बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्या लग्नाला जवळपास 23 वर्षे झाली आहेत. त्यांच्या प्रदीर्घ नात्यात कधीही कुठलाही दुरावा आणि कोणत्याही प्रकारची अफवा नव्हती. अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. श्रीराम नेने हे वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या दोघांचे नाते खूप घट्ट आहे. (How To Be a Good Husband) एवढी यशस्वी अभिनेत्री आणि एक डॉक्टर यांचं नातं टिकेल का अशी अनेकांना शंका होती, मात्र हे नाते टिकले. दोन मुलं आता त्यांची तरुण होत आहेत.
लग्नानंतर काही काळ प्रत्येकाचं नातं सुंदर दिसतं, पण एक वेळ अशी येते की नात्यात मतभेद सुरू होतात. कधी-कधी मतभेद इतके वाढतात की, त्यामुळे नातं टिकवणं कठीण होऊन जातं. (Why madhuri dixit husband shriram nene is a perfect partner) माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. पण तरीही त्यांच्या नात्यात प्रेम आहे. माधुरी आणि नेते यांच्या नात्यातून काही बोध घेण्यासारखा आहे.
1) पत्नीला वेळ देणं
माधुरी आणि श्रीराम दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप व्यस्त असतात. पण तरीही ते एकत्र वेळ घालवतात. नेने अनेकदा माधुरी दीक्षित आणि कुटुंबासोबत सुट्टीवर जातात. याशिवाय तो रोमँटिक डिनरवरही जातात. त्यांच्या डिनर डेटची एक झलक माधुरी दीक्षितच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळते. कोणतेही नाते घट्ट करण्यासाठी क्वालिटी टाईम घालवणे खूप महत्वाचे आहे. उत्तम पती व्हायचे असेल तर पत्नी आणि कुटुंबासोबत नक्कीच वेळ घालवा.
तुम्ही प्रेमात आहात की पाकिटात? पॉकेट रिलेशनशिपचा नवा ट्रेण्ड, तू कोण आणि मी कोण?
2) प्रेम व्यक्त करणं..
नेने यांनी इन्स्टाग्रामवर माधुरीवरचं प्रेम व्यक्त केले आहे. यावरून कळते की श्रीराम प्रेम व्यक्त करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. एखाद्याला स्पेशल फिल करून देण्यासाठी तुम्हाला मोठं काही गरज नाही. छोट्या-छोट्या गोष्टींमधूनही तुम्ही तुमच्या नात्यातील प्रेम टिकवून ठेवू शकता. बायको सेलिब्रिटी असो की सामान्य महिला, त्यांना आनंद देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न पुरेसा आहे. तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता ते वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न करा.
3) करिअरमध्ये पाठींबा देणं
आपल्या सर्वांना माहित आहे की लग्नानंतर माधुरी दीक्षितने बॉलिवूड करिअर सोडले आणि कौटुंबिक जीवनावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्याचवेळी जेव्हा माधुरी दीक्षित पुन्हा इंडस्ट्रीत कामावर आली तेव्हा तिच्या पतीने तिला साथ दिली. परफेक्ट पती होण्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीच्या करिअरलाही पाठिंबा द्यावा.
किती टक्के भारतीय महिला आणि पुरुष करतात लग्नाआधी सेक्स? सरकार आकडेवारीच सांगतेय..
4) विश्वास
वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे. ज्या नात्यात विश्वास नसतो ते नातं फार काळ टिकत नाही. कोणतीही समस्या असल्यास पार्टनरशी मोकळेपणानं बोला आणि त्यातून मार्ग काढा.