Join us  

घटस्फोटानंतर सावरायचं की उद्ध्वस्त व्हायचं? सेलिब्रिटी घटस्फोटाच्या गॉसिपपलिकडे जाणाऱ्या त्रासदायक प्रश्नांचं काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 8:40 PM

How to Deal With Divorce: A Therapist's Guide to Coping : हार्दिक पांड्याचा घटस्फोट आणि काही प्रश्न, घटस्फोटानंतर सावरायचं कसं?

क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक यांनी लग्नाच्या ४ वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय सामंजस्याने घेतला (Divorce). घटस्फोटाची चर्चा होतेच. सेलिब्रिटी घटस्फोटाची तर होतेच होते. पण लग्न मोडणं कुणाचसाठी सोपं नसतं. त्यात मुलं असतील तर अजूनच अवघड होतं. त्यातून अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात. आयुष्याची वाताहात होते.

मात्र काहीजण त्यातूनही सावरतात आणि घटस्फोटही कटूता न आणता पुढे आपलं नातं मैत्रीचं ठेवतात. पुढे आपलं नातं मैत्रीचं ठेवतात. आमीर खान आणि किरण राव यांचंच उदाहरण घ्या. हे जोडपं विभक्त जरी झालं असलं तरी अजूनही अनेक सोहळ्यात ते एकत्र दिसतात. मुलाचा सांभाळ प्रेमानं करतात. घटस्फोट जर अपरिहार्यच असेल तर पुढचे आयुष्य कसे असावे याचाही विचार करायला हवा(How to Deal With Divorce: A Therapist's Guide to Coping).

घटस्फोटासंदर्भात काही अभ्यासही प्रसिध्द आहेत. कोपनहेगन विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. सोरेन सँडर म्हणतात, 'घटस्फोटित लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये काही लक्षणीय बदल दिसून येतात. त्यातून काहीजण डिप्रेशनमध्येही जाऊ शकतात. अशावेळी काही गोष्टी नीट समजून करायला हव्या.

घटस्फोटानंतर स्वतःला सावरा..

१.  घटस्फोटानंतर अनेकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. ते टाळण्यासाठी थेरपिस्टची मदत घेता येते. त्यातून सकारात्मक वाट सापडू शकते.

अब के सजन.. पावसाळ्यात नात्यालाही द्या रोमॅण्टिक चान्स! करा ५ सुंदर गोष्टी-वाढेल रोमान्स

२. जेव्हा मानसिक आरोग्य बिघडते, तेव्हा त्याचा फटका शारीरिक आरोग्यावरही होतो. ज्यामुळे लठ्ठपणा आणि गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम फील गुड हार्मोन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एंडोर्फिन रिलीज करतात. ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो.

३. झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिड होते. ज्यामुळे झोपेचं गणित बिघडतं. त्यामुळे अतिविचार न करता आपण पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.

वर्ल्ड कप जिंकताच लेकरांना फोन करणारा ' हा ' बाप पाहा, काय सांगता कुटुंबासाठी वेळ नाही..

४. आपल्या आयुष्यातून एक व्यक्ती गेल्यानंतर एक पोकळी निर्माण होते. ही पोकळी सहसा लवकर भरून निघत नाही. अशावेळी मित्र आणि कुटुंबियांची मदत घ्यायला हवी. मित्र आणि कुटुंब आपल्याला यातून बाहेर काढण्यास मदत करतील. शिवाय नव्या जीवनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतील.

टॅग्स :हार्दिक पांड्याघटस्फोट