Join us  

How To Be a Good Kisser : KISS करताना करु नका ५ चुका, प्रेमात आहोत म्हणून जोडीदाराला गृहित धराल तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 7:13 PM

How To Be a Good Kisser : प्रेमाचं एक्सप्रेशन म्हणून चुंबन घेणं नैसर्गिक आहे तरी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.

प्रेम, स्पर्श, किस करणं, पापी घेणं यासाऱ्या माणसाच्या नैसर्गिक गोेष्टी आहेत. इंग्रजी-हिंदी सिनेमात पाहिलेले इंटेंस किस काहींना आवडतात, काहींना कसेसे होते. आपल्याकडे तर त्यासंदर्भात बोलणेही अश्लिल मानले जाते. (Sexual Health Tips) एखाद्या इमरान हाशमी म्हणून चिडवले जाते खासगी वर्तुळात इतके हे न बोलण्याचे विषय. मात्र प्रेमात पडलेल्या दोन जीवांसाठी किस करणं, चुंबन घेणं ही त्यांच्या प्रेमाची, शरीरसंबंधांतली एक खास अनुभूती असू शकते. मात्र त्यासंदर्भात गैरसमज, अश्लिल वाटणं आणि भीती वाटणे हे तीन टप्पे अनेकांच्या संदर्भात खरे असतात. (How To Be A Better Kisser Dos and Don'ts for the Perfect Kiss)

काहींसाठी प्रथम चुंबन हा अनुभवही अतिशय किळसवाणा, भीतीदायकही असतो. त्यामुळे हा विषय नीट समजून घेणं, त्या क्रियेविषयी नाही तर आपल्या नात्याविषयी प्रेम असणं, आदर असणं. आपण नात्यात सच्चे असणं आणि किस करणं कॅज्युअल न मानता त्यामागेही प्रेम व्यक्त करणे असलं तर ते सुखदायी होते अन्य‌था नाही. तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर काही गोष्टींची आरोग्य म्हणूनही काळजी घ्या. पर्सनल हायजिनचा विचार करा आणि मनाच्या इच्छेचाही.

काय काळजी घ्याल?

१) तोंडाला दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर जोडीदाराला अत्यंत किळसवाणे वाटू शकते.

२) तोंडाला इन्फेक्शन झालं असेल तर किस करणं टाळा

जर तुमच्या तोंडात फोड येत असतील तर तुम्ही काळजी घ्यावी. याची दोन कारणे आहेत, पहिले, संसर्ग पसरण्याचा धोका असतो, तसेच दुखापतीमुळे पार्टनरला त्रास होऊ शकतो.

३) दोघांचीही संमती असेल तेव्हाच..

पहिलं किस तेव्हाच केले पाहिजे जेव्हा तुम्ही दोघे किस घेण्यास तयार असाल. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या दोघांनीही तयार राहायला हवं.

४) जास्त जवळ जाणं बरोबर नाही

चुंबन घेताना बहुतेक लोक खूप जवळ येतात. हा चुकीचा मार्ग आहे, तुमच्या जोडीदाराला तुमचे हे वागणे आवडणार नाही. प्रेमात कोणतीही गोष्ट घाईने करू नये.

५) योग्य पद्धत

प्रत्येक वेळी त्याच त्या प्रकारे चुंबन घेणे थोडे कंटाळवाणे असू शकते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे चुंबन घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमचा पार्टनर तुम्हाला कंटाळणार नाही.

टॅग्स :लैंगिक जीवनलैंगिक आरोग्यरिलेशनशिपरिलेशनशिप