लग्न झाल्यानंतरही कधी कधी काहीजणांचे मन दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागते. त्यामुळे आपण दुहेरी जीवन जगत आहोत. (Extra marital affair) ज्यामध्ये आपण सर्व काही विसरून फक्त नवीन नात्यात अडकतो आहोत हे लक्षात येत नाही. जर तुम्ही या नात्यात खूप पुढे गेला असाल आणि नात्यातून बाहेर पडणे कठीण जात असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (How to End an Affair with Someone) आणि हे नवं नातं आयुष्याचा चिखल न होता संपवायचे असेल तर काही गोष्टी करायला हव्यात. (How to get out of extra marital affair)
जर तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये असाल तर सर्वप्रथम त्याचे कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक गोष्टीमागे नक्कीच काहीतरी कारण असते. जेव्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही चांगले होत नाही तेव्हा असे घडते असे तज्ज्ञांचे मत आहे. तसे असल्यास, आपण याकडे लक्ष दिले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते शारीरिक गरजा पूर्ण होत नसतानाही अनेकदा लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर हे तुमच्या पार्टनरला नक्की सांगा. या समस्येबद्दल बोलण्यास अजिबात संकोच करू नका.
आकर्षण वाटणं, प्रेमात पडणं साहजिक असलं तरी लक्षात घ्या विवाहित पुरुषाला डेट करण्यातले धोके
संभाषण हे एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे मोठ्या समस्या देखील सोडवल्या जाऊ शकतात. त्यामुळे जोडीदारापासून काहीही लपवू नका. कधी कधी भावनांच्या अभावामुळे माणसाचे मन भरकटते. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर तुमच्या पार्टनरला त्याबद्दल नक्की सांगा. सुरुवातीला ते तुमचं काहीही ऐकणार नाहीत. परंतु पार्टनरला याबद्दल पूर्वकल्पना देणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा आणि कोणतीही समस्या एकत्र सोडवण्याचा अधिकार आहे.
तुम्ही अजून कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये आहात हे कोणाताही पार्टनर ऐकू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट तुमच्या जोडीदाराला सांगण्यापूर्वी विचार करा की अशी कोणती कारणे आहेत ज्यांमुळे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत आहात.
जे लोक त्यांच्या वैवाहिक जीवनाबाहेर काही बाह्य उत्तेजन शोधत असतात. त्यांच्या नातेसंबंधात समाधानाचा अभाव असतो. म्हणून पार्टनरशी मोकळेपणानं बोलून प्रश्न सोडवता येऊ शकतात.