मानसी चांदोरकर
आपल्या सगळ्यांचच आयु्ष्य इतकं वेगवान झालं आहे की कित्येकदा एका घरात राहून आपण एकमेकांना भेटत नाही. वाढत्या महागाईच्या काळात घराची आर्थिक घडी बसवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि इतर गरजा भागवण्यासाठी आर्थिक घडी बसवणे आता अनिवार्य झाले आहे. यासाठी पती आणि पत्नी या दोघांनाही घराबाहेर पडून काम करून आर्थिक परिस्थिती सुधारणे सध्या गरजेचे झाले आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच या धावपळीत, तणावातही स्वतःला आणि जोडीदाराला आनंदी समाधानी ठेवणे महत्त्वाचे आहे. जर आपण हा आनंद टिकवू शकलो तरच आपण रोजच्या धावपळीला, दगदगीला आणि तणावाला सामोरे जाऊ शकतो. हा आनंद कसा मिळवायचा यासाठी विचार करणे फार महत्त्वाचे आहे (How to be happy with our Partner).
1) नेहमीच आणि आवर्जून सांगितले जाणारी गोष्ट म्हणजे आपली आवड निवड जपा आणि आपले छंद जोपासा. यासाठी आठवड्यातून किमान थोडा तरी वेळ जरुर काढायला हवा.
2) जोडीदाराबरोबर "कॉलिटी टाईम" घालवा. कधीतरी आपला रिकामा वेळ फक्त जोडीदारासाठी राखून ठेवा. सुरुवातीला तुम्हाला कदाचित याचे महत्त्व कळणार नाही, पण कालांतराने असे करण्याचा फायदा तुमच्या क्षात येईल.
3) त्याची एखादी छोटीशी हौस त्या थोड्याशा वेळात पूर्ण करा. घरातील एखादे छोटेसे काम करून, अनपेक्षितपणे त्याला शाब्बासकीची थाप देऊन त्याला सरप्राईज द्या.
4) कधीतरी बाहेर, आवडीच्या ठिकाणी फिरायला जा. तो वेळ फक्त एकमेकांसाठी घालवा. त्यात ऑफिस, कुटुंब, त्यातील समस्या या कोणत्या विषयांचा समावेश करू नका. फक्त एकमेकांत बाबतचे प्रेम, कृतज्ञता, काळजी, आपुलकी आदर व्यक्त करा.
5) जोडीदाराला आवडणारी एखादी गोष्ट त्याला सरप्राईज म्हणून आणून द्या. जसं की बायकोचा आवडता गजरा, एखादा ड्रेस किंवा पतीला आवडणाऱ्या रंगाचा शर्ट, त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ. अशा अनेक गोष्टींमधून तुम्ही हे सरप्राईज देऊ शकता. या सरप्राईज मधून देखील तुमचे प्रेम आणि त्या प्रेमातून मिळणारा निखळ आनंद सामावलेला असतो.
6) प्रत्येकाची आनंदाची संकल्पना ही वेगवेगळी असते. आपली आणि आपल्या जोडीदाराची आनंदाची संकल्पना ओळखून त्याप्रमाणे थोडा तरी वेळ स्वतःसाठी आणि जोडीदारासाठी नक्की काढा. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.
आनंद मिळवण्यासाठी कोणत्याही पैशाची, मोठ्या ट्रीपचे, मोठ मोठ्या हॉटेल्स मधल्या पार्टीची, किंवा महागड्या गिफ्टची आवश्यकता नसते. "आपल्या जोडीदाराच्या डोक्यावरून किंवा पाठीवरून मायेने फिरवलेला हात हा देखील कितीतरी आनंद देऊन जाणार असतो." अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःचा आणि जोडीदाराचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. या छोट्या छोट्या आनंदातही आनंद शोधायला शिका आणि जोडीदार राहिलाही शिकवा.
(लेखिका समुपदेशक आहेत)
संपर्क - 8888304759
इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com