Join us  

मूल झाल्यावर नवरा-बायकोच्या नात्यात अंतर पडलं? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 9:55 AM

How to Maintain String Bond With Partner After Having Kids Relationship Tips : आई-वडीलांचे एकमेकांशी चांगले बॉंडींग असेल तर मुलांचे आपल्या पालकांशी चांगले बॉंडींग तयार होते.

ठळक मुद्देमूल झाल्यावर जोडीदारासोबतचे नाते आणखी घट्ट व्हायला हवे..जोडीदाराशी असणारा बॉंड मूल झाल्यावरही टिकावा यासाठी दोघांनीही प्रयत्न करायला हवेत..

लग्न म्हणजे एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याची, एकमेकांना सुख-दु:खात साथ करण्याची घेतलेली एकप्रकारची शपथ. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्यासोबत आपला जोडीदार असेल तर आपलं जगणं नक्कीच सोपं होतं. लग्नानंतर असणारं हे गुलाबी नातं मूल झाल्यावर मात्र एकाएकी बदलतं आणि एरवी एकमेकांशिवाय पानही न हलणारे जोडीदार एकमेकांपासून काहीसे दुरावतात.

मूल झाल्यावर सगळ्या गोष्टी मुलाभोवती फिरत असल्याने नकळतच जोडीदारांमधील जवळीक कमी व्हायला लागते. मात्र आई-वडीलांचे एकमेकांशी चांगले बॉंडींग असेल तर मुलांचे आपल्या पालकांशी चांगले बॉंडींग तयार होते. आई-वडील एकमेकांशी कनेक्ट नसतील तर मुलेही तितकी चांगली कनेक्ट होऊ शकत नाहीत (How to Maintain String Bond With Partner After Having Kids Relationship Tips). 

(Image : Google)

आई-वडीलांमध्ये गॅप पडण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण..

काही अभ्यासांवरुन असे सिद्ध झाले आहे की मूल झाल्यानंतर जवळपास ८० टक्के पालक आपल्या बाळाला दोघांच्या मध्यभागी झोपवतात. त्यामुळे जोडीदारांचा एकमेकांशी असणाऱ्या बॉंडवर त्याचा परीणाम होतो. मुलांना प्रेमाची, पालनपोषणाची जितकी आवश्यकता असते, तितकीच जोडीदारांनाही एकमेकांच्या सहवासाची, प्रेमाची आवश्यकता असते हे दोघांनीही लक्षात घ्यायला हवे. जोडीदारांमधील प्रेमाचे नाते आधीसारखेच फुललेले राहायला हवे असेल तर शारीरिक संबंध, एकमेकांची ओढ या गोष्टी महत्त्वाच्या असतात. 

पालकांची भूमिका निभावत असताना आपल्या शारीरिक, भावनिक, मानसिक गरजा जोडीदाराकडून पूर्ण होतात ना त्याकडेही पुरेसे लक्ष द्यायला हवे. त्यामुळे हा छोटासा बदल तुमच्या रीलेशनला फुलवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे हे वेळीच लक्षात घ्या. मूल झाल्यापासून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असणारा बॉंड मिस करत असाल तर हे नाते पुन्हा पहिल्यासारखे व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी पुढाकार घेऊन काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. एकमेकांना पुरेसा वेळ देणे, गप्पा मारणे, शारीरिक संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात.  

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपपालकत्व