रोमान्समधला एक अत्यंत सुंदर उत्कट प्रकार म्हणजे किस करणे किंवा चुंबन घेणं. वैवाहिक नातं चांगलं राहण्यासाठी सेक्स लाईफही अतिशय निकोप असणं गरजेचं असतं. प्रेम व्यक्त करण्यापासून ते निकोप संबंधांपर्यंत चुंबन घेणे-देणे हे अतिशय सुंदर-उत्कट मानले जाते. मात्र ते करताना आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. त्यातलाच एक भाग ओरल हेल्थ अर्थात मौखिक आरोग्याचा. दारु-सिगरेट-गुटखा-कांदा या तीव्र वासांसह तोंडाला दुर्गंधी येणे अत्यंत वाईट. चुंबनासह प्रेमळ संबंधातही त्यामुळे दुरावा येतो. जोडीदाराला गलिच्छ वाटू शकते. केवळ माऊथ फ्रेशनर न वापरता एकूण आरोग्याकडेच लक्ष द्यायला हवे. (How To Get Good Breath For Kissing)(Relationship Tips)
किस करताना दोघांपैकी एकाच्या तोंडाला घाणेरडा वास आल्यानं रोमान्सचा मूड जातो. काहीजणांना आपल्या पार्टनरच्या जवळ जाण्याची सुद्धा किळस वाटते. (How you can kiss away bad breath) अशावेळी तोंडाला वास येऊ नये म्हणून स्वच्छतेची काळजी घेण्याबरोबरच काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. स्मोक केल्यानंतर पार्टनरला किस करू नका. कारण स्मोकींगच्या वासामुळे पार्टनरला त्रास होऊ शकतो. जरी तुम्हाला लिपस्टीक लावायला आवडत असेल तरीही पार्टनरला किस करताना लिपस्टिक लावणं टाळा. कारण लिपस्टीकच्या वासानं पार्टनरला त्रास होऊ शकतो.
तोंडाचा दुर्गंध येऊ नये म्हणून
१) किस करण्याआधी तोंडाला दुर्गंध तर येत नाही ना याकडे लक्ष द्या. लसूण, कांदा, मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नका. जर तुम्ही यापैकी काहीही खाल्लं असेल तर ब्रश केल्यानंतरच किस करा.
२) माऊथ फ्रेशनर, मुखवास, च्युइंगम तुम्ही चघळू शकता, जेणेकरून दुर्गंध येणार नाही. लवंग चघळल्यानंतरही श्वासांचा दुर्गंध येत नाही. बडीशेप खा.
३) तोंडाला दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पावडर बनवा. अर्धा चमचा हे चूर्ण रोज सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत घेतल्याने श्वासाची दुर्गंधी आणि लाळ थांबते, हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. जेवण चविष्ट बनवणारी दालचिनी देखील या समस्येवर उपाय आहे. यामध्ये असलेले गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करतात.
४) ग्रीन टीच्या सेवनाने श्वासाची दुर्गंधी कमी होऊ शकते. यात अँटीबॅक्टेरियल घटक असतात, जे दुर्गंधी दूर करतात. तुळशीची पाने चघळल्याने तोंडातून येणारा सर्व प्रकारचा दुर्गंध दूर होतो.
५) तुम्ही जितके जास्त हायड्रेट राहाल तितकंच श्वासांची दुर्गंधी कमी होईल. जर तुम्हाला तोंड सुकल्यासारखं वाटत असेल तर एक ग्लास पाणी प्या.
६) लिंबू केवळ आरोग्यासाठीच गुणकारी नसून श्वासांचा दुर्गंधही यामुळे कमी होतो. लिंबाचा लहानसा तुकडा घेऊन एक ग्लास पाण्यात पिळा आणि या पाण्यानं गुळण्या करा.