Lokmat Sakhi >Relationship > लव मॅरेज करायचंय, पण घरच्यांना कसं पटवावं ते कळेना? ३ टिप्स, घरचेही होतील आनंदानं राजी 

लव मॅरेज करायचंय, पण घरच्यांना कसं पटवावं ते कळेना? ३ टिप्स, घरचेही होतील आनंदानं राजी 

Tips For Lovers: लव्ह मॅरेज (love marriage) करायचं तर अजूनही आपल्याकडे घरच्यांची परवानगी घेताना किंवा त्यांना याविषयी सांगताना नाकी नऊ येतात. कसं सांगावं ते कळत नाही. म्हणूनच बघा या काही टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात का ते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 04:13 PM2022-08-19T16:13:26+5:302022-08-19T16:14:11+5:30

Tips For Lovers: लव्ह मॅरेज (love marriage) करायचं तर अजूनही आपल्याकडे घरच्यांची परवानगी घेताना किंवा त्यांना याविषयी सांगताना नाकी नऊ येतात. कसं सांगावं ते कळत नाही. म्हणूनच बघा या काही टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात का ते..

How to convince parents for love marriage? How to get permission from parents for love marriage? | लव मॅरेज करायचंय, पण घरच्यांना कसं पटवावं ते कळेना? ३ टिप्स, घरचेही होतील आनंदानं राजी 

लव मॅरेज करायचंय, पण घरच्यांना कसं पटवावं ते कळेना? ३ टिप्स, घरचेही होतील आनंदानं राजी 

Highlightsमुलगा असो किंवा मुलगी थोडेसे कचरतातच. म्हणूनच घरच्यांना तुमच्या प्रेमाविषयी सांगण्यासाठी किंवा तुमच्या प्रेमाला त्यांनी परवानगी द्यावी, यासाठी या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघा...

हल्ली आपल्याकडे लव्ह मॅरेजचं (want to do love marriage?) प्रमाण बऱ्यापैकी वाढलं आहे. दोन्ही स्थळं सर्वच बाबतीत समान स्तरावरची असतील, तर आजकाल अनेक घरांमधून ते सहजासहजी स्विकारलंही जात आहे. काही घरांमध्ये पालकांना नाही पटलं तरी मुलांच्या आनंदासाठी ते तयार होत आहेत. पण या सगळ्या झाल्या नंतरच्या गोष्टी. याआधी सगळ्यात मुख्य अडचण येते ती घरी कसं सांगायचं.. कारण अजूनही आपल्याकडची अनेक तरुण मंडळी आपल्या प्रेमाबाबत आणि लव्ह मॅरेज करण्याच्या (Tips for doing love marriage) विचाराबाबत घरच्यांना सांगायला जरा घाबरतात. मुलगा असो किंवा मुलगी थोडेसे कचरतातच. म्हणूनच घरच्यांना तुमच्या प्रेमाविषयी सांगण्यासाठी किंवा तुमच्या प्रेमाला त्यांनी परवानगी द्यावी, यासाठी या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघा...(How to convince parents for love marriage?)

 

लव्ह मॅरेजसाठी घरच्यांना पटवायचं तर....
१. आपले एखादे भावंड किंवा मग आपले जवळचे आत्या, मामा, मावशी, काका असे काही नातलग आपल्या पालकांच्या अगदी जवळचे असतात.

मुलं समोर असतील तर पालकांनी मुळीच करू नयेत ५ गोष्टी, मुलांच्या मनावर होतो वाईट परिणाम

त्या लोकांचा आपल्या पालकांवर प्रभाव असतो. पालकांना थेट सांगायची भीती वाटत असेल तर अशा जवळच्या नातलगांची मदत घ्या, त्यांना विश्वासात घ्या. आणि ते समोर असताना पालकांना तुमच्या प्रेमाबाबत सांगा. पालकांना पटवण्यात अशा नातलगांची नक्कीच मदत होईल.

 

२. प्रेमाची गोष्ट घरच्यांना सांगताना अजिबात उतावळेपणा करू नका. खूप हळूहळू संयमाने या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत.

प्रेग्नन्सीबाबत पहिल्यांदाच बोलली बिपाशा बसू, म्हणाली तो क्षण अतिशय भावनिक होता, आणि.....

त्यामुळे या विषयासाठी योग्य वातावरण निर्मिती होण्याची वाट बघा. एखादा सण- समारंभ असताना, सगळे आनंदात असताना किंवा मग तुम्ही काही तरी चांगलं केलंय आणि त्याबाबत तुमचं  कौतूक होत आहे, असा एखादा प्रसंग गाठा आणि  घरच्यांना सगळं सांगून टाका.

 

३. एखाद्या घरगुती कार्यक्रमात तुमच्या पार्टनरला बोलवा आणि त्यावेळी पालकांची आणि त्यांची ओळख करून द्या. किंवा मग हाॅटेल किंवा एखाद्या मॉलमध्ये ही भेट घडवून आणा. त्यांची ओळख होऊ द्या. पण यावेळी पालकांना तुमच्या पार्टनरचे वागणे आवडेल, याची पुर्ण काळजी घ्या. नाहीतर सगळेच बिघडून जायचे. मग हळूहळू त्यांच्याविषयी घरात बोलणे सुरु करा आणि नंतर प्रसंग पाहून पालकांना प्रेमाबद्दल सांगा. आधी ओळख झालेली असल्याने पालकांना ते स्विकारणे सोपे जाऊ शकते. 

 

Web Title: How to convince parents for love marriage? How to get permission from parents for love marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.