विश्वास, प्रेम आणि काळजी या तिन्ही गोष्टी रिलेशनशिपमध्ये महत्त्वाच्या असतात. मात्र, कधी कधी आपल्याला पार्टनरच्या अनेक गोष्टी माहीत नसतात. काही लोकं टाईमपाससाठी रिलेशनशिपमध्ये येतात तर, काहींना आपल्या जोडीदारासह लग्नगाठ बांधायची असते ते प्रचंड सिरिअस असतात. काहींना आपला पार्टनर आपल्यासोबत कमिटेड आहे की नाही याची कल्पना नसते. जर, आपल्याला आपला पार्टनर कमिटेड आहे की नाही हे शोधायचे असेल तर ५ गोष्टी तपासून पाहा.
एकमेकांना आधार द्या
जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता, तेव्हा तुम्ही एकमेकांना सपोर्ट करायला हवं. कारण नात्यात प्रत्येकाच्या स्वतःच्या गरजा असतात. आपण जोडीदाराला भावनेने आणि प्रेरणेने पाठिंबा देणे गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासह नेहमी एकनिष्ठ राहा. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज भासते तेव्हा पार्टनर पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कठीण काळात साथ देणे
प्रत्येक जण आयुष्यात चांगल्या आणि वाईट काळातून जात असतो. आपला पार्टनर आपल्या वाईट काळात साथ देत असेल, तर तो पार्टनर आपली साथ कधी सोडणार नाही. वाईट परिस्थितीत पाठिंबा दर्शवणारा पार्टनर आपली साथ पुढे देखील देईल.
सिक्रेट शेअर करा
उत्तम रिलेशनशिपमध्ये आपला पार्टनर काही सिक्रेट ठेवत नाही. सगळं काही शेअर करतो. घरातील असो या कामातील प्रत्येक गोष्ट आपला पार्टनर शेअर करत असेल, तर पार्टनर रिलेशनशिपबाबतीत सिरियस आहे.
फ्युचर प्लॅन करतात शेअर
आपला पार्टनर जर रिलेशनशिपबाबतीत विचार करत असेल तर, तो व्यक्ती आपल्यासोबत फ्युचरबाबतीतही काही आयडिया शेअर करेल. आपल्या घरच्यांसोबत देखील ओळख करून देईल.
एकत्र वेळ घालवणे महत्त्वाचं
कितीही बिझी शेड्युल असलं तरी एकमेकांसाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. जर तुमचा पार्टनर तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून तुमच्यासोबत वेळ घालवत असेल, तर तुम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये असल्याचे यावरून दिसून येते.