Lokmat Sakhi >Relationship > तरुण जोडप्यांची भलतीच डेट! आता कॉफी नी लंच डेट विसरा, पाहा डेटवर जाण्याचा भलताच ट्रेण्ड

तरुण जोडप्यांची भलतीच डेट! आता कॉफी नी लंच डेट विसरा, पाहा डेटवर जाण्याचा भलताच ट्रेण्ड

Relationship Tips: Generation z date plan: First date plan: Young couples are reinventing first dates: How to make a first date feel less like an interview: First date not the fairytale you were expecting it to be: Couple first date plan: new trend for couple : तरुणांची डेट करण्याची पद्धत बदलतेय, भूतकाळात रमण्यापेक्षा या गोष्टींची प्रचंड आवड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2025 17:02 IST2025-02-18T17:02:00+5:302025-02-18T17:02:53+5:30

Relationship Tips: Generation z date plan: First date plan: Young couples are reinventing first dates: How to make a first date feel less like an interview: First date not the fairytale you were expecting it to be: Couple first date plan: new trend for couple : तरुणांची डेट करण्याची पद्धत बदलतेय, भूतकाळात रमण्यापेक्षा या गोष्टींची प्रचंड आवड...

Generation z reinventing first dates new couple trend feel less like an interview Not coffee and lunch enjoying gym spa zumba | तरुण जोडप्यांची भलतीच डेट! आता कॉफी नी लंच डेट विसरा, पाहा डेटवर जाण्याचा भलताच ट्रेण्ड

तरुण जोडप्यांची भलतीच डेट! आता कॉफी नी लंच डेट विसरा, पाहा डेटवर जाण्याचा भलताच ट्रेण्ड

आपल्याला एखादी व्यक्ती आवडू लागली आपण तिच्यासाठी सारं काही करायला तयार असतो. मग ती म्हणेल ती पूर्व दिशा असचं काहीसं आपलं गणित. प्रेमात पडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं बहुतेक होतं असावं. तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी काही स्पेशल करण्यापासून ते त्याच्या किंवा तिच्या आवडी-निवडीवर अधिक भर दिला जातो.(How to make a first date feel less like an interview) नुकताच व्हॅलेंटाइन विक झाला. काहींनी आपल्या प्रेमाची कबुली दिली तर काही अजूनही प्रेमाच्या शोधात असतील... (Generation z date plan)


अनेकांनी आपली पहिली डेट खास करण्यासाठी कॉफी, डिनर डेट प्लान केली असेलच. पण सध्या हे चित्र उटलटताना पाहायला मिळतं आहे. महागड्या रेस्ट्रो-बार, डिनर किंवा कॉफी डेटला जाण्याऐवजी आपल्या जोडीदाराला सगळ्यात जास्त काय आवडतं यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. मग त्यात झुम्बा डान्स, व्यायाम असो किंवा अजून काही. (Young couples are reinventing first dates)

वयाची तिशी ओलांडली म्हणून लग्न जमवण्याची घाई करताय? तरीही जोडीदार निवडताना ५ चुका नकोच


जोडप्यांच असं मत आहे की, कॉफी डेटवर आपल्या पार्टनरसोबत दडपणात राहण्यापेक्षा आम्हाला ज्या गोष्टी सर्वात अधिक आवडतात त्यावर भर देऊ. मग ते पॉटरी मेकिंग असो, पुस्तक संमेलन असो किंवा एखाद्या नर्सरीमध्ये जाऊन रोपट खरेदी करणं असो. यापूर्वीचं डेटिंग म्हणजे फक्त एकमेकांचा भूतकाळ किंवा अर्थव्यवस्थेच गणित. त्याच त्या गप्पा मारण्यापेक्षा काही नवीन आठवणी कशा गोळा करता येतील यावर ते अधिक भर देताय. 


