Lokmat Sakhi >Relationship > कुकर, सुटकेस, बाहुलीच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्याशीच लग्न; का करतात माणसं असं? हे प्रेम की आजार..

कुकर, सुटकेस, बाहुलीच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्याशीच लग्न; का करतात माणसं असं? हे प्रेम की आजार..

वस्तुंशी लग्न ही वरकरणी चटपटीत बातमी वाटत असली तरी या मागे एक गंभीर समस्या आहे, एकप्रकारचा आजार आहे. त्या आजाराचं प्रमाण जगभर वाढतं आहे.  काही माणसांना काही वस्तू प्राणाहून प्रिय होतात कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 05:18 PM2021-10-02T17:18:06+5:302021-10-02T17:22:40+5:30

वस्तुंशी लग्न ही वरकरणी चटपटीत बातमी वाटत असली तरी या मागे एक गंभीर समस्या आहे, एकप्रकारचा आजार आहे. त्या आजाराचं प्रमाण जगभर वाढतं आहे.  काही माणसांना काही वस्तू प्राणाहून प्रिय होतात कारण..

indonesia man married cooker, girl from russia to briefcase, why people get married to object? what is objectophilia? | कुकर, सुटकेस, बाहुलीच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्याशीच लग्न; का करतात माणसं असं? हे प्रेम की आजार..

कुकर, सुटकेस, बाहुलीच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्याशीच लग्न; का करतात माणसं असं? हे प्रेम की आजार..

Highlightsवाटतं तितका सोपा नाही हा विषय, मोठा खेळ आहे मनाचा.

चारच दिवसांपूर्वीची बातमी, इंडोनेशियातल्या जावा येथे राहणाऱ्या खोईरुल अनाम या तरुणानं राइस कुकरशी लग्न केलं. ते अर्थातच सोशल मीडियात जगभर गाजलं. बा-कायदा कुकरशी लग्न करणारा हा तरुण, त्यानं विधिवत लग्न केलं. आणि आता चार दिवसानंतर त्यानं त्या कुकरला घटस्फोटही दिला. म्हणाला, रोज रोज भातच करुन खायला घालतो तो असं त्यानं घटस्फोटाचं कारणही दिलं. रोज काहीतरी नवीन आकर्षण शोधणाऱ्या सोशल मीडियात या तरुणाच्या कुकर लग्नाचं आणि घटस्फोटाची भारी चर्चा झाली. कुणी म्हणालं की, हा सारा फेमस होण्याचा सोशल मीडिया ड्रामा आहे. असं कुणी कुकरच्या प्रेमात पडून लग्न करतं का? मुळात निर्जिव व्यक्तींशी कुणी लग्न करतं का?

तर या खोईरुलचं माहित नाही, पण जगात वस्तूंशी लग्न करण्याची ही काही पहिलीच घटना नाही. अनेकजण वस्तूंशी लग्न करतात, कुणी तर रेल्वे स्टेशन, आयफेल टॉवरशीही लग्न केलेले आहे.
त्याचं कारण मोठं गंभीर आहे. वस्तुंशी लग्न करणं ही वरकरणी चटपटीत बातमी वाटत असली तरी या मागे एक गंभीर समस्या आहे, एकप्रकारचा आजार आहे. त्या आजाराचं प्रमाण जगभर वाढतं आहे. त्याला म्हणतात ऑब्जेक्टफिलिया. अर्थात काही माणसांना काही वस्तू इतक्या आवडतात की प्राणाहून प्रिय होतात. ती माणसं त्या वस्तूंच्या प्रेमात पडतात. त्या वस्तू जवळ नसतील तर वेडीपीशी होतात. त्या वस्तूंनाच आपल्या जन्माचा जोडीदार मानून त्याच्याशी विवाहही करतात.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये एक घटना अशीच गाजली होती.  रेन गॉर्डन नावाच्या २४ वर्षीय रशियन मुलीने तिच्या ब्रिफकेसशी मॉस्को येथे विवाह केला. तिनं त्या ब्रिफकेसचं नाव ठेवलं गाइडऑन. रेननं जाहीर केलं होतं की, या ब्रिफकेसच्या आपण प्रेमात आहोत, तिच्याशी लग्न करणार आहोत. जूनमध्ये रीतसर विधी होऊन रेनचं ब्रिफकेसशी लग्न झालं. ( तिला ब्रिफकेस म्हटलेलं रेनला आवडत नाही, तिचं नाव गाइडऑन आहे तसंच म्हणा, असा तिचा आग्रह असतो.) कुणालाही वाटावं की, हा काय आचरटपणा, या मुलीला वेड लागलेलं आहे का असं कुणी ब्रिफकेसशी लग्न करतं का? वाट्टेल ते करतात लोक हल्ली आणि त्याला माध्यमं प्रसिद्धी देतात. 

असा वस्तूशी विवाह करणारी रेन ही काही जगात एकटीच किंवा पहिलीच व्यक्ती नाही. याआधीही काही व्यक्तींनी असे विवाह केलेले आहेत. रेनचंच उदाहरण घ्या, वयाच्या आठव्या वर्षीपासून तिला वस्तूच अधिक आवडतात. तरुणपणी ती प्रेमातही पडली, पण पुरुष जोडीदारासह ते नातं फार काळ टिकलं नाही. रेन सांगते की, शहरात उघडलेल्या मॉलच्या इमारतीच्याही ती प्रेमात होती, पण लोक हसतील म्हणून मी तेव्हा काही बोलले नाही. पाच वर्षांपूर्वी ही ब्रिफकेस तिनं विकत आणली आणि आता त्या ब्रिफकेसशीच लग्न करण्याइतपतच तिचा जीव त्यात गुंतल्याचे ती सांगते. आणि समर्थनही करते की, जिवंत व्यक्तीवर करतात तेच प्रेम असं ठरवणारे तुम्ही कोण, प्रेम -प्रेम असतं. ते कशावरही करावं. रेन ॲनिमिझम नावाची धार्मिक विचारधारा मानते, त्यानुसार प्रत्येक वस्तूत प्राणतत्त्व असतं असं काहीजण मानतात. 
त्यानुसार ट्रेन स्टेशनशी लग्न करणं, आपल्या लॅपटॉपच्या प्रेमात असणं, त्यांच्याशी संवाद अशाही घटना घडतात.  अलीकडेच ४५ वर्षीय अमेरिकन महिला कॉरोल सांता फे मेड यांनी एका ट्रेन स्टेशनशी लग्न केलं. एरिका आयफेल यांनी फ्रान्समधल्या आयफेल टॉवरशी लग्न केल्याची घटनाही गाजली होती.
मात्र हे सारं ज्या ऑब्जेक्टफिलियामुळे होतं तो कशामुळे होते. वस्तू अशा टोकाच्या आवडणं, त्या नसतील तर वेडंपिसं होणं, त्या वस्तू आपल्याशी बोलतात, आपलं ऐकतात, त्यांना आपल्या भावना कळतात हे सारं कशामुळे वाटतं? त्याचं विश्लेषण आणि अभ्यासही जगभर सुरू आहे.

मानसशास्त्रतज्ज्ञांच्या मते ऑब्जेक्टफिलिया असण्याची काही कारणं आहेत.

त्यातलं सगळ्यात प्रमुख म्हणजे माणसांपासून फटकून वागणं. काही माणसं अती एकेकटी असतात. कुणाशी बोलणं, माणसांसोबत राहणं त्यांना अवघड जातं. ते लाजाळूही असतात आणि एकेकटेही. पण या माणसांना बोलायचं तर असतं, मग ते बाहुल्या, फोन, दागिने किंवा त्यांच्या एखाद्या आवडत्या वस्तूशी तासंतास बोलतात. त्यासोबतच राहतात. दुसरं कारण म्हणजे काही माणसांना स्वत:ला बोलायला आवडतं पण त्यांना दुसऱ्या कुणाचंही मत नको असतं. कुणी वाद घातलेला आवडत नाही. ते स्वत:चंच खरं करतात. मग माणसांपेक्षा वस्तूशी बोलून आपली बोलण्याची गरज भागवणं त्यांना सुखकर वाटतं. गुंतागुतीच्या या मानसिकतेची मुळं अस्वस्थ लहानपणाही आडळतात. एकेकटं लहानपण, सतत अवतीभोवती भांडणं, कुणीच बोलायला नसणं यातूनही अनेकांना एखाद्या निर्जीव वस्तूशी बोलणंच जास्त सोयीस्कर वाटू लागतं. त्याची सवय लागते.काही शास्त्रज्ञ तर असंही सांगतात की, काही काही माणसांना खरंच विचित्र आकार, रचना पराकोटीच्या आवडतात. त्या इतक्या का आवडतात, का त्यांना वेडं करतात हे मात्र अजूनही कोडंच आहे. याशिवाय आधी म्हंटलं तसं ॲनिमिझम सारख्या गोष्टींवर भरवसा ठेवूनही अनेकजण प्राणी, झाडं, नद्या, वस्तू अशा अनेक गोष्टींच्या प्रेमात पडतात किंवा त्या वस्तू सतत जवळ बाळगतात.रेनने ब्रिफकेसशी लग्न करण्यामागे नक्की कोणती मानसिक गुंतागुंत आहे हे कळायला अर्थात काही मार्ग नाही मात्र जगभरात माणसं विचित्र मनोवस्थेतून जात असे टोकाचे निर्णय घेताना दिसतात. त्यांना थट्टा-टवाळी आणि आचरटपणाचं लेबल लावणं तसं सोपंच आहे, पण त्यामागे मनाची भलतीच कोडी असतात हे नक्की.
अलीकडेच युरी टोलोचको नावाच्या कझाखस्तानी बॉडीबिल्डर तरुणानं एका आकारानं प्रचंड मोठ्या बाहुलीशी लग्न केलं. त्याच्या लग्नाची छायाचित्रंही इन्स्टाग्रामवर व्हायरल होती.
वाटतं तितका सोपा नाही हा विषय, मोठा खेळ आहे मनाचा.

Web Title: indonesia man married cooker, girl from russia to briefcase, why people get married to object? what is objectophilia?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.