Join us  

आयरा खान म्हणते नुपूरने प्रपोज केल्यावर पहिल्यांदा त्याला ठामपणे 'नाही' सांगितलं होतं, कारण......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 5:14 PM

Relationship Of Ira Khan and Nupur Shikhare:नुपूर शिखरे याने प्रपोज केल्यानंतर आमिर खानच्या लेकीने म्हणजेच आयराने सुरुवातीला त्याला नकार दिला होता. त्याचं कारण तिनेच सांगितलंय...

ठळक मुद्देत्यांच्या लग्नाचे किस्से तर रंजक आहेतच. पण त्यांच्या लग्नापुर्वीच्या काही गोष्टीही मजेशीर आहे. त्यातलीच एक गोष्ट खुद्द आयरानेच सांगितली आहे.

अभिनेता आमिर खान आणि रिना दत्ता यांची लेक आयरा खान आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. त्या दोघांनी सुरुवातीला कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर उदयपूर येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. आणि त्यानंतर लग्नाचं एक जंगी रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शन सोहळ्याला तर इंडस्ट्रीतले अनेक कलाकार उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे किस्से तर रंजक आहेतच. पण त्यांच्या लग्नापुर्वीच्या काही गोष्टीही मजेशीर आहे. त्यातलीच एक गोष्ट खुद्द आयरानेच सांगितली आहे.(Ira Khan revealed that Nupur Shikhare proposed her but she refuses his proposal)

 

सध्या आयरा आणि नुपूर यांची सोशल मिडियावर खूप चर्चा आहे. त्यांच्या लग्नाच्याआधी काही महिन्यांपुर्वीपासूनच त्या दोघांचे सोबत असतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.

 

तुम्ही प्यायला आहे का कधी बिर्याणी चहा? चहामध्ये टाकले आहेत चक्क..... बघा व्हायरल व्हिडिओ

तेव्हापासूनच खरं तर त्या दोघांच्या नात्याची नेहमीच चर्चा केली जाते. त्यांच्या नात्याविषयी Filmybug या कार्यक्रमात होस्टने आयराला प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना आयरा म्हणाली की सुरुवातीला नुपूरने तिला प्रपोज केलं तेव्हा तिने त्याला नकार दिला होता. ती त्याच्यासोबत डेटिंग करायलाही अजिबात तयार होत नव्हती.

 

तिच्या नकारामागचं मुख्य कारण होतं तिला आलेलं नैराश्य. ती म्हणाली की त्या काळात ती खूप मानसिक तणावाखाली होती. तिचं मानसिक आरोग्य अजिबातच चांगलं नव्हतं. तिला त्या काळात खूप नैराश्य आलं होतं.

फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, टॅनिंग कमी होऊन त्वचा दिसेल उजळ- चमकदार

डोक्यात अनेक विचारांचं काहूर उठलेलं होतं. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये राहून हा सगळा त्रास तिला नुपूरला द्यायचा नव्हता. याविषयी तिने नुपूरशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यावेळी तिच्या त्रासासह, ती जशी आहे तशी तिला स्विकारायला नुपूर तयार झाला. त्यामुळेच तर आज त्याचं नातं एवढं पुढे गेलं असून दोघेही आता विवाह बंधनात अडकले आहेत. 

 

टॅग्स :रिलेशनशिपइरा खानआमिर खान