९ वीच्या वर्गात विज्ञानाचा एक धडा फक्त मुलींना शिकवला जातो. मुलांना बाहेर जा सांगितले जाते. आठवतंय का कोणता धडा असावा? (Importance Sex Education ) मासिकपाळी आणि प्रजनन या संबंधित हा धडा आहे. आपल्याकडे पाळी, सेक्स, प्रेम या विषयांच्या पाट्या झाकून ठेवण्याची पद्धत आहे. जर कोणी या विषयांवर उघड बोलले तर, त्याला विरोध केला जातो.(Importance Sex Education ) मग योग्य वयात या विषयांबद्दल माहिती न मिळाल्यामुळे तरुणांची उत्सुकता वाढते. माहितीचे मार्ग त्यांचे तेच शोधून काढतात. ही माहिती पालकांकडून, शिक्षकांकडून मिळणे गरजेचे असते. पण संवादाच्या अभावामुळे तरुण वर्ग त्यांच्या वयाच्या मुलांनी बघू नयेत, अशी मॅगझिन्स, पॉर्नसाईट्स बघण्याकडे वळतो.
सेक्स एज्युकेशन लांबचीच गोष्ट. आपल्या देशात सेक्स हा शब्द वापरणेही चुकीचे मानले जाते. शिक्षकांच्या आधी पालकांनी मुलांना लैंगिक गोष्टींविषयी सोप्या शब्दात शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. सेक्स एज्युकेशन ही मॉडर्न कल्पना वगैरे नसून ती काळाची गरज आहे.(Importance Sex Education ) तरुणांची सेक्स बद्दलची किंवा शरीर रचनेबद्दलची उत्सुकता पालकांकडून दाबून ठेवली जाते. पण मग ती वाईट मार्गांनी बाहेर येते. आजकाल गुगल, इंटरनेटवर सर्वच उपलब्ध आहे. तिकडून ही माहिती मुलं मिळवतात. अज्ञानातून पावले उचलतात आणि मग पश्चाताप करायची वेळ येते. आपण तरूणांना दोष देतो. पण खरंच दोष त्यांचा आहे का?
तुमच्या पाल्याला सेक्सबद्दल कुठून ना कुठून कळणारच आहे. त्यांच्या माहितीचा योग्य स्त्रोत तुम्हीच आहात. भारतात आता सेक्स एजुकेशन देण्याची चर्चा सुरू आहे. सुधार होण्यात वेळ लागेलच. फक्त सेक्सच नाही, आणखी अनेक विषय आहेत ज्यावर संवाद होणे गरजेचे आहे. एक आई म्हणून प्रत्येक महिलेने आपल्या मुलाला ही माहिती दिलीच पाहिजे. पण मुलीला सर्व व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजे. मुलीशी हा संवाद एका आई पेक्षा चांगला कोणीच साधु शकणार नाही. नव्या डिजिटल काळात आपल्या मुलांना संपूर्णत: सुरक्षित ठेवायचे असेल तर सेक्स एज्युकेशन, त्याविषयी मोकळा संवाद अत्यंत आवश्यक आहे.