तुम्ही लव्ह बाईटबद्दल अनेकदा ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. शरीराच्या कोणत्याही भागावर हे डाग दिसू शकतात. काहीजणांना मानेवर किंवा गालावरील हे डाग फ्लॉन्ट करण्यास आवडतं. (How to Get Rid of Hickies Fast) लव्ह बाईट हा अनेकदा गमतीचा विषयही असू शकतो. तर काहींना अवघडल्यासारखं वाटतं हे डाग कधी जातील असं वाटतं. (How to remove love bite marks)
लव्ह बाईट्स का येतात?
लव्ह बाईट्स अशावेळी दिसतात जेव्हा शरीरावर कोणत्याही प्रकारचे डाग तयार होऊन रक्त वाहिन्या उत्तेजित होतात आणि आपल्या शरीरातील त्या भागात रक्त जमा होण्यास सुरूवात होते. (Quick and Easy Ways to Get Rid of love bites) या डागांना लव्ह बाईट्स किंवा हिकी असं म्हणतात. जेव्हा हा रंग अधिक गडद लाल किंवा जांभळा होतो तेव्हा ते सहज दिसून येतात. शरीराच्या ज्या भागाची स्किन जास्त पातळ असते. अशा ठिकाणी हे डाग पडतात. यामुळे लोक उत्तेजित होतात.
सामान्यपणे आपल्या पार्टनरवर प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक लव्ह बाईट देतात. कारण लव्ह बाईट शरीरावर अनेक दिवस तसाच राहतो. काहीजणांना लव्ह बाईट्स अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या पार्टनरची परवानगी आधी घ्यावी लागते. पार्टनरची इच्छा नसताना लव्ह बाईट देण्याचे नकारात्मक परीणाम होऊ शकतात.
लव्ह बाईट घालवण्याचे उपाय
लव्ह बाईट पूर्णपणे काढले जाऊ शकत नाहीत हे आधी लक्षात घ्यायला हवं. काही टिप्स वापरून तुम्ही हे डाग काढू शकता. ही प्रक्रिया थोडी किचकट असते. ज्या ठिकाणी तुम्हाला लव्ह बाईट दिलं गेलं आहे त्या ठिकाणी थंड चमचा ठेवून त्वचा व्यवस्थित दाबून घ्या नंतर त्या ठिकाणी बर्फाचा वापर करा जेणेकरून सूज कमी होईल.
ज्या ठिकाणी तुम्हाला लव्ह बाईट मिळाले आहे तिथे तुम्ही एलोवेरा लावू शकता. यामुळे लव्ह बाईट लवकर बरे होतात. एलोवेरा त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला कमी वेळात लव्ह बाईट घालवायचे असतील तर हलक्या हातानं एलोवेरा जेल लावून मसाज करा.
डॉ. भाग्यश्री यांनी इंस्टाग्राम पेजवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. लव्ह बाईट्सेच डाग घालवण्यासाठी कोल्ड कम्प्रेसचा वापर करा. बर्फाच्या संपर्कात आल्यानं त्वचेचा लालसरपणा कमी होण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही व्हिटामीन के ची क्रिमही वापरू शकता. तरीसुद्धा जर लव्ह बाईट्सचे डाग जात नसतील तर मेकअपनं कव्हर करा.