Lokmat Sakhi >Relationship > फॅमिलीसोबत विकेंड एनर्जेटिक-फ्रेश व्हावा तर करा फक्त ५ गोष्टी; पुढचा पूर्ण आठवडा जाईल चांगला...

फॅमिलीसोबत विकेंड एनर्जेटिक-फ्रेश व्हावा तर करा फक्त ५ गोष्टी; पुढचा पूर्ण आठवडा जाईल चांगला...

How To Celebrate Quality Weekend With Family : पुढच्या वीकेंडपर्यंतची संपूर्ण ताकद तुम्हाला या वीकेंडच्या सुंदर क्षणातूनच मिळणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 12:13 PM2023-08-16T12:13:32+5:302023-08-16T12:14:43+5:30

How To Celebrate Quality Weekend With Family : पुढच्या वीकेंडपर्यंतची संपूर्ण ताकद तुम्हाला या वीकेंडच्या सुंदर क्षणातूनच मिळणार आहे.

How To Celebrate Quality Weekend With Family : Just 5 things to do for an energetic-fresh weekend with family; Next whole week will go well... | फॅमिलीसोबत विकेंड एनर्जेटिक-फ्रेश व्हावा तर करा फक्त ५ गोष्टी; पुढचा पूर्ण आठवडा जाईल चांगला...

फॅमिलीसोबत विकेंड एनर्जेटिक-फ्रेश व्हावा तर करा फक्त ५ गोष्टी; पुढचा पूर्ण आठवडा जाईल चांगला...

मानसी चांदोरकर 

सध्याच्या काळात आपण सर्वच जण प्रचंड धावपळीचे आयुष्य जगत आहोत. आपल्याला स्वतःसाठी अक्षरशः दोन मिनिटेही वेळ नाही. प्रत्येक जण सतत घड्याळाच्या काट्यावर पळत असतो. कधी एकदा शुक्रवार येतो किंवा शनिवार येतो आणि कधी ऑफिसला सुट्टी मिळते असे प्रत्येकालाच वाटत असते. कारण सोमवार ते शुक्रवार किंवा शनिवार हे आपल्यासाठी नसतातच मुळी. ते असतात केवळ ऑफिसच काम आणि पैसा कमावण्यासाठी. मग अशावेळी प्रत्येकच जण वाट पाहत असतो ती वीकेंडची! सध्या विकेंड म्हणजे बाहेर फिरायला जाणे, धमाल करणे, मॉलमध्ये जाऊन खरेदी करणे, भरपूर खादाडी करणे असा एकंदर ट्रेंड पहायला मिळतो. पण खरंच या सगळ्यामुळे आपला वीकएंड एनर्जेटिक किंवा फ्रेश होतो का (How To Celebrate Quality Weekend With Family)?  

खरं सांगायचं तर आपल्याला एनर्जी मिळते ती आपल्या आवडीनिवडीतून, आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यातून, पण आपण तसं न करता चक्क बाहेर फिरायला निघून जातो, भरपूर पैसा खर्च करतो, आपल्या मुलांना हवं ते विकत घेऊन देतो. खरं सांगा या सगळ्यातून खरंच एनर्जेटिक वाटतं का? उत्तर मिळेल नाही.. तुम्हाला तुमचा विकेंड एनर्जेटीक घालवायचा असेल, पार्टनरसोबत थोडा क्वालिटी टाइम घालवायचा असेल, मुलांना- कुटुंबाला आनंद द्यायचा असेल आणि पुढच्या आठवड्याची एनर्जी परत मिळवायची असेल तर त्यासाठी पैसा, दूरची जागा, आवडीच्या गोष्टी यांच्याबरोबरीनेच काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात.  त्या कोणत्या ते पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

 
1) एकमेकांबरोबर घालवलेला वेळ, एकमेकांची घेतलेली काळजी, एकमेकांसोबत घालवलेले क्षण, हे जास्त महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे विकेंड एनर्जेटिक आणि फ्रेश हवा असेल तर आपल्या कुटुंबाबरोबर शांतपणे एकत्र वेळ घालवायला हवा. यासाठी नेहमी बाहेर जाण्याची आवश्यकता आहे असं नाही तर घरात एकमेकांसोबत मज्जा मस्ती करत,  घराची साफसफाई करत किंवा अगदी नुसत्या गप्पा मारत बसल्यानेही आपल्याला रिलॅक्स वाटू शकते.

