प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी 'व्हॅलेण्टाइन्स डे' साजरा केला जातो, हा एकप्रकारे प्रेमीयुगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमान्सचा अनोखा उत्सवच आहे. या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर-प्रेयसी किंवा जोडीदाराला सुंदर भेटवस्तू आणि संदेश पाठवतात. लोक व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. प्रेमी युगुलांसोबतच लग्न झालेली जोडपी देखील हा 'व्हॅलेण्टाइन्स डे' मोठ्या उत्साहात साजरा करतात. लग्नाआधी 'व्हॅलेण्टाइन्स डे' साजरा करणे आणि लग्न झाल्यावर एका बाळाचे पालक होऊन 'व्हॅलेण्टाइन्स डे' साजरा करणे यात थोडाफार फरक असतोच.
लग्न झाल्यावर एका बाळाचे पालक होऊन 'व्हॅलेण्टाइन्स डे' साजरा करणे काही जोडप्यांना अवघड वाटते, किंवा आता काय 'व्हॅलेण्टाइन्स डे' साजरा करायचा.. आता सगळं होऊन गेलं असा विचार करून सोडून देतात. परंतु असा विचार न करता आपण देखील आपल्या बाळासमवेत 'व्हॅलेण्टाइन्स डे' मोठ्या उत्साहात साजरा करु शकतो. आपण देखील एका बाळाचे पालक आहात आणि आपल्याला सुद्धा 'व्हॅलेण्टाइन्स डे' कसा साजरा करावा असा प्रश्न पडत असेल तर या काही खास टीप्स(How To Celebrate Your First Valentin's Day As Parents).
नक्की काय करता येऊ शकत...
१. खास दिवसाचे नियोजन करा :- व्हॅलेण्टाइन्स डे हा आपल्या जोडीदाराबरोबर छान साजरा करता यावा असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. परंतु जर आपण एका लहान बाळाचे पालक असाल तर व्हॅलेण्टाइन्स डे कसा साजरा करणार असा प्रश्न पडतो. परंतु हा सगळा विचार सोडून या खास दिवसाचे आपल्या जोडीदारासोबत खास नियोजन करा. दोघांनी ठरवून त्या दिवशी आपल्या व्यस्त कामातून एक दिवसाची रजा काढू शकता. आपल्या जोडीदारासोबत आवडत्या ठिकाणी मस्त बाहेर फिरायला जाऊ शकता. दोघांच्या पसंतीने एखादा छान सिनेमा पाहण्याचा बेत आखण्यास काहीच हरकत नाही. सिनेमा पाहिल्यानंतर आपल्या आवडीच्या रेस्टोरंटमध्ये जाऊन मनमुरादपणे पदार्थांचा आनंद लूटा. तुम्हाला तुमच्या बाळाची दिवसभर काळजी घेण्यासाठी मदत हवी असल्यास, कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्र - मैत्रिणींना मदतीसाठी विचारण्यास अजिबात संकोच करू नका. व्हॅलेण्टाइन्स डे हा प्रेमाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या प्रेमाची माणसं आपल्या जवळ असावीत असं आपल्याला वाटत. तेव्हा आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक डेटवर जाताना आपल्या पाल्याला किंवा बाळाला घेऊन जाणे ही काही वाईट कल्पना नाही.
२. व्हॅलेण्टाइन्स डे चे टिपिकल नियम पाळणे टाळा :- व्हॅलेण्टाइन्स डेच्या दिवशी आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी खास काहीतरी केलेचे पाहिजे, खूप गिफ्ट दिले पाहिजेत, खूप मोठा खर्च करून व्हॅलेण्टाइन्स डे साजरा केला पाहिजे; या सर्व टिपिकल आणि पारंपरिक कल्पनांमधून बाहेर येऊन अगदी सध्या पद्धतीने व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करण्याची हीच योग्य वेळ आहे. व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करण्याचे जे पारंपरिक, टिपिकल पायंडे पाडले गेले आहेत ते मोडीस काढून आपल्या जोडीदारासोबत सोप्या पद्धतीने व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत घरीच राहून देखील आपण व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करू शकता. आपल्या आवडीचे जेवण ऑर्डर करा, एकदा जुना चित्रपट पहा, एकमेकांना छोट्या भेटवस्तू द्या, एकमेकांशी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा द्या. एकमेकांच्या आवडत्या डिश घरीच एकत्र मिळून बनवा यांसारख्या छोट्या - छोट्या गोष्टी आपण साजऱ्या करू शकता.
३. एकमेकांचे लाड पुरवा :- तुमचे तुमच्या जोडीदारावर भरपूर प्रेम आहे किंवा तुम्हाला त्यांचे लाड पुरवायला आवडतात हे जर त्यांना समजले तर आपसूकच त्यांचे तुमच्यावरील प्रेम वाढेल. जोडीदाराचे लाड करणे हा तुमचे प्रेम व कौतुक व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो. एकमेकांचे लाड पुरवण्यास मदत करा, घर कामात सहभागी व्हा, जेवण बनवायला मदत करा, एकमेकांची काळजी करा, एकमेकांप्रती आदर बाळगा या छोट्या - छोट्या गोष्टी तुमच्या नात्यात मोठा फरक आणू शकतात आणि तुम्हाला दोघांना एकमेकांशी कनेक्टेड ठेवण्यास मदत करू शकतात.
४. तुमच्या बाळाला सहभागी करून घ्या :- पालकत्व कठीण आणि तणावपूर्ण असू शकते. परंतु जेव्हा तुम्ही दोघेही तुमच्या लहानशा बाळाला आनंदाने खेळवता तेव्हा ते अधिक आनंददायक आणि मनाला खुश करणारे असते. खरंच, व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करण्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग शोधू शकता. तुम्ही ठरवून दिवसभर तुमच्या बाळासोबत खेळता खेळता व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही दोघे मिळून केक बनवू शकता, आपले आवडते संगीत ऐकू शकता किंवा बेबी पूलमध्ये आपल्या लहान बाळासोबत चांगला वेळ घालवू शकता आणि तुमच्या लहान बाळाला तुमच्या दोघांच्या एकत्रित उपस्थितीचा आनंद देऊ शकता.
५. रोमान्समध्ये नावीन्य आणा :- महागड्या भेटवस्तू देणे, व्हॅलेण्टाइन्स डे च्या क्लिष्ट तारखा लक्षात ठेवणे, खूप मोठा खर्च करून आपले प्रेम दाखवून देणे म्हणजे रोमान्स नाही. पालक या नात्याने, तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दलचे प्रेम आणि कौतुक दाखवण्यासाठी सर्जनशील मार्गांचा विचार करु शकता. ही गोष्ट आधी स्वतःच्या मनाला पटवून द्या. सर्जनशील मार्गांचा विचार करणे म्हणजेच एकमेकांसाठी महागडे गिफ्ट देण्यापेक्षा एकमेकांची आवडती डिश घरात बनवा, चित्रपट पाहण्याऐवजी एखादे स्पा चे सेशन बुकिंग करून एकमेकांसाठी वेळ द्या. रोजच्या कामाच्या गडबडीत एकमेकांसाठी वेळ मिळत नसल्यास, गप्पा मारण्यासाठी थोडा वेळ काढा. एकत्र आराम करा. अशा प्रकारे आपल्या जोडीदाराच्या आवडत्या गोष्टी करून किंवा एकमेकांसाठी थोडा वेळ काढून रोमान्समध्ये नावीन्य आणू शकता.