Lokmat Sakhi >Relationship > प्यार के 'हेल्दी' साईड इफेक्टस! प्रेमात पडा आणि तंदुरुस्त व्हा, वाचा ५ आरोग्य फायदे

प्यार के 'हेल्दी' साईड इफेक्टस! प्रेमात पडा आणि तंदुरुस्त व्हा, वाचा ५ आरोग्य फायदे

प्रेमात पडणे ही काही ठरवून केलेली प्रोसेस असू शकत नाही. लव्ह ॲट फर्स्ट साईट असो, की सहवासातून निर्माण झालेले प्रेम असो. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या मनात 'क्लिक' होतेच तेव्हाच प्यार हो जाता है.... या प्रेमाचेही काही 'हेल्दी' साईड इफेक्ट्स असतात... जे आपल्याला ठेवतात फिट ॲण्ड फाईन....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 01:33 PM2021-06-27T13:33:58+5:302021-06-27T13:42:40+5:30

प्रेमात पडणे ही काही ठरवून केलेली प्रोसेस असू शकत नाही. लव्ह ॲट फर्स्ट साईट असो, की सहवासातून निर्माण झालेले प्रेम असो. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या मनात 'क्लिक' होतेच तेव्हाच प्यार हो जाता है.... या प्रेमाचेही काही 'हेल्दी' साईड इफेक्ट्स असतात... जे आपल्याला ठेवतात फिट ॲण्ड फाईन....

'Healthy' side effects of love! Fall in love and get fit, read 5 Health Benefits | प्यार के 'हेल्दी' साईड इफेक्टस! प्रेमात पडा आणि तंदुरुस्त व्हा, वाचा ५ आरोग्य फायदे

प्यार के 'हेल्दी' साईड इफेक्टस! प्रेमात पडा आणि तंदुरुस्त व्हा, वाचा ५ आरोग्य फायदे

Highlightsअमेरिकेच्या आरोग्य सेवा विभागाने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार एकमेकांवर भरभरून प्रेम करणाऱ्या विवाहित जोडप्यांना रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराचा धोका कमी असतो.जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते आणि जोडीदारावर भरभरून प्रेम करू लागते, तेव्हा डोपामाईन आणि ऑक्सिटोसिन या न्यूरोकेमिकल्सचे सिक्रीशन वाढते आणि त्यामुळे आनंदी, उत्साही वाटू लागते.

प्रेमात पडल्यावर कधी 'कुछ कुछ' व्हायला लागते, तर कधी पोटात हजारो फुलपाखरे उडू लागतात. कधी हवेत तरंगल्यासारखे वाटते, तर कधी आपल्याला काय होते आहे, हेच समजत नाही. पण प्रेमात पडल्यावर  फक्त  एवढेच होत नाही बरं का. प्रेम आपल्याला आनंद तर देतेच, पण आपल्या शरीराला देखील हेल्दी  ठेवते. प्रेमाचे  अनेक फायदे आहेत आणि प्रेमात पडल्यावर आपल्या शरीरात बरेच सकारात्मक बदल होत जातात, हे काही  वर्षांपुर्वी अमेरिकेत झालेल्या अभ्यासानुसार सिद्ध झालेले आहे. म्हणूनच तर फिट रहायचे असेल तर लवकर प्रेमात पडा आणि आपल्या जोडीदारावर भरभरून प्रेम करा.

 

प्यार के 'हेल्दी' साईड इफेक्टस....
१. स्ट्रेस होतो कमी

प्रेम नवं नवं असेल, तर आपली प्रिय व्यक्ती दिसताच हार्टबीट्स वाढू लागतात. पोटात गुदगुल्या होऊ लागतात आणि डोळे चमकू लागतात. हे सगळे बदल अतिशय आनंदामुळे झालेले असतात. त्यामुळे आपण काही काळ तरी स्ट्रेस फ्री होऊन जातो. सगळे तणाव, टेन्शन विसरतो आणि फक्त आपल्या जोडीदारावर कॉन्सन्ट्रेट करताे. 

२. मेंदूही होऊन जातो प्रफुल्लित 
आपली प्रिय व्यक्ती आपल्याला भेटली, की आपला 'दिल' खूश होऊन जातो, असे आपण ऐकलेले असते. पण प्रेमाचा असर दिल के साथ साथ अपने दिमाग पे भी हो जाता आहे. प्रिय व्यक्ती दिसताच आपल्या मेंदूमध्ये काही हार्मोन्स स्त्रवू लागतात. यालाच सोप्या भाषेत आपण 'केमिकल लोचा' म्हणतो. यामुळे आपला मेंदू प्रफुल्लित होतो आणि कोणत्याही नव्या कामासाठी ॲक्टीव्ह असतो.

 

३. हृदयरोगाचा धोका होतो कमी
हृदय आणि प्रेम यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. कारण प्रेमात पडल्यावर आपण आपल्या प्रिय व्यक्तीला आपले हृदयच तर देत असतो ना. हा गमतीचा भाग सोडला, तर प्रेमात पडलेल्या व्यक्तींना हृदयरोगाचा धोका कमी होत जातो, असे काही यासंदर्भात झालेले काही अभ्यास सांगतात. अमेरिकेत झालेल्या या अभ्यासात प्रेमात पडलेल्या व्यक्ती आणि प्रेमात  नसलेल्या  व्यक्ती  यांच्यातील हृदयरोगांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता. 

४. रक्तदाब राहतो कंट्रोलमध्ये
प्रेमात पडल्यावर हृदयाची धडधड वाढत असली तरी ती तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त असते,  असे तज्ज्ञ सांगतात. तुमचा जोडीदार तुमच्या सोबत असल्याने तुम्ही स्वत:ला सुरक्षित समजू लागता. ही सुरक्षिततेची जाणीवच तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 

 

५. डिप्रेशन होते दूर
प्रेमात पडल्यावर नैराश्य, उदासिनता, नकारात्मकता हे सगळे हळूहळू दूर होऊन जाते. त्यामुळे प्रेमात पडलेल्या व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे. जोडीदाराचा स्पर्श किंवा त्याचा एखादा फोटोदेखील मनाला उभारी देणारा असताे. त्यामुळे जेव्हा खूप डिप्रेस झाल्यासारखे वाटत असेल, तेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो पहावा, असेही सांगितले आहे. 

Web Title: 'Healthy' side effects of love! Fall in love and get fit, read 5 Health Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.