नोकरी करतो ती जागा, तिथलं वातावरण आपल्या मनावर परिणाम करत असतंच. सभोवतालचं वातावरण चांगलं असेल, सहकारी उत्तम असतील, आपल्या कामात प्रोत्साहन मिळत असेल तर अशा ठिकाणी काम करण्याचा आनंद वाढतो. कधीकधी त्याउलट घडतं, आपलं सहकाऱ्यांशी पटत नाही. त्यांचं आपल्याशी वागणं योग्य नसतं. आपण ऑफिस पॉलिटिक्सचा शिकार आहोत असं आपल्याला वाटतं किंवा तसं असतंही. मात्र यासगळ्यात आपल्या मनावर आणि पर्यायानं कामावरही परिणाम होतो. त्याहून वाईट म्हणजे ज्यांच्याशी पटतच नाही त्यांच्याशी जुळवून घेण्याऐवजी गॉसिप करणं सुरु होतं. असं गॉसिपिंग तर वर्क एथिक्ससाठी अत्यंत घातक, आपली माणूस म्हणूनही पत ते कमी करतं.
त्यामुळे कार्यालयात सहकाऱ्यांचा त्रास होत असेल, पटत नसेल तर काय करायला हवं.
(Image : Google)
बघा, एवढं करता येईल का?
१. सगळ्यात पहिले म्हणजे अनेक गोष्टींंकडे तटस्थपणे पहायला हवं. खरंच आपल्याला मुद्दाम त्रास दिला जातो आहे की तो कार्यालयीन कामाचा भाग आहे.
२. कुणाही व्यक्तीच्या मागे त्याविषयी काहीही झालं तरी गॉसिप करायचं नाही.
३. सहकाऱ्यांनी तुमच्याशी ज्याप्रकारे वागावं असं वाटतं तसंच तुम्हीही वागा, इतरांचा आदर करा.
४. काही दिवस सुटी घेऊन कामातून ब्रेक घ्या.
५. शक्य असेल तर स्वत: संवादासाठी पुढाकार घ्या, गैरसमज असतील तर ते बोलून दूर करा.
६. फार राग आला तरी आपण काय बोलतो, कसे बोलते याकडे लक्ष द्या.
७. वरिष्ठांशी सभ्य भाषेत बोलून आपलं मत सांगा, त्यांच्या हेतूविषयी शंका घेऊ नका.
८. आपलं काम चोख करा. प्रामाणिकपणे करा. कामात आळस करणं चूकच आहे.
९. नोकरी सोडण्याचा विचार सगळ्यात शेवटी करा.
१०. आपण इतरांशी जुळवून घेऊ असा विचार करुन सकारात्मक भूमिका घ्या.