पुरूषांचे लैगिंक आरोग्य चांगले राहण्यासाठी २ गोष्टी खूप गरजेच्या आहेत. ते म्हणजे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन आणि स्पर्म काऊंट. या दोन गोष्टींची कमतरता भासल्यास पुरूषांच्या सेक्शुअल हेल्थवर (Sexual Health Tips) चुकीचा परिणाम होऊ शकतो. पुरूषांच्या लैगिंक आरोग्याबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. भारतीय पुरूषांमध्ये इन्फर्टिलिटीचा दर वाढत आहे. (Study on mens health revealed sharp fall in sperm count in men know foods that increase sperm count quickly)
५३ देशांमध्ये पुरूषांचे स्पर्म कमी असल्याचं दिसून आलं
ह्यूमन रिप्रोडक्शन अपडेट जर्नलमध्ये छापलेल्या अभ्यासानुसार १९७३ ते २०१८ यादरम्यान पुरूषांचा एव्हरेज स्पर्म काऊंट ५.१६ टक्क्यांनी कमी झाला आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या अभ्यासात युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्टेलिया, सेंट्रल अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशिया या खंडातील पुरुषांच्या शुक्राणूंचा काऊंट १०१.२ m प्रति मिलिलीटर पासून ४९.०.m प्रति मिलीलीटर राहिली आहे.
संशोधनानुसार पुरुषांच्या एकूण शुक्राणूंच्या संख्येतही घट नोंदवण्यात आली आहे. याच कालावधीत एकूण शुक्राणूंची संख्या ६२.३ टक्क्यांनी कमी झाली आहे. आकडेवारी दर्शवते की २००० सालानंतर शुक्राणूंच्या संख्येत दरवर्षी २.६४ टक्के घट झाली, जी मागील कालावधीपेक्षा खूप जास्त आहे. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, शुक्राणूंच्या संख्येतील घट सहसा आढळून येत नाही. जेव्हा बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न करता तेव्हा पुरुषांची ही समस्या समोर येते. शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या समस्येला ऑलिगोस्पर्मिया म्हणतात, ज्याचे मुख्य लक्षण म्हणजे वंध्यत्व (मुल न होणे).
लो स्पर्म काऊंटची लक्षणं
शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जी हार्मोनल असंतुलन, गुणसूत्र असामान्यता, टेस्टिक्युलर समस्या किंवा इतर अडथळ्यांमुळे असू शकतात. सेक्स ड्राइव्हमध्ये कमरता, इरेक्टाइल डिसफंक्शन, अंडकोषात किंवा त्याभोवती सूज आणि वेदना, चेहरा आणि शरीरावरील केस गळणे.
स्पर्म काऊंट वाढवण्याचे उपाय
हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार स्पर्म काऊंट वेगानं वाढण्यासाठी हेल्दी आहार घेणं महत्वाचं आहे. जेवणात फळं, भाज्या, मासे, चिकन यांचा समावेश करा. रेड मीट, फ्राईड फूड आणि साखरयुक्त पदार्थांपासून लांब राहा. कारण यामुळे तुमचा स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो.
छातीत साचलेला कफ बाहेर काढतील ४ उपाय, थंडीत जाणवणार नाही सर्दी, खोकला
केळी
पुरूषांच्या आरोग्यासाठी केळी फायदेशीर मानले जाते. त्यात ब्रोमेलेन एन्झाइम असते. जे शुक्राणूंची संख्या वाढवतात. यासोबतच केळीमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन सी असे अनेक आरोग्यदायी घटक असतात.
लसूण
एक्सपर्ट्स पुरुषांना लसूण खाण्याचा सल्ला देतात. कारण, या अन्नामध्ये शुक्राणूंची कमी संख्या हाताळणारे एंजाइम देखील असते, ज्याला सेलेनियम म्हणतात. यासोबतच लसूण खाल्ल्याने पुरुषांना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासूनही संरक्षण मिळते. या समस्यांमुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
थंडीत शिंगाडा खाल तर गॅस, एसिडिटीसह ७ आजारांपासून राहाल लांब; हे आहेत गुणकारी फायदे
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया पुरुषांच्या आरोग्यासाठी चमत्कारिक असतात. जे पुरुष रोज भोपळ्याच्या बियांचे सेवन करतात त्याचे सेक्शुअल हेल्थ चांगले राहते. कारण, या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायटोस्टेरॉल आणि अमीनो अॅसिड असतात, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या वेगाने वाढते.