Lokmat Sakhi >Relationship > How to Improve Sexual Performance : जोडीदारावर प्रेम आहे पण सेक्सची इच्छाच होत नाही? सुखी वैवाहिक जीवनासाठी ५ उपाय

How to Improve Sexual Performance : जोडीदारावर प्रेम आहे पण सेक्सची इच्छाच होत नाही? सुखी वैवाहिक जीवनासाठी ५ उपाय

How to Improve Sexual Performance : उत्तेजना येत नाही, एक्साइटमेण्ट अजिबात नसते. खूप जोडप्यांमध्ये ही समस्या असते पण खुलेपणानं मात्र काही बोललं जात नाही. किंवा मग मनाला जे हवे असते त्यासाठी शरीर साथ देत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 04:53 PM2022-09-07T16:53:33+5:302022-09-07T16:56:37+5:30

How to Improve Sexual Performance : उत्तेजना येत नाही, एक्साइटमेण्ट अजिबात नसते. खूप जोडप्यांमध्ये ही समस्या असते पण खुलेपणानं मात्र काही बोललं जात नाही. किंवा मग मनाला जे हवे असते त्यासाठी शरीर साथ देत नाही.

How to Improve Sexual Performance : How to get turned on Tips, tricks, and remedies | How to Improve Sexual Performance : जोडीदारावर प्रेम आहे पण सेक्सची इच्छाच होत नाही? सुखी वैवाहिक जीवनासाठी ५ उपाय

How to Improve Sexual Performance : जोडीदारावर प्रेम आहे पण सेक्सची इच्छाच होत नाही? सुखी वैवाहिक जीवनासाठी ५ उपाय

वैवाहिक नात्यात लैंगिक सुख, आनंदाची देवाणघेवाणही आवश्यक असते, तर संसार सुखाचा होतो. (Wedding Life) उत्तम वैवाहिक सुखासाठी आणि सुखी नात्यासाठी पैसे, स्वभाव याबरोबर उत्तम लैगिंक जीवनही महत्वाचं असतं. सेक्स लाइफ हेल्दी आणि सुखकर असेल तर नात्यातले अनेक काच कमी होतात. (Sexual Health Tips)  त्याउलट समस्या लैंगिक असतात मात्र त्याविषयी बोलता न आल्यानं अन्य लहानसहान कारणांवरुन जोडप्यांमध्ये सतत भांडणं होताना दिसतात. एक प्रश्न यात गंभीर आहे, जोडीदारांपैकी कुणा एकाला सेक्समध्ये रसच नसतो किंवा कमी असतो. उत्तेजना येत नाही, एक्साइटमेण्ट अजिबात नसते. खूप जोडप्यांमध्ये ही समस्या असते पण खुलेपणानं मात्र काही बोललं जात नाही किंवा मग मनाला जे हवे असते त्यासाठी शरीर साथ देत नाही. (How to get turned on Tips, tricks, and remedies)

त्यासाठी खरंतर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मात्र त्यापूर्वीही काही गोष्टी समजून लहानसहान बदल केले तर सेक्स लाइफमध्ये सुधारणा होऊन नातंही अधिक सुखकर होऊन संसार समाधानाचा होऊ शकतो.   वेबएमडीच्या रिपोर्टनुसार तणाव आणि नातेसंबंध समस्या कधीकधी उत्तेजनावर परिणाम करू शकतात. त्यामुळे उत्तेजनाच कमी असणे, सेक्स भावनाच नसणे यात मानसिक अडथळे-समज गैरसमज-भीती-नावड आहे की काही हार्मोनल त्रास याविषयी डॉक्टर सल्ला आणि औषधोपचार यांसह मदत करु शकतात.
तत्पूर्वी काही गोष्टी घरीही शांतपणे समजून उमजून करता येतील. (Sexual Health Tips) 


१. फोरल प्ले

फोरले प्ले सेक्समध्ये आपली भूमिका बजावण्यास आणि आनंदावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. फोर प्लेमध्ये तुम्ही जोडीदाराशी आपल्या लैंगिक अपेक्षांबद्दल बोलू शकता, जोडीदाराचा हात हातात घेणं, त्याच्याशी प्रेमानं बोलणं या गोष्टींबद्दल तुम्ही जोडीदारासह फोर प्लेमध्ये बोलू शकता.

२. फोटोज पाहणं

तुम्ही आणि तुमचा जोडीदारा काही सेक्सी, हॉट फोटो पाहू शकता. तुमचे स्वत:चे एकत्र आनंदी फोटोही पाहू शकता. चांगल्या रोमॅण्टिक आठवणींना उजाळा देऊ शकता.

३. सेन्शुअल एरिया

जर तुमचे मन लैंगिक संबंधांसाठी तयार नसेल तर तुम्ही तुमच्या संवेदनशील अवयवांवर लक्ष केंद्रीत करू शकता. यामुळे हळूहळू शरीराच्या तापमानात बदल व्हायला सुरूवात होईल.

४. पार्टनरसह शॉवर घेणं

जर तुम्हाला उत्तेजना येत नसतील तर तुम्ही पार्टनरसह एकत्र शॉवर घेऊ शकता. यामुळे हळूहळू तुमच्या उत्तेजना वाढतील आणि पार्टनरसोबतच बॉन्डींग अधिक वाढेल.

५. रोमॅण्टिक सिनेमे पाहा

जर तुम्हाला उत्तेजना येत नसतील तर तुम्ही रोमॅन्टीक सिनेमे पाहू शकता. या चित्रपटांमधील फॅन्टसी पाहिल्यानंतर तुम्हाला पार्टनरबद्दल आकर्षण वाटू शकतं.

Web Title: How to Improve Sexual Performance : How to get turned on Tips, tricks, and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.