त्यांच असं मत आहे की, भूतकाळातील कटू आठवणीत जगण्यापेक्षा आपण एकमेकांसोबत आताचे क्षण जगायला हवे. दिल्लीतील अनेक मुले मुली इतिहासाच्या शोधात आहे. ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन त्यांची माहिती गोळा करताय. बंगळुरुमध्ये जोडपी टँगो, साल्सा आणि रसायनशास्त्राविषयी अधिक माहिती घेताय. पुण्यातील एका श्रीमंत घराण्यातील मुलांन असं सांगितलं की, डेटच्या नावाखाली दारु पिण्याचं वाईट व्यसन असू शकतं. म्हणून तरुण जोडपी शहराच्या बाहेर शांत जागा, तलाव किंवा टेकड्यांच्या शोधात आहे. डेटवर तु असं केलंस, तुझं चुकलं किंवा रात्री तु लवकर झोपला अशा गोष्टींवरुन भांडण्यापेक्षा त्या क्षणाला आणखी मजेशीर करण्यासाठी लुडो खेळण्याचा पर्याय देखील त्यांना चांगला वाटतोय. 

A टू Z डेटिंग 

२० वर्षाच्या तरुण पिढीत हे  A टू Z डेटिंगचं प्रमाण वाढलं आहे. एका जोडप्याने शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याची अधिक प्रमाणात काळजी घेतली. आयुर्वेदिक स्पा, प्राणीसंग्रहालय किंवा झुम्बा क्लासला प्राधान्य दिला तर, दुसऱ्या मुलीने तिची डेट एका बुक शॉपमध्ये केली. एकमेकांसाठी काल्पनिक कथाची पुस्तक निवडली. पुढच्या डेटमध्ये या पुस्तकांना एकमेकांसोबत एक्सचेंज केलं. एका आर्किटेक्टने तिच्या दुसऱ्या डेटला जिम क्लासला चक्क हजेरी लावली. या A टू Z डेटिंगमध्ये एकमेकांना पाहाण्यापेक्षा त्यांना त्यांच्या आवडी-निवडीतून समजून घेणे फार जास्त चांगलं वाटतं. 


काहींनी तर असं म्हटलं की, कॉफी किंवा डिनर डेटवर पैसे खर्च करण्यापेक्षा मांजरीच्या पिल्लांसोबत खेळा. ते पैसे कॅट कॅफेमध्ये घालवा. दक्षिण दिल्लीतील मुली या बागेत फिरणे, पिकनिक स्पॉट्स किंवा नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टमध्ये जाऊन गोष्टींचे विश्लेषण करताय. यामुळे वेळ ही घालवता येतो आणि आपल्याला आवडण्याऱ्या गोष्टींवर चर्चाही करता येते. बंगळुरुमधील काही तरुण जोडपी सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहाण्यासाठी जाताय, त्या रम्य संध्याकाळी आपल्या भावना व्यक्त करताय. या गोष्टीमध्ये नात्यात यश मिळण्यापेक्षा त्यांना आनंद फार महत्त्वाचा आहे. 


काही नवीन युगातील क्रेडिट कार्डधारकांना ऑरा फार्मिंगची उत्तम कला सापडली. त्यांनी डेटिंग अॅप्स, इंस्टाग्राम आणि बीरियलवर काही लोकांचे अनुभव गोळा केले. त्यासाठी त्यांनी अॅक्टिव्हिटी डेट्स उत्तम असं सांगितलं. तुम्ही अमुक ठिकाणी पार्टनरसोबत आहात, तिथलं नयनरम्य वातावरण तुमच्या मनातील भावनांमध्ये अधिक भर घालतंय अशी कल्पना करा. ज्यामुळे तुमच्यात एक वेगळाच ऑरा येईल. दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये हक्क आणि धोरणांवर चर्चा केली, ज्यामध्ये त्याचा पराभव झाला. त्यानंतर त्याला असं समजलं की, आपण त्याच गोष्टीत सहभागी व्हायला हवं ज्यामध्ये आपण खरोखर टिकू शकतो. या A टू Z डेटिंगचा ट्रेंड जनरेशन झेडमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. 

 

Web Title: Generation z reinventing first dates new couple trend feel less like an interview Not coffee and lunch enjoying gym spa zumba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.