Lokmat Sakhi >Relationship > एकदम बोअर झालंय लाइफ? नात्यातला रोमांसच संपला? अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय, छान सोपा उपाय

एकदम बोअर झालंय लाइफ? नात्यातला रोमांसच संपला? अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय, छान सोपा उपाय

Relationship Tips: कधी कधी नात्यांमध्ये आलेला तोच तो एकसारखेपणा खूपच कंटाळवाणा वाटू लागतो.. नात्याला पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 01:19 PM2022-09-10T13:19:14+5:302022-09-10T13:19:51+5:30

Relationship Tips: कधी कधी नात्यांमध्ये आलेला तोच तो एकसारखेपणा खूपच कंटाळवाणा वाटू लागतो.. नात्याला पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून बघा...

How to refresh your relationship? Special relationship tips given by actress Bhagyashree  | एकदम बोअर झालंय लाइफ? नात्यातला रोमांसच संपला? अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय, छान सोपा उपाय

एकदम बोअर झालंय लाइफ? नात्यातला रोमांसच संपला? अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय, छान सोपा उपाय

Highlightsआपण घर, दागिने, संपत्ती या सगळ्या गोष्टी जमवण्यासाठी जशी आयुष्यभर थोडी थोडी गुंतवणूक करतो, तशी गुंतवणूक नात्यासाठीही करा.

लग्नानंतर काही वर्षे उलटून गेली की काही जणांच्या आयुष्यात हे एक वळण येतं. आपलं रुटीन एक सारखं असतं. नवरा- बायको दोघेही आपापल्या कामात गढून गेलेले असतात. दोघांनाही एकमेकांसाठी वेळच नसतो. अशावेळी दोघांच्याही आयुष्यात एक प्रकारचा एकसुरीपणा येऊन जातो. त्यामुळे मग नात्यामधला रोमान्स कमी होऊन हळूहळू मग एकमेकांच्या सहवासातही आनंद वाटेनासा होतो. हेच कंटाळवाणं नातं पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी (How to refresh your relationship?) हा एक सोपा उपाय करून बघा. अभिनेत्री भाग्यश्री हिने खास तिच्या अनुभवातून हा सल्ला दिला आहे. 

 

अभिनेत्री भाग्यश्री दर मंगळवारी तिच्या चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ शेअर करत असते. तिचे बरेचसे व्हिडिओ फिटनेस संदर्भात असतात. पण यावेळी मात्र तिने खास रिलेशनशिप संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणतेय की आपण नेहमीच आपल्या रुटीनमध्ये एवढे अडकून जातो की आयुष्यातली जी गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, त्या आपल्या नात्यालाही आपल्याला वेळ देता नाही. पुरेसा वेळ देता आला नाही तर मग नात्यातला नवेपणा, ताजेपणा संपून जाताे. त्यासाठी जमेल तशा आपल्या पार्टनरसोबत लहान- लहान ट्रिप प्लॅन करा, असा सल्ला भाग्यश्री देते आहे. 

 

एकमेकांसाेबत सहलीला गेल्यामुळे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवता येतो. एकमेकांच्या बोलण्यातून, गप्पांमधून आपण अधिक जवळ येतो. पार्टनरला आणखी चांगल्याप्रकारे ओळखून, समजून घेऊ शकतो. आपण घर, दागिने, संपत्ती या सगळ्या गोष्टी जमवण्यासाठी जशी आयुष्यभर थोडी थोडी गुंतवणूक करतो, तशी गुंतवणूक नात्यासाठीही करा. आणि छोट्या- छोट्या सहली प्लॅन करण्यातून अशी नात्यांमध्ये गुंतवणूक करता येते, असंही ती सांगते आहे.  

 

Web Title: How to refresh your relationship? Special relationship tips given by actress Bhagyashree 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.