Join us  

अनेक वर्षे सुखी संसार करुनही जोडपी घटस्फोट का घेतात? ग्रे डिव्होर्स हे काय नवीनच प्रकरण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 5:47 PM

Gray Divorce: Why Older Couples Are Splitting Up More Often : नाही पटलं तरी लोक काय म्हणतील म्हणून घटस्फोट अनेकजण घेत नाहीत, पण काहीजण तसा निर्णय घेतात कारण..

घटस्फोटांची आपल्या समाजात लग्नाइतकीच किंवा त्यापेक्षाही जास्त चर्चा होते (Grey Divorce). जोडीदारांचं एकमेकांशी पटत का नाही हे त्यांचं त्यांनाच माहिती असतं (Relationship). बाकीच्यांना मात्र धक्का बसतो की यांचं तर सगळं चांगलं चाललं होतं. मुलंबाळं आहेत. मग एकदम काय बिनसलं, घटस्फोट का घेतात? त्यात काहीजण घटस्फोटानंतरही मित्र असतात, एकमेकांना आनंदाने भेटतात.

मुलांसह सहलीला जातात, मुलांचं पालनपोषण करतात. काही मात्र आपल्या नात्याची धूणी जाहीर समाजमाध्यमात धूतात. आणि आता सध्या चर्चा आहे ती म्हणजे ग्रे डिव्होर्सची. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट असाच गाजला, त्यानंतर अनेकांना ग्रे डिव्होर्स ही संकल्पना समजली. नक्की असतं काय ते प्रकरण?(Gray Divorce: Why Older Couples Are Splitting Up More Often).

ना रनिंग - ना जिम, आर. माधवन झाला सुपरफिट, पाहा त्यानं कसं घटवलं २१ दिवसात वजन

ग्रे डिव्होर्स म्हणजे काय?

 ग्रे डिव्होर्स म्हणजे वयाची पन्नाशी गाठलेल्यांनी घेतलेला घटस्फोट. ज्यांनी अनेक वर्षे एकत्र संसार केला, मुलंही मोठी झाली त्यानंतर त्यांनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं. त्याला म्हणतात ग्रे डिव्होर्स. १९९०च्या दशकापासून त्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेत दर चारपैकी  एक घटस्फोट  ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील जोडप्यांचा होतो.

वयात अंतर मोठं पण संसार सुखाचा! पाहा सेलिब्रिटी कपल ज्यांच्या नात्यात ‘वय’ आलं नाही, उलट..

ग्रे घटस्फोट कशामुळे होतो?

ग्रे डिव्होर्स होण्यामागे अनेक कारणं असू शकतात.  एकमेकांशी न पटणे, नात्यात रस नसणे, मनासारखं जगण्याची ओढ, आर्थिक स्वातंत्र्य, जीवनशैलीविषयी वेगळ्या कल्पना किंवा नवीन जोडीदार आवडणे. आर्थिकदृष्टया दोघे एकमेकांवर अवलंबून नसल्याने केवळ पैसा आणि सुरक्षितता म्हणून किंवा लोक काय म्हणतील म्हणून एकत्र राहणं कमी झालं.

टॅग्स :घटस्फोटरिलेशनशिप