Lokmat Sakhi >Relationship > सेक्स केल्यामुळे किंवा लग्न झाल्यानंतर महिलांचं वजन वाढतं, हे खरंय का? डॉक्टर सांगतात, नक्की खरं काय

सेक्स केल्यामुळे किंवा लग्न झाल्यानंतर महिलांचं वजन वाढतं, हे खरंय का? डॉक्टर सांगतात, नक्की खरं काय

Here's why you gain weight after marriage : अनेक अभ्यासातून हे समोर आलं आहे की एक हेल्दी  रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 08:37 AM2023-08-16T08:37:00+5:302023-08-19T13:10:55+5:30

Here's why you gain weight after marriage : अनेक अभ्यासातून हे समोर आलं आहे की एक हेल्दी  रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

Here's why you gain weight after marriage : Is having sex or getting married causes weight gain | सेक्स केल्यामुळे किंवा लग्न झाल्यानंतर महिलांचं वजन वाढतं, हे खरंय का? डॉक्टर सांगतात, नक्की खरं काय

सेक्स केल्यामुळे किंवा लग्न झाल्यानंतर महिलांचं वजन वाढतं, हे खरंय का? डॉक्टर सांगतात, नक्की खरं काय

सेक्स केल्यानं वजन वाढतं, लग्नानंतर लोक जाड होतात, असे अनेक समज -गैरसमज लोकांच्या मनात असतात.  लग्नानंतर पुरूष आणि महिला दोघांचेही वजन वाढू लागतं याचं कारण लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या  सवयी आणि वर्कआऊट रूटीन असू शकतं. सोशल मीडियावर याबाबत अनेक प्रश्न विचारले जातात स्त्री रोग विशेषज्ज्ञ डॉ रितु सेठी  यांनी हेल्थ शॉट्सशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Is having sex or getting married causes weight gain or obecity know facts by gynecologist)

हॅप्पी हॉर्मोन्स लठ्ठपणाचं कारण ठरतात (Here's why you gain weight after marriage)

अनेक अभ्यासातून हे समोर आलं आहे की एक हेल्दी  रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. वजन वाढण्यामागे सेक्स नाही तर शरीरातून बाहेर येणारे हॉर्मोन्स जबाबदार असतात. हे हॉर्मोन्स कोणते, याचा  कसा इफेक्ट होतो ते समजून घेऊ.

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये वजन वाढलेलं दिसून येतं. याचं कारण हेल्दी रिलेशनशिप किंवा त्यांची हेल्दी मेंटल कंडिशन असू सकते. रिसर्चनुसार हॅप्पीली मॅरिड कपल्सना एखाद्या सिंगल व्यक्तीच्या तुलनेत जास्त भूक लागते. यामुळे त्यांचे कॅलरी इन्टेक वाढते आणि अधिक वजन वाढतं.

डॉक्टरांच्या मते सेक्समुळे वजन वाढतं हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. निरोगी नातेसंबंधांमुळे शरीरात अनेक रासायनिक बदल होतात. ज्यामुळे वजन वाढते.  जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये समाधानी असाल, जोडीदाराबरोबर आनंदी असाल तर अशा स्थितीत शरीर प्रोलॅक्टिन नावाचे हॉर्मोन वाढते. ज्याला कम्फर्ट हॉर्मोन असंही म्हणतात. शरीरात प्रोलॅक्टिनचे जास्त प्रमाण वजन वाढवण्यास प्रोत्साहन देते.

१) इस्टोजन या हॉर्मोनची कमी अधिक पातळी वेट गेनचं कारण ठरते. ओवेरियन सेल्सकडून आणि एस्ट्रोजनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवनाने एस्ट्रोजनचे ओव्हर प्रोडक्शन होते. यामुळे याचा स्तर वाढतो.

२) थायरॉईड ग्रंथीतील T3, T4 आणि कॅल्सीटोनिन तयार करते, जे शरीरातील चयापचय राखते. जर या हार्मोन्सचे उत्पादन कमी असेल तर या स्थितीला हायपोथायरॉईडीझम म्हणतात, वजन वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

३) कोर्टिसोल चरबी आणि कार्बोहायड्रेट चयापचन उत्तेजित करून शरीराला पुरेशी उर्जा प्रधान करते. हे शरीरासाठी आवश्यक आहे कारण यामुळे भूक वाढते. ताणतणावाच्या स्थितीत कोर्टिसोलची पातळी वाढते. गोड, चरबीयुक्त आणि खारट पदार्थांसारख्या अनावश्यक पदार्थांचे क्रेव्हिग्स वाढल्याने चरबी जमा होत जाते.
 

Web Title: Here's why you gain weight after marriage : Is having sex or getting married causes weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.