जिथे प्रेम आहे, तिथे रुसवे - फुगवे, मानवणे या गोष्टी येतातच (Relationship Tips). नात्यात पार्टनर आपल्यावर रुसतो, फुगतो, रागावतो. पण अशावेळी त्यांना मनवणे आपल्याला कठीण जाते (Husband Wife). जोडीदाराची नाराजी राग दूर करणं गरजेचं आहे. पण पार्टनरचं रुसवा घालवणं काही सोपं काम नाही (Angry Wife). नाराजी वेळीच दूर केला नाही, तर नात्यात दुरावा येऊ शकतो.
पती - पत्नी किंवा जोडपे एकमेकांवर तक्रार करतात. या तक्रारीमुळेही बऱ्याचदा जोडपे एकमेकांवर रुसतात. नात्यात अंतर वाढण्याआधी सोप्या टिप्सचा वापर करून पाहा. यामुळे रुसलेली बायको किंवा प्रेयसीचा राग आणि रुसवा जाईल, नात्यात प्रेम वाढेल, दुरावा आलेला कमी होईल(How to Deal With an Angry Wife: 6 Sensitive Ways).
रुसलेल्या बायकोला कसं मनवायचं?
शांत राहा
जेव्हा पत्नी रागावते, तेव्हा स्वतः शांत राहण्याचा प्रयत्न करा. शब्दाला शब्द वाढत गेले तर, भांडण आणखीन वाढत जाईल. अशावेळी शांत राहा, बायको किंवा पार्टनरची बाजू समजून घ्या. रागाच्या भरात किंवा विचार न करता बोलल्याने आणखीन समस्या वाढू शकते. त्यामुळे शांत राहून समजवण्याचा प्रयत्न करा.
नाराजीचे कारण शोधा
संभाषण हा कोणत्याही समस्येवर उपाय असू शकतो. पत्नीशी मोकळेपणाने बोला, तिच्या नाराजीचे कारण शोधा. तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका, आणि तिला काय म्हणायचे आहे ते समजून घ्या. तुमच्या भावना त्यांच्यासमोर स्पष्टपणे व्यक्त करा.
पिवळ्या दातांमुळे मनमोकळं हसता येत नाही? बेकिंग सोड्याचा करा असरदार उपाय- दात दिसतील स्वच्छ
माफी मागा
चूक झाली असेल तर उशीर न करता माफी मागा. मनापासून सॉरी म्हटल्याने पत्नीचा राग दूर होईल. शिवाय चूक सुधारण्याचा प्रयत्न करा.
सरप्राईज द्या
आपल्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी सरप्राईज देणे हा एक उत्तम मार्ग असू शकतो. त्यांच्या आवडती फुले, चॉकलेट्स किंवा कोणतीही खास भेट देऊन त्यांना आनंदित करू शकता. तसेच, त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटची योजना करा. यामुळे आपली पत्नी खुश होईल.
प्रेम आणि आपुलकी दाखवा
प्रेम आणि आपुलकीपेक्षा मोठे काहीही नाही. त्यांच्यासमोर प्रेम व्यक्त करा. त्यांना मिठी मारणे, हात पकडणे किंवा सरप्राईज त्यांना खुश राहा.
शाळेत जाताना भीतीपोटी मूल रडतं? करा सोप्या ४ गोष्टी; शाळेत रमतील-अभ्यासही करतील
घरातील कामात मदत करा
पत्नीला घरातील कामाचा त्रास होत असेल तर तिला मदत करा. त्यांच्या कामाची कदर करा.