Join us  

खरंच आपण कुटुंबावर मनापासून प्रेम करतो का? - करा ही फॅमिली टेस्ट, पाहा तुमचं खरंखुरं उत्तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 6:00 AM

International Family Day 2024 : आपल्याला कुटुंबाची खरंच कदर आहे? आपण खरंच आपल्या माणसांची काळजी घेतो?

ठळक मुद्दे१५ मे हा जगभर कुटुंब दिन म्हणून साजरा होतो. आपण ताडून पाहूया का ‘ते’ गृहित धरणं?

-प्रज्ञा परदेशी (समुपदेशक)

श्रीदेवीच्या इंग्लिश विंग्लिश सिनेमात एक वाक्य आहे. फॅमिली जजमेण्टल होत नाही या अर्थाचं. कुटुंब तुमच्यासोबत उभं राहतं, असं काही ती सांगत असते.ते किती खरं आहे. आपलं कुटुंब, आपली माणसं आपली ताकद असतात. पण ती ताकद आपल्याला उमगते का? जगभरातला, बाहेरचा राग आपण घरी आल्याआल्या कुटुंबावर काढतो, असं अनेकदा होतंच ना? ॲनिमलमधला पापा-पापा म्हणणारा संवाद ऐका.

आपल्या माणसांचं ऐकून घ्यायला, त्यांना समजून घ्यायला वेळच मिळत नाही. जो तो आपल्या दुनियेत आणि आपल्या मोबाइलमध्ये अडकलेला..अर्थात अगदी इतकं सरसकटीकरण करावं असंही नाही. आज माणसांना कळते आपल्या माणसांच्या साथीचे मोल. त्यांचं ‘असणं’ आपलं जगणं भक्कम करतं हे ही खरंच!पण गृहित धरतो का आपण आपल्याच माणसांना?१५ मे हा जगभर कुटुंब दिन म्हणून साजरा होतो. आपण ताडून पाहूया का ‘ते’ गृहित धरणं?

 

स्वत:ला किती मार्क द्याल?

१. घरात सगळे एकत्र बसून रोज जेवण करता? जेवताना टीव्ही पाहता की एकमेकांशी गप्पा मारता?२. जेवण झाल्यावर सगळे मिळून पसारा आवरता की कुणीतरी एकजणच आवरतं?३. घरात कुणी तुमच्याशी बोलत असेल तर तुम्ही हं हं करत मोबाइलमध्ये मान घालून बसलेले असता का?४. घरातल्या सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ, रंग, भाज्या, गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

५. आपल्या माणसांना विकतची भेटवस्तू न देता, स्पेशल स्वत: त्यांच्यासाठी काही करता का?६. भांडण झालं तर ते मिटवण्यासाठी सहज सॉरी म्हणता का?७. अबोले धरता की भांडण मिटवून टाकता चटकन?८. आपल्या माणसांसाठी काही केलं की हिशेब ठेवता की प्रेमानं करता?

टॅग्स :परिवाररिलेशनशिप