अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा (Genelia D'Souza) यांची जोडी म्हणजे बॉलीवूडमधली एक मस्त जोडी. दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी असतात. शिवाय दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे एवढं स्टारडम असतानाही त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत. तेच संस्कार त्यांच्या मुलांवरही त्यांनी केले आहेत. रितेशच्या घरात असणाऱ्या मराठी संस्कृतीला, चालीरितींना समजून घेत त्यानुसार स्वत:मधे अनेक बदल करणाऱ्या जेनेलियाचं कौतुक तर सगळीकडेच होतंच. पण एका मुलाखतीत मात्र जेनेलियाने रितेशचं तोंडभरून कौतुक केलं असून त्याच्यासारखा नवरा मिळाल्यामुळे ती स्वत:ला नशिबवान समजते, असं सांगितलं.
जेनेलियाच्या एका मुलाखतीचा एक छोटासा भाग bossbabe.sayings या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जेनेलिया सांगते की रितेशला स्त्रियांविषयी, बायकोविषयी अतिशय आदर आहे.
बसून बसून पायाचा घोटा आखडून जातो- चालताना दुखतो? भाग्यश्री सांगते पायांना मजबुती देणारे ५ व्यायाम
आजही कित्येक पुरुष स्वत:च्या बायकोला, घरातल्या- आजुबाजुच्या स्त्रियांना कमी लेखतात. पण रितेश मात्र तसा मुळीच नाही. जेनेलिया सांगते की बऱ्याचदा तिला कामानिमित्त घराबाहेर राहावं लागतं. अशावेळी रितेश संपूर्ण घराची, मुलांची जबाबदारी स्वत:हून अंगावर घेतो आणि पूर्ण मन लावून पार पाडतो. त्याला तसं करण्यात मुळीच कमीपणा वाटत नाही.
आजही बऱ्याच पुरुषांचे हेच विचार आहेत की त्यांनी घराबाहेर राहून काम करावं, घर, मुलं, घरातली कामं हे सगळं बायकोने पाहावं. पण रितेश मात्र तसा मुळीच नाही. तो कधीही हे काम त्याचं, हे काम माझं असं भासवत नाही.
वाढदिवसाला केक, पेस्ट्री खाणं महागात पडू शकतं! FSSAI ने दिला कॅन्सरचा धोका- 'हे' केक खाणं टाळाच
कधी कधी घर सांभाळण्याची, मुलांकडे पाहण्याची जबाबदारी नवऱ्यावर आली तर ते ती टाळण्याचा प्रयत्न करतात. किंवा ती जबाबदारी पार पाडून बायकोवर आपण किती उपकार केले आहेत, याची जाणीव तिला करून देतात. अनेक महिलाही नवऱ्याला घर सांभाळावं लागलं, मुलांकडे पाहावं लागलं म्हणून स्वत:ला अपराधी मानतात. पण रितेश आणि जेनेलियाच्या संसारात मात्र असा कामातला भेदभाव मुळीच नाही. हाच रितेशचा स्वभाव तिला आवडतो आणि त्याच्या याच गुणांमुळे ती त्याची बायको असल्याबद्दल स्वत:ला नशिबवान मानते...