मुलगा असो की मुलगी, लग्न हा दोघांच्याही आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यात बदल येऊ लागतात. (Relationship Tips) काही लोक त्यांच्या जीवनातील या बदलांशी सहजपणे जुळवून घेतात, तर अनेक जोडपी लग्नानंतर होणारे बदल समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी वेळ घेतात. जर त्यांनी हे बदल सकारात्मकतेने घेतले तर काही हरकत नाही अन्यथा वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतात. (Marriage tips for bride and groom should do these things before wedding)
- लग्नानंतरच्या बदलांना सामोरं जाण्यासाठी मुलगा आणि मुलगी प्रत्येक प्रकारे तयार असले पाहिजे. दोन व्यक्ती लग्नासाठी तयार होतात, पण अनेकदा लग्नानंतर त्यांना वाटू लागते की आपल्याला या नात्यातून बाहेर पडायला हवं. लग्न हे कल्पनेच्या जगाबाहेर घडते.
-लग्नाआधी तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराशी एकदा तरी बोलले पाहिजे. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरकडून काय अपेक्षा ठेवता हे मोकळेपणानं बोला. ज्याच्याशी तुम्ही लग्न करणार आहात, त्याचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, हे तुम्ही आधीच जाणून घ्या.
- लग्नाआधी तुमच्या जोडीदाराला विचारा किंवा सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगा. उदाहरणार्थ, लग्नानंतर नोकरी मिळवण्यासाठी मुलीची काय योजना आहे आणि मुलाला काय हवे आहे. याशिवाय मुलगा लग्नानंतर दुसऱ्या शहरात किंवा देशात शिफ्ट होण्याचा विचार करतो का आणि तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आधीच सांगा.
- प्रत्येक मुलाला किंवा मुलीला आपल्या जोडीदारामध्ये सर्वोत्तम जीवनसाथी हवा असतो. म्हणूनच लग्नाआधी तुम्ही मानसिक आणि शारीरिक दिसण्यावर काम करणे महत्त्वाचे आहे. तुमची पर्सनॅलिटी आत्मविश्वास पूर्ण कशी दिसेल असा प्रयत्न करा.
- लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघांचीही जबाबदारी वाढते. कौटुंबिक, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी खर्चही वाढतो. मुलगा आणि मुलगी दोघांनाही त्यासाठी तयार राहावे लागते. लग्नाआधीच दोघांनी यासाठी तयार असायला हवं.