियाचं आणि वैशाली यांचं नात कसं असेल याचा अंदाज येतो. पोस्टमध्ये सगळ्यात शेवटी जेनेलियाने वैशाली यांच्या उत्साही स्वभावाचंही खूप कौतूक केलं आहे.
जुने कप आता पिवळे- कळकट दिसतात? ३ पदार्थ वापरून करा सोपा उपाय, कप चमकतील पुन्हा नव्यासारखे
संपूर्णपणे वेगळ्या संस्कृतीमधून आलेल्या जेनेलियाला एका मराठी कुटूंबाशी स्वत:ला जुळवून घेणं सुरुवातीला कठीणच गेलं असणार. पण वैशाली यांच्यासारखी सासू पाठीशी असल्याने हा तिचा प्रवास निश्चितच सोपाही झाला असणार.