२) नवरा-बायकोने एकमेकांची जास्त काळजी घेऊन, त्यांच्यासाठी काहीतरी पदार्थ करुन किंवा त्यांना मसाज करुन आपण एकमेकांना चांगला वेळ देऊ शकतो. एकमेकांच्या आवडीचे खेळ खेळा, काही दुखलं  खूपलं असेल, कोणत्या गोष्टीने दुखावले गेले असाल, तर ते मन मोकळेपणाने सांगा. मुलांना तुमच्याकडून अपेक्षित असलेला वेळही आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजेच त्यांच्याबरोबर त्यांच्या वयाचे होऊन मज्जा करा.  

३)  मुलांना नुसताच खाऊ, हॉटेलिंग, हट्ट केल्यानंतर मिळणाऱ्या गोष्टी देण्यापेक्षा काहीतरी असं शिकवा जे त्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल. यासाठी एखाद्या सामाजिक संस्थेला भेट देणे, अंध किंवा अपंग व्यक्तींना मदत करणे, एखाद्या गड किल्ल्यावर जाऊन त्याठिकाणचा कचरा उचलणे अशा गोष्टी आपण निश्चितच करु शकतो. याचा मुलांवर चांगला परीणाम होईल आणि आपल्यालाही आपला विकेंड सत्कारणी लागल्याचा आनंद मिळेल.

(Image : Google)
(Image : Google)

४) आता विकेंडला बाहेर जायचं नाही, पैसा खर्च करायचाच नाही, मुलांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या नाही असं अजिबातच नाही. या सगळ्या गोष्टी करा पण एनर्जी मिळवण्यासाठी आणि आपल्या लोकांना एनर्जी देण्यासाठी थोडा वेळ ही त्यांच्याबरोबर घालवा, संवाद साधा, काळजी घ्या. यामध्ये आपण आजुबाजूच्या टेकड्यांवर, बागेत, ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊ शकतो. त्यामुळे निसर्गाच्या जवळ गेल्याने आपण आतून फ्रेश राहायला मदत होईल. दोन्हीचा योग्य पद्धतीने समतोल साधता आला तर आपलं आयुष्य तणावग्रस्त न होता निश्चितच काही प्रमाणात आनंदी होईल. 

५) आठवड्याभराच्या धावपळीत घाई गडबडीत आपण मुलांवर फक्त रागवत असतो, आपल्या जोडीदारावर फक्त चिडचिड करत असतो. पण मग त्यांना या वीकेंडच्या निमित्ताने तुमच्या दुसऱ्या बाजूचा ही उलगडा होऊ दे. रागावणारे आई-बाबा किंवा आपला जोडीदार खरंच आपल्यावर किती प्रेम करतो, किती काळजी घेतो, हे तुमच्या जिवलगांना कळलं तर तुमचा विकेंड एनर्जेटिक आणि फ्रेश का नाही जाणार? पुढच्या वीकेंडपर्यंतची संपूर्ण ताकद तुम्हाला या वीकेंडच्या सुंदर क्षणातूनच मिळणार आहे..."सो लेट्स सेलिब्रेट अवर न्यू स्टाईल ऑफ विकेंड."


(लेखिका समुपदेशक आहेत)

संपर्क - 8888304759   
इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com

Web Title: How To Celebrate Quality Weekend With Family : Just 5 things to do for an energetic-fresh weekend with family; Next whole week will go well...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.