Lokmat Sakhi >Relationship > बायकांसाठी वेगळा कंडोम असतं का? फिमेल कंडोमविषयी माहिती हव्या ५ गोष्टी, तरच वापरणं सोपं

बायकांसाठी वेगळा कंडोम असतं का? फिमेल कंडोमविषयी माहिती हव्या ५ गोष्टी, तरच वापरणं सोपं

How to Use a Woman Condom : फिमेल कंडोमविषयी समाजमाध्यमात व्हायरल चर्चा असते, पण ते वापरण्याआधी माहितीच हव्या ५ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 04:14 PM2023-10-05T16:14:45+5:302023-10-06T15:32:02+5:30

How to Use a Woman Condom : फिमेल कंडोमविषयी समाजमाध्यमात व्हायरल चर्चा असते, पण ते वापरण्याआधी माहितीच हव्या ५ गोष्टी

How to Use a Woman Condom : How to Use Female Condoms Follow Easy Instructions While Using | बायकांसाठी वेगळा कंडोम असतं का? फिमेल कंडोमविषयी माहिती हव्या ५ गोष्टी, तरच वापरणं सोपं

बायकांसाठी वेगळा कंडोम असतं का? फिमेल कंडोमविषयी माहिती हव्या ५ गोष्टी, तरच वापरणं सोपं

फिमेल कंडोम्सबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल किंवा जाहिरातीतून पाहिले देखिल असेल. सेक्शुअल एज्युकेशन संदर्भात आजही खुलेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळे लोकांच्या  मनात अनेक समज गैरसमज आहेत. (What is female condom) नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी, सेक्शुअली ट्रांन्समिटेड आजार म्हणजेच लैंगिक संबंधातून परसणारे आजार टाळण्यासाठी ज्या प्रमाणे पुरूष कंडोम वापरतात. त्याचप्रमाणे महिलाही कंडोम वापरू शकतात. (How to Use a Woman Condom)

हे फक्त गर्भनिरोधक नसून याच्या वापराने महिलां अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. निर्वासा  हेल्थ केअरचे डॉक्टर मनमोहन सिंह यांनी एका हिंदी वेबपोर्टलला याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Female Condom Use What You Need to Know) डॉक्टरांच्यामते फिमेल कंडोम कॉन्ट्रासेप्शनचा एक परिणामकारक उपाय आहे.

ज्यामुळे सेक्शुअली ट्रांसमिडेट डिसीजचा धोका टाळतो. योग्य पद्धतीने वापरल्यास पुरेपूर संरक्षण मिळते. फिमेल कंडोम वापरण्यासाठी महिलांनी गायनॅक डॉक्टरांकडून त्याच्या वापराबाबत ट्रेनिंग घ्यायल हवी. (How to Use Female Condoms Follow Easy Instructions While Using)

फिमेल कंडोम कितपत सुरक्षित?

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिमध्ये पब्लिश झालेल्या एका रिसर्चनुसार फिमेल कंडोम इफेक्टिव्ह ठरते. रिसर्चमध्ये ६ हजार ९११ महिलांच्या डेटावर अभ्यास करण्यात आला.  यानुसार फिमेल कंडोम्स हे  ९५ टक्के इफेक्टिव्ह असतात. तर पुरूषांचे कंडोम ९८ टक्के इफेक्टिव्ह असतात. एकाचवेळी दोन्ही कंडोम्सचा वापर केल्यास गोनोरिया, क्लॅमिडिया, एचआयव्ही यांसारख्या गंभीर आजारांचा धोका टळतो. प्रेग्नंसी रोखण्यासही मदत होते. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा धोकाही टळतो.

हे कंडोम कसे वापरायचे? (How to Use Internal Condoms)

१) मेल कंडोमच्या तुलनेत फिमेल कंडोम वापरणं थोडं किचकट असतं.  पुरूष आणि महिला दोघांनी  या कंडोमच्या वापराबाबत काळजी घ्यायला हवी. वापरादरम्यान हे कंडोम फाटू नये याकडे लक्ष द्यावे.

२) मेल किंवा फिमेल दोघांचे कंडोम्स वापरादरम्यान फाटले तर वापराचा काही उपयोग होणार नाही. मेल स्किनच्या संपर्कात येण्याआधी व्हजायनात हे इन्सर्ट करायला हवं. (How is a female condom used)

लग्न झालेल्या महिलांकडे तरुण जास्त आकर्षीत होतात हे खरं की खोटं? रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात..

३) अनेकदा गायनॅक डॉक्टरांकडून यासाठी ल्युब्रिकेशन्सचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे हे कंडोम इनसर्ट करणं सोपं जातं. हे वापरण्यासाठी स्क्वाट्स, झोपणं किंवा खुर्चीवर एक पाय ठेवून पाय लांब करणं या पोझिशन्स सोप्या असतात.

लग्नानंतर काही महिन्यातच सेक्समधला इंटरेस्ट कमी होतो? या समस्येचं कारण काय? तज्ज्ञ सांगतात..

४) पिरिएड्समध्ये टेम्पोनचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे फिमेल कंडोम आत टाकावे लागते. रिंगसारखा भाग फोल्ड करून आत इंसर्ट केला जातो.

५) कंडोमचा दुसरा भाग व्हजायनल ओपनिंगच्या बाहेर असतो.  आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरचा योग्य सल्ला न घेता, कंडोम कसे वापरायचे हे शिकून न घेता ते वापरु नये.

Web Title: How to Use a Woman Condom : How to Use Female Condoms Follow Easy Instructions While Using

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.