प्रेमाचे नाते फार सुंदर असते. प्रेमामुळे आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते (Relationship). मात्र, काहींचं प्रेम टिकते. पण काहींना ब्रेकअपचा सामना करावा लागतो (Breakup). अनेक कारणांमुळे नातं संपुष्टात येते. जेव्हा दोन व्यक्तींमधील नाते तुटते, तेव्हा त्या दोघांसाठी हा भावनिक आणि कठीण काळ असतो (Move On). काही लोक आपल्या जोडीदाराशी इतके जोडलेले असतात की त्यांना ब्रेकअप सहन होत नाही (Mental Health).
प्रिय असणारी व्यक्ती जेव्हा दूर जाते, तेव्हा त्याच्यासोबत घालवलेले क्षण विसरणे कठीण होऊन जाते. जर आपण देखील ब्रेकअप झाल्यानंतर एक्सच्या आठवणींमध्ये बुडाले असाल तर, ३ गोष्टी करून पाहा. या टिप्स फॉलो केल्याने एक्सला विसरणं सोपे होईल(How To Get Over A Relationship Breakup).
ब्रेकअप झाल्यानंतर मूव्ह ऑन कसे व्हावे?
स्वत:ला वेळ द्या
ब्रेकअपनंतर स्वत:ला वेळ देणं खूप गरजेचं आहे. स्वत:ला बिझी ठेवणं, हा ब्रेकअपमधून बाहेर पडण्याचा सर्वांत उत्तम मार्ग आहे. जितके जास्त कामात व्यग्र राहाल, तितके तुम्ही मूव्ह ऑन होऊ शकाल. अशावेळी नवीन गोष्टी शिकण्यात व्यस्त राहा. नवीन छंद किंवा व्यायाम करा.
पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात; पचनक्रिया बिघडेलच- फुफ्फुसावरही होईल परिणाम
मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा
मूव्ह ऑन होण्यासाठी मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवा. कुटुंबातील सदस्य आणि मित्र तुम्हाला यातून बाहेर काढण्यास मदत करतील. शक्यतो फ्रेण्ड सर्कलमध्ये राहा. यामुळे आपल्याला एक्सची आठवण येणार नाही.
रात्री पाण्यात भिजवा, सकाळी खा ‘या’ ६ प्रकारच्या बिया- गळणारे केस-वाढलेलं वजन होईल कमी
एक्ससोबतचे सर्व संपर्क तोडा
एक्स सोबत संपर्कात राहू नका. जर तुम्ही अजूनही एक्सला फॉलो करत असाल तर, लगेच ब्लॉक करा. एक्ससोबत असलेले फोटो सगळे डिलीट करा, चॅट्सही डिलीट करा.