Join us  

सिंगल आहात, तर ४ समस्या तुम्हालाही छळू शकतात? ‘एकाकी’पणा छळू नये म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2022 4:18 PM

Being Single Problems सिंगल असण्याचे फायदे आहेतच, पण आपण एकटे राहण्याचा निर्णय घेतला तरी एकाकीपणा छळू नये म्हणून काही गोष्टी करायला हव्यात..

"शादी का लड्डू, जो खाए पछताए जो न खाए वो भी पछताये…" बरेच लोकं सांगतात लग्न ही एक अशी ट्रेन आहे, ज्यात बसलेले लोकं बाहेर यायला तडफडतात आणि बाहेर असलेले ट्रेनमध्ये बसायला तडफडतात. मात्र, पार्टनर हवा तसा मिळाला तर, रिलेशनशिपमध्ये असण्याचा पश्चाताप होत नाही. सुख दुःख शेअर करण्यासाठी, एक मानसिक आधार देण्यासाठी, घराचा गाडा हाकण्यासाठी, पार्टनर हवाच असंही सगळे सांगतात. मात्र सिंगल लाईफचेही फायदे भरपूर आहेत. जबाबदारी कमिटमेण्ट यापलिकडे आपल्याला आपले आयुष्य बेतता येते.मात्र सिंगल असताना काही त्रासही होऊ शकतात, ते माहिती असले तर आपल्यालाच योग्य ते निर्णय योग्य वेळी घेता येतात.

१. भावनिक आधार कुठं शोधायचा?

प्रत्येक माणसाला आयुष्यात कोणीतरी भावनिकदृष्ट्या बळ देण्याची गरज असते. नातेसंबंधात, लोकांना भावनिक आधार देण्यासाठी जोडीदार असतो, परंतु एकट्याला भावनिक आधार आपण कुठं शोधायचा असे प्रश्न पडलेच तर तारतम्य ठेवून वागावे लागते. भावनिक आधार शोधण्याच्या नादात अनेकजण चुका करतात किंवा मग निराश, कडवट होतात.

२. खूप स्ट्रेट येतो तेव्हा

असे मानले जाते की जे लोकं अविवाहित असतात ते खूप आनंदी राहतात. मात्र स्ट्रेस त्यांनाही येतोच, अशावेळी स्ट्रेसचं योग्य नियोजन शिकून घ्यायला हवं.

३. शारीरिक आजारात सोबत शोधताना..

एकटे राहिल्याने तणाव निर्माण होतो. तणाव हे अनेक आजारांचे कारणही बनते. शारीरिक आजारात कुणीतरी दोस्त, नातेवाईक सोबत असणं असं वाटतं. त्यासाठी आपल्याला मदत करेल असं वर्तुळ तयार करायला हवं.

४. सपोर्ट सिस्टिम हवी

आपण एकटे असलाे तरी एकाकी नाही हे लक्षात ठेवून उत्तम सपोर्ट सिस्टिम, कुटुंब, नातेवाईक यासह योग्य परिवारही सोबत हवा. त्यासाठी आपणच आपली सपोर्ट सिस्टिम तयार करुन इतरांनाही मदत करायला हवी.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप