Join us  

Infertility Causes in Male : ऐन तारुण्यात स्पर्म काऊंट घटवतात ५ सवयी; पुरूषांना वंध्यत्वाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 7:27 PM

Infertility Causes in Male : पुरुष वंध्यत्वाच्या काही सामान्य लक्षणांमध्ये कमी कामवासना, जननेंद्रियामध्ये वेदना किंवा अस्वस्थता, पार्टनरला गर्भधारणा न होणे  यांचा समावेश आहे

सुखी वैवाहिक जीवनसाठी लैगिंक जीवन आणि जोडप्यांची शारीरिक कार्यक्षमता चांगली असणं गरजेचं असतं.  अकार्यक्षम प्रजनन प्रणालीमुळे पुरुषांची प्रजनन क्षमता बिघडू शकते. पुरुष वंध्यत्व (Infertility  in men)हा विविध  आरोग्य गुंतागुंतांचा परिणाम असू शकतो हे जरी खरे असले तरी, अनेक जीवनशैली घटक आणि आहार यावर लक्षणीय परिणाम करू शकतात हे देखील खरे आहे. (Male fertility 5 habits that can damage the male reproductive health) पुरुष वंध्यत्वाच्या काही सामान्य लक्षणांमध्ये कमी कामवासना, जननेंद्रियामध्ये वेदना किंवा अस्वस्थता, पार्टनरला गर्भधारणा न होणे  यांचा समावेश आहे.(Infertility Causes in Male) 

कारणं (Infertility Causes in Male)

१) मद्यपान, धुम्रपान

धूम्रपानामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर घातक परिणाम होऊ शकतो कारण त्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन, कमी कामवासना इत्यादी आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दारूचे सेवन देखील पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनच्या पातळीला बाधा आणू शकते. म्हणून, निरोगी पुरुष प्रजनन प्रणाली चांगली ठेवण्याासाठी या सवयींपासून लांब राहावे.

२) ताण-तणाव

जास्त ताण तुमच्यासाठी कधीही चांगला असू शकत नाही. चुकीच्या व्यवस्थापनात तणावाचा पुरुष प्रजनन प्रणालीवर घातक परिणाम होऊ शकतो.  तणावामुळे हार्मोनल बदल होऊ शकतात जसे की टेस्टोस्टेरॉन असंतुलन, ज्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होतो.

३) वाढतं वजन

 लठ्ठपणा ही सर्वात वाईट भेट आहे जी तुम्ही तुमच्या शरीराला देऊ शकता.  लठ्ठपणाचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर घातक परिणाम होऊ शकतो. जास्त वजनामुळे शुक्राणूंमध्ये अयोग्य DNA बदल होऊ शकतात आणि एकूण शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते.

४) हालचालीचा अभाव

बैठी जीवनशैली लैंगिक आरोग्य धोक्यात आणू शकते. यामुळे तुमच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. याचा एकूण प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

५) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं

स्वत: औषधं घेण्याची सवय भारतीयांमध्ये नवीन नाही. (ज्याप्रमाणे हळदीचे दूध हा प्रत्येक समस्येवर उपाय नाही.) आरोग्याच्या समस्या आल्यावर डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या खाणे हा देखील  उपचार करण्याचा योग्य मार्ग नाही. काही औषधांमुळे साइड इफेक्ट्स होऊ शकतात जसे की इतर , शुक्राणूंचे बदललेले उत्पादन, पुनरुत्पादक अवयवांवर विपरीत परिणाम इ.

टॅग्स :लैंगिक जीवनलैंगिक आरोग्यहेल्थ टिप्स