Join us  

जोडीदार नेमका कसा हवा? लग्नाला ‘हो’ म्हणण्यापूर्वी ३ गोष्टी तपासा, जया किशोरी सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 12:00 PM

How to choose your life partner by Jaya Kishori : लग्न करण्यापूर्वी फक्त घर, पगार, लुक्स पाहू नका. ३ गोष्टींकडेही लक्ष द्या, नाहीतर..

'माझा पार्टनर असा हवा, तसा हवा', 'अमुक गुण त्याच्यात हवे', जोडीदार शोधताना आपण त्याच्यातले अनेक गुण पाहतो. पारखून-निरखूनच मग लग्नासाठी होकार देतो. पण बऱ्याचदा त्याचे अनेक गुण लग्नानंतर समजतात. ज्यामुळे जुळवून घेण्यात अडचण निर्माण होते. आपल्यापैकी प्रत्येकाला सुयोग्य साथीदार हवा असतो. पण काही गोष्टी न जाणून घेतल्यामुळे लग्नानंतर नात्यात दुरावा निर्माण होतो (Jaya Kishori). काही लोकं लग्नापूर्वी मुलगा/मुलगी किती कमावते? त्याचे घर कसे आहे? त्याचा पगार किती आहे? आणि तो कसा दिसतो? एवढंच पाहतात (Motivational Speaker). पण योग्य जोडीदार निवडताना ३ गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे. त्या ३ गोष्टी नेमक्या कोणत्या? याबद्दलची माहिती मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांनी दिली आहे(How to choose your life partner by Jaya Kishori).

सुयोग्य जोडीदार निवडण्याबाबत जया किशोरी सांगतात, 'नेहमी स्वतःसाठी असा जोडीदार निवडा जो प्रत्येक प्रसंगात तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. यासह सदैव साथ देईल.'

समोरच्या व्यक्तीच्या प्रायोरिटीचा मान ठेवेल

समजूतदार जोडीदार तो असतो, जो आपल्याला पार्टनरच्या प्रायोरिटीचा मान राखतो. शिवाय, कोणतेही नवीन काम करताना रोखू नये. जर तुमचा पार्टनर तुमच्या प्रायोरिटीकडे दुर्लक्ष करत असेल, तर त्याला जीवनसाठी बनवताना थोडा विचार करायला हवा.

करीना म्हणाली, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सैफू! आणि सैफ काय म्हणाला? तीच ती घरोघरचीच कथा..

तुमच्या ग्रोथमध्ये मदत करेल

एक उत्तम पार्टनर तोच असतो, जो तुमच्या ग्रोथमध्ये मदत करतो. तुमची स्वप्न पूर्ण करण्यास प्रोत्साहित करतो. जी व्यक्ती तुमची स्वप्न पूर्ण करण्यास प्रोत्साहित करते, पुढे जाण्यासाठी साथ देते ती व्यक्ती परफेक्ट पार्टनर मानली जाते.

अशा प्रकारची नाती फार काळ टिकत नाही

लग्नाला २५ वर्षे झाल्यानंतर अर्शद वारसीने लग्न केले रजिस्टर्ड, पण इतक्या उशीरा का?-अर्शद सांगतो..

जी लोकं पाय खेचण्याचे काम करतात, त्या व्यक्तींपासून लांब राहिलेले बरे. शिवाय जर आपला पार्टनर देखील तुमचे सक्सेस पाहून पुढे जाण्यास टोकत असेल तर, त्यासोबत संसार न थाटलेले बरे.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपलग्नसोशल व्हायरलसोशल मीडिया